maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा आणि आयआयटी मद्रास यांनी भारतीय भाषा, हेल्‍थ टेक आणि जनरेटिव्‍ह एआयसाठी एआयवरील संशोधनाला गती देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

गुरूग्राम, भारत, जून १६, २०२५: सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा (एसआरआय-एन)ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास)सोबत सामंजस्‍य करार करत आपला उद्योग-शैक्षणिक सहभाग दृढ केला आहे. या सहयोगांतर्गत सहयोगात्‍मक संशोधनाला चालना देण्‍यात येईल, तंत्रज्ञान विकासला गती देण्‍यात येईल आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज टॅलेंटना निपुण करण्‍यात येईल. हा सहयोग भारतीय भाषा, हेल्‍थ टेक आणि उदयोन्‍मुख क्षेत्रे जसे जनरेटिव्‍ह एआयसाठी एआयमध्‍ये अग्रगण्‍य सुधारणा करण्‍यावर लक्ष केंद्रित करेल, ज्‍यासह ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ दृष्टिकोनाशी संलग्‍न प्रबळ इनोव्‍हेशन इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता अधिक दृढ होईल.
या पंचवार्षिक सामंजस्‍य करारावर एसआरआय-एनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू आणि आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्‍ही. कामाकोटी यांनी स्‍वाक्षऱ्या केल्‍या. या कराराचा सहयोगात्‍मक क्रियाकलापांची व्‍यापक श्रेणी प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे, जसे प्रायोजित संशोधन प्रकल्‍प, सल्‍लागार प्रकल्‍प, तंत्रज्ञान परवाना, प्रशिक्षण, सुविधा विकास आणि भविष्‍यात विद्यार्थी फेलोशिप्‍सची स्‍पॉन्‍सरशिप.
”एसआरआय-एनमध्‍ये आम्‍ही सतत तंत्रज्ञान निर्माण करण्‍याप्रती काम करत आहोत, जे व्‍यक्‍ती व समुदायांना सक्षम करतात. आयआयटी मद्राससोबतचा आमचा सहयोग एकत्रितपणे अर्थपूर्ण, सर्वसमावेशक आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एकत्रित, आमचा भारतातील प्रादेशिक भाषांच्‍या सखोल एकीकरणासह गॅलॅक्‍सी एआय इकोसिस्‍टम सुधारण्‍याचा आणि देशभरातील भाषेसंदर्भातील अडथळ्यांना दूर करण्‍याप्रती योगदान देण्‍याचा मनसुबा आहे. तसेच, आम्‍ही उदयोन्‍मुख तंत्रज्ञानाच्या सहयोगाने विकास आणि कौशल्‍य सुधारणेमध्‍ये सामील होत आहोत,” असे सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू म्‍हणाले.
आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्‍ही. कामाकोटी या सहयोगाबाबत उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”आम्‍हाला एसआरआय-एनसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो आणि हा सहयोग एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत क्रांतिकारी संशोधन व तंत्रज्ञान विकासाला प्रायोजित करेल. झपाट्याने बदलत असलेल्‍या तंत्रज्ञान क्षेत्रात हा सामंजस्‍य करार लाभार्थींना सैद्धांतिक ज्ञान आणि व्‍यावहारिक उद्योग सोल्‍यूशन्‍समध्‍ये पक्के संबंध विकसित करण्‍यास अपस्किल करेल, जे जोखीमांना दूर करण्‍यासाठी आणि अनिश्चिततांचे निराकरण करण्‍यासाठी आवश्‍यक आहे.”
सॅमसंग इंडिया आणि आयआयटी मद्रास यांच्‍यामधील हा धोरणात्‍मक सहयोग एसआरआय-नोएडाच्‍या शैक्षणिक सहयोगांच्‍या वाढत्‍या नेटवर्कमध्‍ये अधिक भर करतो, जेथे आधीच आयआयटी दिल्‍ली, आयआयटी कानपूर, आयआयटी बॉम्‍बे आणि आयआयटी रोपार अशा प्रमुख संस्‍थांसोबत दीर्घकालीन धोरणात्‍मक सामंजस्‍य करार करण्‍यात आले आहेत. सॅमसंग आणि या संस्‍था स्‍मार्टर, अधिक कनेक्‍टेड विश्‍व घडवण्‍याच्‍या दिशेने विस्‍तृत रोडमॅप आखत आहेत. उद्योगामधील संसाधने आणि शैक्षणिक सर्वोत्तमतेला एकत्रित करत हे सहयोग भावी ब्रेकथ्रूंसाठी संपन्‍न इकोसिस्‍टम घडवत आहेत.
एसआरआय-नोएडा संशोधन व‍ विकास (आरअँडडी) प्रकल्‍पांना प्रायोजित करेल. हे प्रकल्‍प आयआयटी मद्रास, कंपनीच्‍या परिसरामध्‍ये किंवा दोन्‍ही ठिकाणी सहयोगात्‍मक व्‍यवस्‍थापनाच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येतील.

Related posts

लिव्हप्युअरची देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स होणार खुली

Shivani Shetty

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोकडून भारतात तळागाळातील नाविन्‍यतेला चालना देणाऱ्या ४० उपांत्‍य फेरीतील टीम्‍सची घोषणा

Shivani Shetty

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

Leave a Comment