मुंबई, १ ऑगस्ट २०२४: कोटक महिंद्रा बँक लि. (‘केएमबीएल’ / ‘कोटक’)ने जीओक्यूआयआयसोबत सहयोग करत कोटक – जीओक्यूआयआय स्मार्ट व्हायटल प्लस स्मार्टवॉच लाँच केले आहे. या लाँचसह ग्राहकांच्या पेमेंट्स करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल. ३४९९ रूपये किंमत असलेल्या या नाविन्यपूर्ण वीअरेबल डिवाईसमध्ये कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससह हेल्थ मॉनिटरिंग वैशिष्ट्ये आहेत. रूपे ऑन-द-गो द्वारे समर्थित हा स्मार्टवॉच जवळपास ५००० रूपयांपर्यंतचे व्यवहार सक्षम करतो, ज्यासाठी पिन क्रमांकाची गरज भासत नाही.
हे उत्पादन लाँच करत कोटक महिंद्रा बँकेच्या रिटेल लायबिलिटीज प्रॉडक्टचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भासिन म्हणाले, ”डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या प्रमाणासह ग्राहक वारंवार व कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी जलद आणि कॅशलेस पेमेंट्सचा शोध घेत आहेत. कोटक – जीओक्यूआयआय स्मार्ट व्हायटल प्लस स्मार्टवॉच पेमेंट्ससाठी रोख, कार्डस् किंवा स्मार्टफोन्सची गरज दूर करते, ज्यामधून चालता-फिरता सुरक्षित व विनासायास बँकिंग व्यवहाराची खात्री मिळते.”
कोटक – जीओक्यूआयआय स्मार्ट व्हायटल प्लस वापरकर्त्यांना रक्तदाब, शरीराचे तापमान आणि SpO2 पातळ्यांवर प्रत्यक्ष मनगटावरून देखरेख ठेवण्याची सुविधा देते. तसेच, यामधील युजर-अनुकूल इंटरफेस पेमेंट्स सुलभपणे होण्याची खात्री देते. ग्राहक विनासायासपणे त्यांच्या कोटक खात्यांमध्ये साइन इन करू शकतात आणि डिवाईसवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स करू शकतात, जेथे पारंपारिक कॉन्टॅक्टलेस कार्डस् व मोबाइल डिवाईसेस सारखीच सुरक्षितता मिळते.
*जीओक्यूआयआचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल म्हणाले,* ”आरोग्य हीच खरी संपत्ती, ही कालातीत म्हण आहे. जीओक्यूआयआयमध्ये आमचा नेहमी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली राखण्यावर विश्वास आहे. ग्राहकांना जीओक्यूआयआयच्या प्रगत आरोग्य इकोसिस्टमसह एकीकृत कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स देण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेसोबतचा सहयोग या ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पाऊल आहे. हे एकीकरण महत्त्वाचे आहे, ज्यामुळे सोयीसुविधेमध्ये वाढ होईल, आरोग्य व सुरक्षिततेला चालना मिळेल, सुरक्षित व्यवहारांची खात्री मिळेल आणि ते दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञान एकीकरणाच्या वाढत्या ट्रेण्डशी संलग्न आहे. ही कार्यक्षमता विनासायास, आरोग्यदायी व कार्यक्षम जीवनशैलीच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देते, जे विशेषत: आजच्या धावपळीच्या युगामध्ये महत्त्वाचे आहे.”
*एनपीसीआयचे चीफ रिलेशनशीप मॅनेजमेंट रजीथ पिल्लई म्हणाले* , ”आम्हाला एनपीसीआयच्या नाविन्यपूर्ण रूपे ऑन-द-गो रेंजवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी स्मार्ट व्हायटल प्लस स्मार्टवॉच लाँच करण्याचा आनंद होत आहे. हा सहयोग वापरकर्त्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार चालता-फिरता सोईस्करपणे व सुरक्षितपणे करण्यास सक्षम करतो. पेमेंट सोल्यूशन्ससाठी नाविन्यपूर्ण फॉर्म फॅक्टर्स पेमेंट्स इकोसिस्टमला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत, सुधारित युजर अनुभव देत आहेत आणि व्यवहार सोपे व विनासायास करत आहेत. स्वीकृती पायाभूत सुविधा झपाट्याने वाढत असल्यामुळे तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांसह कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्यूशन्ससाठी मागणी देखील वाढत आहे.”
कोटक बँक ग्राहक बँकेचे मोबाइल अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. नॉन-कोटक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोटक बँकेमध्ये खाते उघडावे लागेल.