maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

2 डिसेंबर पासून झी5 आणि टीव्ही चॅनेल्सवर लाइव्ह पाहता येईल

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२५ : भारतातील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस झी इंटरटेन्मेंट एन्टरप्राइजेस लिमिटेड (झी)ने डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीड टी20 (ILT20) सिझन 4 च्या थेट प्रक्षेपणाची घोषणा केली आहे. स्पर्धेची सुरुवात मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, भव्य अंतिम सामना रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी खेळवला जाईल. पहिल्या तीन सिझनच्या उत्तुंग यशानंतर, ज्यामुळे ही लीग जगातील दुसरी सर्वाधिक पाहिली जाणारी टी-20 क्रिकेट लीग ठरली आहे, डीपी वर्ल्ड आयएलटी20 ने आपली जागतिक लोकप्रियता अधिक मजबूत केली आहे. क्रिकेटप्रेमी आणि क्रीडा चाहत्यांना आता भारतात आणि जगभरात थेट सामने पाहण्याची खास संधी मिळणार आहे. भारतातील प्रेक्षकांसाठी आयएलटी20 चे लाइव्ह प्रसारण झी च्या सर्व चॅनेल्सवर तसेच OTT प्लॅटफॉर्म Zee 5 वरही सामने पाहता येतील. याशिवाय, जगभरातील प्रेक्षकांसाठी झीच्या सिन्डिकेशन पार्टनर्सच्या टीव्ही आणि डिजिटल नेटवर्क्सद्वारे थेट प्रसारण उपलब्ध राहील.

एकूण 34 सामन्यांची ही स्पर्धा यूएईतील तीन प्रतिष्ठित क्रिकेट स्टेडियममध्ये – दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळवली जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी होईल, तर ग्रँड फायनल रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी होईल. चाहत्यांना ‘Z’च्या सर्वाधिक लोकप्रिय आणि व्यापक पसरलेल्या टीव्ही चॅनेल्सवर थेट प्रक्षेपणाचा आनंद घेता येईल.लीगचे 6 फ्रँचायझी संघ आहेत एमआय अमिरात,अबू धाबी नाइट रायडर्स, दुबई कॅपिटल्स, गल्फ जायंट्स, डिझर्ट वायपर्स आणि शारजाह वॉरियर्स. भारतीय अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक, पीयूष चावला आणि उन्मुक्त चंद या सिझनमध्ये मैदानात दिसणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि वेगाने वाढणाऱ्या या टी20 लीगमध्ये मजबूत भारतीय प्रतिनिधित्व दिसून येईल.

या सिझनमध्ये जगातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंचा सहभाग उत्साह आणखी वाढवतो आहे. आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड, सुनील नरीन, निकोलस पूरन, टीम डेव्हिड, सॅम कुरन, आदिल रशीद, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, गुलबदिन नाईब, मोहम्मद नबी आणि शाकिब अल हसन यांसारखे स्टार खेळाडू या सिझनमध्ये मैदानात उतरणार आहेत, ज्यामुळे हा सिझन खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या क्रिकेट प्रतिभेचं प्रदर्शन ठरणार आहे.

लक्ष्मी शेट्टी, हेड-अॅडव्हर्टायझमेंट रेव्हेन्यू, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल, झी इंटरटेन्मनेंट एंटरप्राइजेश लि. म्हणाल्या,’‘झी’मध्ये आम्ही डीपी वर्ल्ड आयएलटी 20 चा चौथा सिझन प्रेक्षकांपर्यंत आणताना अत्यंत आनंदी आहोत. यंदा आम्ही क्रिकेट चाहत्यांना आमच्या नेटवर्कवर आणखी समृद्ध, आकर्षक आणि इन्क्लुझिव्ह व्ह्यूइंग एक्स्पिरियन्स देणार आहोत. जगातील सर्वोत्तम खेळाडू, प्रतिष्ठित स्टेडियम्स, उत्कृष्ट सुविधा आणि सहा मजबूत फ्रँचायझी संघांसह, आमचे उद्दिष्ट मागील वर्षाच्या यशावर आणखी भर घालणे व या लीगला जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक म्हणून अधिक भक्कमपणे उभे करणे आहे. प्रत्येक सिझनसोबत लीगची लोकप्रियता वाढली आहे आणि यंदा आमचा फोकस चाहत्यांशी अधिक जोडणी निर्माण करणे, त्यांना या रोमांचक, भावनिक आणि दमदार क्रिकेट अनुभवाच्या केंद्रस्थानी आणणे असा आहे. या नवीन सिझनच्या सुरुवातीस आम्ही कटिबद्ध आहोत की, ही जागतिक लीग जगभरातील प्रेक्षकांसाठी अधिक सुलभ आणि उपलब्ध करून द्यावी.”

Related posts

नेस्ले इंडियाने मंच चोको फिल्स सिरिअल बाजारात विस्तार

Shivani Shetty

सायबर गुन्हेगार सणांच्या उत्सवाला लक्ष्य करत असल्याने क्विक हील टेक्नॉलॉजीजकडून वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन

Shivani Shetty

इझमायट्रिपचा विमा क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment