maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

कोटक महिंद्रा बँकेने एमएसएमईंना सर्वोत्तम उपकरण फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍ससह सक्षम करण्‍यासाठी ज्‍योती सीएनसीसोबत सहयोग केला

मुंबई, ऑगस्‍ट ११, २०२५ – कोटक महिंद्रा बँक लि. (केएमबीएल)ने भारतातील आघाडीची सीएनसी मशिन उत्‍पादक कंपनी ज्‍योती सीएनसीसोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत मशिन टूल उद्योगामधील एमएसएमईंना स्‍वतंत्र मुलभूत, सानुकूल उपकरण फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येतील.
या सहयोगाचा प्रगत सीएनसी मशिनरीमध्‍ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या व्‍यवसायांसाठी भांडवल मिळवणे सुलभ करण्‍यासह जलदपणे उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. या सहयोगांतर्गत कोटक महिंद्रा बँक डिजिटली जवळपास ३ कोटी रूपयांपर्यंतचे उपकरण कर्ज देईल, ज्‍यामधून जलद व अधिक स्थिर वित्तपुरवठ्याची खात्री मिळेल.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्‍यक्ष, बिझनेस बॅकिंगचे प्रमुख, अफ्लूएण्‍ट, एनआरआय व प्रमुख विपणन अधिकारी रोहित भासिन म्‍हणाले, “या सहयोगामधून एमएसएमईंना त्‍यांच्‍या विकासाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर साह्य करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. सर्वोत्तम फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देत आमचा उत्‍पादकांना कार्यसंचालनांमध्‍ये वाढ करण्‍यास, अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यास आणि उत्‍पादकता वाढवण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.”
हा उपक्रम अधिकाधिक एमएसएमईंना फायदा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, तसेच इतर लाभार्थी पुढीलप्रमाणे:
– ओईएम पुरवठादारांपासून मोठे ऑटोमोबाइल उत्‍पादक
– मर्यादित मशिनरी असण्‍यासह लहान प्रमाणात काम करणारे कामगार
ज्‍योती सीएनसी ऑटोमेशन लि.चे संस्‍थापक, अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक पराक्रमसिंह जी. जडेजा म्‍हणाले, “आम्‍हाला ग्राहकांना विनासायासपणे आर्थिक साह्य देण्‍यासाठी कोटक महिंद्रा बँकेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. हा उपक्रम त्‍यांच्‍या व्‍यवसाय वाढीला साह्य करेल, तसेच भारतातील उत्‍पादनाची एकूण परिसंस्‍था अधिक दृढ करेल.”
हा सहयोग एमएसएमईंसाठी पसंतीची बँकिंग सहयोगी असण्‍याच्‍या कोटकच्‍या व्‍यापक धोरणाशी संलग्‍न आहे, जेथे बँक नाविन्‍यपूर्ण आर्थिक सोल्‍यूशन्‍स देते, जे उद्योगांमध्‍ये वाढ आणि स्थिरतेला चालना देतात.

Related posts

टीमलीज डिजिटलकडून सीएक्सओ थिंकटँकचे आयोजन

Shivani Shetty

सैमसंग ने प्रीमियम डिज़ाइन और उत्‍कृष्‍ट ग्राहक सेवा के साथ स्मार्टफोन सर्विस सेंटर्स में किया बड़ा बदलाव

Shivani Shetty

अॅजिलेंट टेक्‍नॉलॉजीज आणि आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्‍स यांनी भारतातील अन्‍न सुरक्षा परिसंस्‍था मजबूत करण्‍यासाठी धोरणात्‍मक सहयोग वाढवला

Shivani Shetty

Leave a Comment