maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फ्लूवर मात करा आणि कामाच्‍या ठिकाणी आरोग्‍यदायी राहा

दरवर्षी जगभरातील लाखो व्‍यक्‍तींना फ्लू आजार होतो. तसेच, दरवर्षाला १ बिलियनहून अधिक प्रकरणे आढळून येतात, ज्‍यामध्‍ये ३ ते ५ दशलक्ष प्रकरणे गंभीर असतात. ज्‍यामुळे हा आजार हंगामी आजारांपेक्षा अधिक घातक आहे. सर्दी-खोकल्‍यासह होणाऱ्या या फ्लू आजारामुळे दैनंदिन जीवन व कामात मोठा अडथळा येऊ शकतो. स्‍वत:चे या आजारापासून संरक्षण करण्‍यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, पण जागरूकतेचा अभाव व गैरसमजांमुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात.

विशेषत: श्रमजीवी व्‍यावसायिकांना फ्लू आजार होण्‍याचा सर्वाधिक धोका आहे. तुम्‍ही शहरातील कार्यालयामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा किंवा लहान नगरामधील कारखान्‍यामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा फ्लू आजाराचा तुमचे कुटुंब आणि काम व जीवनावर परिणाम होऊ शकतो. अनेक लोक आजारी असताना देखील कामावर जातात, परिणामत: कामावर लक्ष लागत नाहीत, तसेच इतरांना देखील फ्लू आजार होण्‍याचा धोका वाढतो. तसेच, डॉक्‍टरांकडे जाण्‍याच्या, औषधोपचारांचा आणि हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याच्या खर्चांमुळे अधिक तणाव येऊ शकतो.

अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, “फ्लूचा कामाच्‍या ठिकाणी उत्‍पादकतेवर परिणाम होऊ शकतो. भारतात आरोग्‍यसेवा सिस्‍टमवर संसर्गजन्‍य आजारांचा मोठा दबाव आहे, ज्‍यामुळे फ्लू लसीकरणाबाबत जागरुकता वाढवणे महत्त्वाचे आहे. लसीकरण केल्‍यास तुमचे फ्लूपासून संरक्षण होते. तसेच तुमचे संरक्षण होण्‍यासोबत सार्वजनिक आरोग्‍य देखील उत्तम राहण्‍यास मदत होते, ज्‍यामुळे फ्लूच्‍या प्रादुर्भावामुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक व सामाजिक समस्‍या कमी होऊ शकतात.”

भारतात फ्लू लसीकरणाचा अवलंब आजही सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये असला तरी वाढत्‍या जागरूकतेमुळे अधिकाधिक व्‍यक्‍तींचे फ्लूपासून संरक्षण होण्‍यास मदत होऊ शकते.
मुंबईतील बॉम्‍बे हॉस्पिटलचे चेस्‍ट मेडिसीनचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. सुजीत के. राजन म्‍हणाले, “फ्लू लस सुरक्षित, गुणकारी आहे आणि दरवर्षी सर्वात सामान्‍य व्‍हायरस स्‍टेन्‍सनुसार अपडेट केली जाते. जागतिक आरोग्‍य संघटना (डब्‍ल्‍यूएचओ) फ्लू विषाणूंवर देखरेख ठेवते आणि इन्‍फ्लूएन्‍झा सीझन्‍ससाठी वर्षातून दोनदा लस अपडेट करते. 65 वर्षांनंतर निरोगी जीवनशैली कायम राखणे आणि दरवर्षी लस घेणे ही स्वतःचे संरक्षण करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. काही अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या 65 वर्षांखालील रुग्णांनाही वार्षिक इन्फ्लूएंझा लसीकरणाचा फायदा होऊ शकतो. दरवर्षी एकदा लस घेतल्‍यास फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि न्‍यूमोनिया सारख्‍या गंभीर आजारांपासून संरक्षण होऊ शकते. लस घेतल्‍याने तुम्‍ही स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासोबत आसपासच्‍या इतरांना सुरक्षित ठेवण्‍यास देखील मदत करता.”

भारतात, सर्वात समान्‍य फ्लू विषाणू आहेत सबटाइप ए (एच१एन१) आणि ए (एच३एन२). हिवाळा व पावसाळ्यादरम्‍यान फ्लूचा प्रसार सवाधिक होतो आणि संसर्गित व्‍यक्‍ती खोकल्‍यास, शिंकल्‍यास किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या लहान ड्रॉपलेट्सच्‍या माध्‍यमातून पसरतो.

कामाच्‍या ठिकाणी सुरक्षित राहण्‍यासाठी नियमितपणे हात स्‍वच्‍छ धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झााकून ठेवा. बरे वाटत नसल्‍यास घरीच राहा, ज्‍यामुळे फ्लूचा प्रसार होणार नाही. कामाच्‍या ठिकाणी आरोग्‍यदायी सवयींचे पालन करणे आणि दरवर्षी लसीकरण करणे यामुळे तुमचे व तुमच्‍या आसपासच्‍या व्‍यक्‍तींचे फ्लूपासून संरक्षण होण्‍यास मदत होते.

Related posts

Mobil 1 50वीं वर्षगांठ: आगे के लिए तैयार

Shivani Shetty

हॅपी बर्थडे राधिका आपटे! IMDb वरील तिची सर्वाधिक रेटींग असलेली टॉप 10 शीर्षके बघूया

Shivani Shetty

शहानी ग्रुपच्‍या स्‍मार्ट इन्स्टिट्यूटचे यश

Shivani Shetty

Leave a Comment