maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश

मुंबई, ३१ जुलै २०२४: भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या इन्शुरन्सदेखोला रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयची मंजूरी मिळाली आहे. आयआरडीएआयने कंपनीला संयुक्त विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. भारतभरात विम्याची उपलब्धता व वितरण यांमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठा पल्ला यामुळे पार झाला आहे. 

विमा कंपनी उचलत असलेल्या विमा जोखमीचा काही भाग फेरविमा (रिइन्शुरन्स) कंपनीवर टाकून तसेच विमा काढणाऱ्यांसाठी स्पर्धात्मक दर संरक्षित करून या क्षेत्राच्या मूल्यात भर टाकण्याचा इन्शुरन्सदेखोचा हेतू आहे. तंत्रज्ञानाची जोपासना करून तसेच फेरविमा उद्योगात डेटा अॅनालिटिक्सच्या उपयोजनेने नवोन्मेष आणून देशात विम्याची स्वीकृती वाढवण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि संस्थापक श्री. अंकित अग्रवाल म्हणाले, “भारतभरात विम्याची स्वीकृती व उपलब्धता वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आयआरडीएआयची मंजूरी हा महत्त्वाचा धोरणात्मक टप्पा आहे. आमची तंत्रज्ञानातील ताकद आणि उद्योगक्षेत्राबद्दलचे सखोल ज्ञान यांचा लाभ घेऊन आमच्या क्लाएंट्स व पार्टनर्ससाठी उत्तम मूल्यनिर्मिती करण्याचे उद्दिष्टही आमच्यापुढे आहे. या दृष्टिकोनामुळे विम्याच्या क्षेत्रात तर सुधारणा होईलच, शिवाय आमचे बाजारातील स्थानही अधिक बळकट होईल. नवोन्मेष आणि व्यवहार्य व्यवसाय धोरणे यांच्यात समतोल राखण्यास आम्ही बांधील आहोत. त्याचप्रमाणे विमा कंपन्या व त्या ज्यांना सेवा देतात ते लोक यांच्या गरजांना आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत.”

फेरविमा (रिइन्शुरन्स) क्षेत्राने लक्षणीय वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये उद्योगक्षेत्रातील हप्त्यांच्या (प्रिमियम्स) रकमेने ५४७ कोटी रुपयांचा आकडा गाठला. बीटूबी उत्पादनांचा फेरविमा रिटेल उत्पादनांच्या तुलनेत अधिक सातत्याने केला जात आहे. इन्शुरन्सदेखोसाठी छोटे व मध्यम उद्योग हा सर्वाधिक वेगाने वाढणारा विभाग आहे आणि कंपनीने चालू आर्थिक वर्षात (आर्थिकवर्ष २४) या क्षेत्रातून ३०० कोटी रुपये मूल्याचे हप्ते मिळवले आहेत. त्यामुळे कंपनीही एसएमई विभागातील सर्वाधिक वेगाने वाढणारी व सर्वांत मोठी इन्शुअरटेक ठरली आहे. एसएमई व्यवसायात शिरण्याच्या आक्रमक धोरणाशी सुसंगती राखत इन्शुरन्सदेखोने २०२३ मध्ये एसएमई क्षेत्रात अधिग्रहणेही केली आहेत.

इन्शुरन्सदेखोने चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २४) सुमारे ३,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे आणि पुढील १२ महिन्यांत कंपनीचे उत्पन्न वाढून ५,००० कोटी रुपयांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. भारतातील ६ लाख खेड्यांपर्यंत विमा पोहोचवण्याचे उद्दिष्ट इन्शुरन्सदेखोने ठेवले आहे. रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात विस्तार केल्यामुळे कंपनीला सखोल वितरण जाळी तयार करता येतील, नवीन उत्पादने आणता येतील आणि आपल्या विमा क्षेत्रातील सहयोगींना मदत करण्यासाठी मूल्यसाखळीत अधिक खोलवर पोहोचता येईल आणि त्यायोगे देशातील विमा स्वीकृतीला कंपनी चालना देऊ शकेल.

Related posts

थरमॅक्‍सकडून बॉयलर इंडिया २०२४ मध्‍ये शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा आणि शुद्ध पाणी यामधील तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन

Shivani Shetty

इझमायट्रिपचा ग्रामीण विकास मंत्रालयासोबत सामंजस्‍य करार

Shivani Shetty

कॅडीसच्या महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ

Shivani Shetty

Leave a Comment