मुंबई, २८ फेब्रुवारी २०२५: भारतातील झपाट्याने वाढत असलेल्या इन्शुरन्सदेखो या इन्शुरटेक प्लॅटफॉर्मने आपल्या एजंट पार्टनर नेटवर्कचा लक्षणीय विस्तार केला आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीने ९५ हजारपेक्षा अधिक नवीन एजंट पार्टनर कामावर घेतले आहेत. अशा प्रकारे त्यांच्या पार्टनर नेटवर्कमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ९२% वाढ होऊन डिसेंबर २०२४ मध्ये त्यांची एकंदर संख्या २,२०,००० वर पोहोचली आहे.
या आक्रमक वृद्धीमुळे इन्शुरन्सदेखोची पोहोच देशातील ९९% पिनकोड्सपर्यंत वाढली आहे. त्यापैकी त्यांचे ८६% एजंट हे टियर २ आणि टियर ३ शहरांत काम करत आहेत.
कंपनीचा हा विस्तार खास करून राजस्थानातील सिकदर, पश्चिम बंगालातील कृष्णनगर, नागालँडमधील झुनेबोटो येथे आणि उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर यांसारख्या टियर 3 शहरांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. ही कंपनी आता हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पिती आणि मिझोरममधील सरचिप यांसारख्या देशातील दूरस्थ प्रांतात देखील पोहोचली आहे. यामधून देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात विमा सेवा प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता दिसून येते.
इन्शुरन्सदेखोचे उपाध्यक्ष आणि बी२बी२सीचे प्रमुख पंकज गोएंका म्हणाले, “एजंट नेटवर्कमधील या लक्षणीय विस्तारातून देशातील प्रत्येक कोपऱ्यात विमा सहजप्राप्य बनवण्याची आमची निष्ठा दिसून येते. भारतातील ९९% पिनकोड्स पर्यंत पोहोचून आम्ही उपलब्धतेतील कमी भरून काढत आहोत आणि वंचित समुदायांच्या आणखी जवळपर्यंत आर्थिक संरक्षण घेऊन येत आहोत. हा मैलाचा दगड केवळ आकडे दाखवत नाही, तर विश्वासार्ह विमा उपायांद्वारे अगदी दूरवर राहणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांना सक्षम करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. आमच्या प्रीमियम रन रेटमधली वाढ आमच्या प्रयत्नांचा प्रभाव दर्शवते आणि विमा क्षेत्रात एक विश्वसनीय कंपनी म्हणून आमची भूमिका बळकट करते.”
टेक-फर्स्ट दृष्टिकोनाने प्रेरित असलेला इन्शुरन्सदेखोचा प्लॅटफॉर्म ४९ विमा कंपन्यांचे ७२० पेक्षा जास्त इन्शुरन्स प्लान ऑफर करून प्रत्येक ग्राहकाला भरपूर पर्याय देतो. नानाविध पर्याय आणि या प्लॅटफॉर्मचा सुखद डिजिटल अनुभव यांनी देशाच्या प्रचंड आर्थिक वृद्धीत मोलाचे योगदान दिले आहे.
मार्च २०२४ पर्यंत इन्शुरन्सदेखोचा वार्षिक प्रीमियम रन रेट ३३०० कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. आपली पोहोच ६ लाख गावांपर्यंत नेण्याचे आणि भारतातील ग्रामीण भागांत रोजगार निर्मितीसाठी आणि आर्थिक समावेशासाठी साहाय्यक म्हणून आपली भूमिका बळकट करण्याचे त्यांचे महत्त्वाकांक्षी ध्येय आहे.