गुरूग्राम, भारत – जुलै, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने त्यांचे सिक्स्थ-जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन्स – गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ साठी विक्रमी प्री ऑर्डर्सची घोषणा केली. पहिल्या २४ तासांमध्ये गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ साठी प्री-ऑर्डर्समध्ये मागील जनरेशन फोल्डेबल्सच्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ झाली, ज्यामुळे ही भारतातील सर्वात यशस्वी नवीन झेड सिरीज ठरली.
भारतासह उर्वरित जगभरात गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ साठी प्री-ऑर्डर्सची सुरूवात १० जुलै रोजी झाली. नवीन स्मार्टफोन्ससह नुकतेच लाँच करण्यात आलेले इकोसिस्टम डिवाईसेस – गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा, गॅलॅक्सी वॉच७, गॅलॅक्सी बड्स३ प्रो आणि गॅलॅक्सी बड्स३ यांच्या विक्रीला भारतात २४ जुलै २०२४ रोजी सुरूवात होईल.
”आम्हाला भारतात आमचे नवीन फोल्डेबल्स गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ साठी ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आनंद होत आहे. नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी प्री-ऑर्डर्समध्ये १.४ पट वाढीमधून निदर्शनास येते की, भारतातील ग्राहक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये अग्रस्थानी आहेत. आता सिक्स्थ जनरेशनमधील आमचे नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलॅक्सी एआयच्या नवीन चॅप्टरला सादर करतात आणि युजर अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जात कम्युनिकेशन्स, उत्पादकता आणि सर्जनशीलतेमध्ये अद्वितीय मोबाइल अनुभव देतात. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ चे यश आम्हाला भारतातील आमचे प्रीमियम सेगमेंट नेतृत्वस्थान अधिक दृढ करण्यास साह्य करेल,” असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले.
भारतातील ग्राहकांसाठी गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ सॅमसंगच्या नोएडा येथील फॅक्टरीमध्ये उत्पादित केले जात आहेत. नवीन फोल्डेबल्स आतापर्यंतचे सर्वात स्लिम व वजनाने हलके गॅलॅक्सी झेड सिरीज स्मार्टफोन्स आहेत आणि परिपूर्ण सममितीय डिझाइनसोबत स्ट्रेट एजेससह (कडा) येतात. गॅलॅक्सी झेड सिरीज सुधारित आर्मर अॅल्युमिनिअम आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस २ सह देखील सुसज्ज आहे, ज्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ गॅलॅक्सी झेड सिरीज आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि फ्लिप६ मध्ये स्नॅपड्रॅगन®️ ८ जेन ३ मोबाइल प्लॅटफॉर्म फॉर गॅलॅक्सी हे सर्वात प्रगत स्नॅपड्रॅगन मोबाइल प्रोसेसर, तसेच दर्जात्मक सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू कार्यक्षमता आहे. प्रोसेसर एआय प्रोसेसिंगसाठी ऑप्टिमाइज करण्यात आले आहे आणि एकूण कार्यक्षमतेसह सुधारित ग्राफिक्स देते.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ मध्ये अनेक एआय-समर्थित वैशिष्ट्ये व टूल्स आहेत, जसे नोट असिस्ट, कंपोजर, स्केच टू इमेज, इंटरप्रीटर, फोटो असिस्ट आणि इन्स्टण्ट स्लो-मो, जे मोठ्या स्क्रिनचा आकार वाढवण्यासह उत्पादकता वाढवतात.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ मध्ये दीर्घकाळापर्यंत गेमचा आनंद घेण्यासाठी १.६ पट मोठी वेपर चेम्बर आहे आणि रे ट्रेसिंग त्याच्या ७.६-इंच स्क्रिनवर वास्तविक ग्राफिक्सचा अनुभव देते, जे अधिक सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी जवळपास २,६०० नीट्सचा तेजस्वी डिस्प्ले देते.
गॅलॅक्सी झेड फ्लिप६ मध्ये नवीन कस्टमायझेशन व क्रिएटिव्हीटी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. ३.४-इंच सुपर एएमओएलईडी फ्लेक्सविंडोसह तुम्ही डिवाईस सुरू करण्याची गरज न भासता एआय-असिस्टेड फंक्शन्स वापरू शकता. तसेच, तुम्ही सुचवलेल्या प्रतिक्रियांसह टेक्स्ट्सना प्रतिक्रिया देऊ शकता, जे नवीन मेसेजेसचे विश्लेषण करत सर्वोत्तम प्रतिक्रियेचा सल्ला देतात.
नवीन ऑटो झूमसह फ्लेक्सकॅम वस्तूला ओळखत फोटोसाठी सर्वोत्तम फ्रेम आपोआपपणे देतो आणि कोणत्याही आवश्यक अॅडजस्टमेंट्सपूर्वी झूम इन व झूम आऊट करतो. नवीन ५० मेगापिक्सल वाइड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर्स सुस्पष्ट व आकर्षक फोटोंसह अपग्रेडेड कॅमेरा अनुभव देतात. नवीन ५० मेगापिक्सल सेन्सरमध्ये नॉईज-फ्री फोटोजसाठी 2x ऑप्टिकल झूम आहे, तर जवळपास 10x झूमसह प्रगत शूटिंग अनुभवासाठी एआय झूम आहे. गॅलॅक्सी झेड फ्लिप६ आता अधिक बॅटरी क्षमतेसह येतो आणि पहिल्यांदाच त्यामध्ये वेपर चेंबर आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ ला सॅमसंग गॅलॅक्सीचे डिफेन्स-ग्रेड सॅमसंग नॉक्सचे संरक्षण देण्यात आले आहे. हे मल्टी-लेयर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्यासोबत एण्ड-टू-एण्ड हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्शन आणि कोलॅबोरटिव्ह प्रोटेक्शनसह असुरक्षिततांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
किंमत आणि उपलब्धता
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ ची किंमत १६४९९९ रूपयांपासून (१२ जीबी + २५६ जीबी) सुरू होते, तर गॅलॅक्सी झेड फ्लिप६ ची किंमत १०९९९९ रूपयांपासून (१२ जीबी + २५६ जीबी) सुरू होते.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ व्यतिरिक्त सॅमसंगने एआय-समर्थित गॅलॅक्सी इकोसिस्टम उत्पादने – गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा, गॅलॅक्सी वॉच७ आणि गॅलॅक्सी बड्स३ सिरीज देखील लॉंच केले, ज्यांच्या प्री-ऑर्डर्सना भारतात १० जुलैपासून सुरुवात झाली.
गॅलॅक्सी वॉच ७ ची किंमत २९९९९ रूपयांपासून सुरू होते आणि गॅलॅक्सी वॉच अल्ट्राची किंमत ५९९९९ रूपये आहे. सॅमसंगच्या नवीन गॅलॅक्सी बड्स३ ची किंमत १४९९९ रूपये आहे, तर गॅलॅक्सी बड्स३ प्रो ची किंमत १९९९९ रूपये आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी बँक कार्डसवर ८००० रूपयांची कॅशबॅक, तसेच ९ महिन्यांचा नो-कॉस्ट बँक ईएमआय किंवा ८००० रूपयांच्या अपग्रेड बोनससह जवळपास ९ महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय मिळेल. विद्यमान सॅमसंग फ्लॅगशिप स्मार्टफोन ग्राहक १५००० रूपयांच्या अपग्रेड बोनसचा लाभ घेण्याची निवड करू शकतात.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ प्री-ऑर्डर करणाऱ्या सर्व ग्राहकांना गॅलॅक्सी झेड अशुअरन्स मिळेल, जेथे त्यांना फक्त ९९९ रूपयांमध्ये इंडस्ट्री-फर्स्ट दोन स्क्रिन/पार्टस् रिप्लेसमेंट्स मिळतील. तसेच गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ ग्राहक नवीन लाँच करण्यात आलेले गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा, गॅलॅक्सी वॉच ७ आणि गॅलॅक्सी बड्स३ सिरीजवर ३५ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात.
गॅलॅक्सी वॉच७ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ८००० रूपयांची मल्टी-बॅक कॅशबॅक किंवा ८००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल, तर गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १०००० रूपयांची मल्टी-बँक कॅशबॅक किंवा १०००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. बड्स३ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ४००० रूपयांची मल्टी बँक कॅशबॅक किंवा ४००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. बड्स३ प्रो प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ५००० रूपयांची मल्टी बँक कॅशबॅक किंवा ५००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.
previous post