मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४: भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) आज २०३० साठी आपल्या व्यापक धोरणाची घोषणा केली. या धोरणांतर्गत आयएचसीएल आपल्या ब्रँडस्केपचा विस्तार करेल, उद्योगक्षेत्रात सर्वात जास्त मार्जिन मिळवेल, भांडवलावर २०% परताव्यासह आपला कन्सॉलिडिटेड रेव्हेन्यू दुप्पट करेल आणि जगभरात ज्यांची प्रशंसा केली जाते अशा आपल्या सिद्धांतांसह पुढे जात आपल्या पोर्टफोलिओमध्ये ७०० पेक्षा जास्त हॉटेल्स समाविष्ट करेल.
श्री पुनीत छटवाल, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आयएचसीएल यांनी सांगितले,”३५० हॉटेल्सचा पोर्टफोलिओ बनवून आयएचसीएलने अपेक्षांपेक्षा उंच कामगिरी केली आहे. यापैकी २०० पेक्षा जास्त हॉटेल्स सुरु आहेत आणि सलग १० तिमाहींमध्ये विक्रमी आर्थिक कामगिरी बजावली आहे. हे प्रभावी प्रदर्शन आणि एक मजबूत बॅलन्स शीट आम्हाला आमची विकासाची गती वाढवण्यासाठी सज्ज करतात. या क्षेत्रातील दीर्घकालीन स्ट्रक्चरल टेल विंड्स हे व्हिजन सक्षम करतात, यामध्ये भारताची अनुमानित ६.५% पेक्षा जास्त जीडीपी वाढ, सरकारचे पायाभूत सोयीसुविधा वाढवण्यावरील लक्ष, हॉटेल्सची पुरवठ्यापेक्षा जास्त मागणी आणि ग्राहकांच्या संपन्नतेमध्ये झालेली वाढ यांचा समावेश आहे.”
पुनीत छटवाल म्हणाले,”दक्षिण आशियामध्ये सर्वात मूल्यवान, जबाबदार आणि लाभदायक हॉस्पिटॅलिटी इको-सिस्टीम बनण्याच्या आमच्या ‘ऍक्सिलरेट २०३०’ या व्हिजनसह भारताच्या पर्यटन क्षमता पूर्णपणे वापरल्या जाण्याच्या आपल्या बांधिलकीसाठी आयएचसीएल ठाम आहे. आयएचसीएल नवीन ब्रँड लॉन्च करून आपल्या ब्रँडस्केपचा विस्तार करेल, विषम बाजारपेठ वातावरणाचा लाभ मिळवेल आणि २०३० पर्यंत आपला पोर्टफोलिओ ७०० हॉटेल्सपर्यंत वाढवेल. आपला कन्सॉलिडिटेड रेव्हेन्यू दुप्पट करून १५००० कोटी रुपयांपर्यंत वाढवेल, नवीन व्यवसायांना इतके पुढे वाढवले जाईल की रेव्हेन्यूमध्ये त्यांची हिस्सेदारी २५%+ असेल आणि जगभरात प्रशंसा केली जाणारी सेवा उत्कृष्टता कायम राखत उद्योगक्षेत्रात सर्वात जास्त मार्जिन आणि गुंतवणुकीवरील परतावा मिळवणे कायम राखेल.”
‘ऍक्सिलरेट २०३०’ अंतर्गत, पारंपारिक व्यवसाय आणि व्यवस्थापन शुल्कातून ७५% आणि नवीन, रीइमॅजिन्ड व्यवसायांमधून २५%+ सह टॉप-लाइन वाढीवर लक्ष केंद्रित केले जाईल. पारंपारिक व्यवसायांना RevPAR नेतृत्व, मालमत्ता व्यवस्थापन उपक्रम आणि विद्यमान मालमत्तेच्या इन्व्हेंटरी विस्ताराने सक्षम केले जाईल. व्यवस्थापन शुल्क २०३० पर्यंत रु. १००० कोटी ओलांडण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये ‘लाइक फॉर लाईक ग्रोथ’ आणि व्यवस्थापित इन्व्हेंटरीचा वाढता वाटा सर्वात जास्त असेल. जिंजर, क्युमिन, अमा स्टे अँड ट्रेल्स आणि ट्री ऑफ लाइफ सारखे नवीन व्यवसाय कॅपिटल लाइट मार्गाद्वारे वेगाने वाढतील, ३०%+ चा महसूल सीएजीआर वितरीत करतील, तर The Chambers आणि TajSeats चे रीइमॅजिन्ड व्यवसाय त्यांच्या वाढीचा वेग कायम ठेवतील.
श्री अंकुर दलवानी, कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य आर्थिक अधिकारी, आयएचसीएल यांनी सांगितले,”पुढील काही वर्षांमध्ये मजबूत रोख प्रवाह निर्माण करण्याच्या अपेक्षेसह आयएचसीएल नेट कॅशच्या बाबतीत सकारात्मक राहील. आमच्या भांडवल वाटप संरचनेमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये ५००० कोटी रुपयांपर्यंतच्या आऊटलेसह वर्तमान आणि भविष्यातील प्रतिस्पर्धी लाभ मजबूत करण्याच्या दिशेने गुंतवणुकीची कल्पना केली गेली आहे. ही गुंतवणूक वर्तमान संपत्ती आणि विस्तार योजनांमध्ये केली जाण्याची अपेक्षा आहे. आम्ही शेयरधारकांना पीएटीच्या २०% ते ४०% वाटप करण्याच्या आमच्या घोषित लाभांश धोरणासाठी देखील बांधील आहोत. त्यामुळे भविष्यातील ग्रीनफील्ड्स, वाढत्या अकार्बनिक संधी व धोरणात्मक रोख भांडारसाठी पुरेशी रोख शिल्लक राहील.”
ऑप्टिमम स्केल मिळवण्यासाठी, नवीन आणि रीइमॅजिन्ड ब्रँड्ससाठी सुस्पष्ट रस्ता बनवण्यासाठी आणि नवीन फॉरमॅट्स व कल्पना प्रस्तुत करण्यासाठी ब्रँडस्केपचा विकास सर्वाधिक महत्वपूर्ण असेल. यामध्ये ब्रँडेड रेसिडेन्सेससारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश आणि द क्लेरिजेस सारख्या नवीन ब्रँड्ससह ब्रँडस्केपचा विस्तार करणे यांचा समावेश आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये एका अनोख्या प्रस्तुतीसह पुढे जाण्याची ही एक संधी आहे.
पोर्टफोलिओचा विस्तार भारतीय उपखंडामध्ये आयएचसीएलचे नेतृत्व कायम राखेल. ताज ब्रँडसोबत फक्त कॅपिटल लाईट रूटवर लक्ष केंद्रित करत ग्लोबल गेटवे शहरांमध्ये हा ब्रँड आपले स्थान निर्माण करेल. ताज सेलेक्शन्स आणि विवांता आपली स्थिर वाढ कायम राखेल आणि दोन्ही मिळून पाईपलाईनमध्ये अजून १०० हॉटेल्सचे योगदान देतील. नवीन ग्राहक ट्रेंड्ससह प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांमध्ये विकास दर्शवत आमच्या नवीन ऍडिशन्समध्ये ७५% टी ऑफ लाईफ ब्युटिक लेजर, अपस्केल सेगमेंटमध्ये री इमॅजिन्ड गेटवे ब्रँड आणि मिड्स्केल सेगमेंटमध्ये जिंजर यांचा समावेश असेल