maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियाची इकोफायसोबत हा‍तमिळवणी


मुंबई, २० जून २०२४: जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियाने भारतातील हरित परिवर्तनाला आर्थिक साह्य करण्‍याप्रती कटिबद्ध एव्‍हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असलेली आघाडीची एनबीएफसी इकोफाय आणि तिची तंत्रज्ञान व लीजिंग शाखा ऑटोव्‍हर्टसोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केल्‍याची घोषणा केली. या सहयोगाचा जेएसडब्‍ल्‍यू एमजीच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी नवीन फायनान्सिंग पर्याय अनलॉक करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे अर्ध-शहरी व ग्रामीण भागांसह भारतभरातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वेईकल्‍स अधिक प्रमाणात उपलब्‍ध होतील.

पुढील तीन वर्षांमध्‍ये इकोफायसोबतचा सहयोग जवळपास १०,००० जेएसडब्‍ल्‍यू एमजी ईव्‍हींकरिता नाविन्‍यपूर्ण फायनान्सिंग व लीजिंग सोल्‍यूशन्‍स (ऑटोव्‍हर्टच्‍या पाठबळासह) देईल. यामध्‍ये जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियाच्‍या विद्यमान व आगामी इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी रिटेल ग्राहक व बी२बी ऑपरेटर्समधील आकर्षक कर्ज पर्याय आणि लीजिंग व्‍यवस्‍थांचा समावेश असेल.

आधुनिक काळातील ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा ओळखत इकोफाय आणि जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियासोबत ऑटोव्‍हर्टने नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने व संरचनांची सह-निर्मिती केली आहे, ज्‍यामध्‍ये सुलभ सबस्क्रिप्‍शन प्‍लान्‍सचा समावेश आहे. या नाविन्‍यपूर्ण ऑफरिंग्‍ज ग्राहकांना अद्वितीय स्थिरता, सोयीसुविधा व किफायतशीरपणा देत इलेक्ट्रिक पॅसेंजर वेईकल्‍सच्‍या जलद अवलंबतेला गती देण्‍याची अपेक्षा आहे.

इकोफायच्‍या सह-संस्‍थापक, व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला शाश्‍वत मोबिलिटीप्रती आमच्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न असलेली दूरदर्शी कंपनी जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. फायनान्‍समधील आमचे कौशल्‍ये आणि जेएसडब्‍ल्‍यू एमजीचे अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञान एकत्र करत आमचा अधिकाधिक ग्राहकांसाठी ईव्‍ही उपलब्‍ध करून देण्‍याचा, तसेच व्‍यक्‍ती व व्‍यवसायांना सोयीसुविधा किंवा किफायतशीरपणाबाबत तडजोड न करता हरित भविष्‍य अंगिकारण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.”

जेएसडब्‍ल्‍यू एमजी मोटर इंडियाचे चीफ ग्रोथ ऑफिसर गौरव गुप्‍ता म्‍हणाले, ”या सहयोगामधून भारतात इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या (ईव्‍ही) अवलंबतेला गती देण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण ईव्‍ही मालकीहक्‍क सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती जेएसडब्‍ल्‍यू एमजी इंडियाची कटिबद्धता दिसून येते. उद्योगामधील स्‍पेशालिस्‍ट्ससोबत सहयोगाने नाविन्‍यपूर्ण फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देत आम्‍ही अधिकाधिक ग्राहकांसाठी ईव्‍ही मालकीहक्‍क अधिक सुलभ व किफायतशीर करत आहोत. आम्‍ही शाश्‍वत गतीशीलतेला चालना देण्‍याप्रती आणि शुद्ध पर्यावरण व प्रबळ इलेक्ट्रिक मोबिलिटी इकोसिस्‍टम असण्‍याच्‍या सरकारच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

Related posts

शहानी ग्रुपच्‍या स्‍मार्ट इन्स्टिट्यूटचे यश

Shivani Shetty

इझमायट्रिपचा दसरा ट्रॅव्‍हल सेल

Shivani Shetty

सॅमसंगकडून पहिला एंटरप्राइज एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७’ (Galaxy Xcover7) लाँच, ज्‍यामध्‍ये आहे मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा, सतत काम करत राहण्‍याची क्षमता आणि सर्वोत्तम उत्‍पादकता

Shivani Shetty

Leave a Comment