maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोका-कोला इंडिया आणि एसएलएमजी बेव्‍हरेजेसने महाकुंभ २०२५ मध्‍ये सर्वात मोठ्या थंडगार पेय प्रदर्शनासाठी गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डसह इतिहास रचला

राष्‍ट्रीय, फेब्रुवारी २७, २०२५: उत्‍साह व नाविन्‍यतेचे मोठे यश गाठत कोका-कोला इंडिया आणि एसएलएमजी बेव्‍हरेजेसने थंडगार पेयांच्‍या सर्वात मोठ्या तात्‍पुरत्‍या प्रदर्शनासाठी गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डमध्‍ये आपले नाव कोरले आहे. प्रयागराजमधील महाकुंभमध्‍ये संपादित केलेल्‍या या विक्रमी यशामधून कंपन्‍यांची नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करण्‍यासह उत्‍साहवर्धक अनुभव देण्‍याप्रती समान दृष्टिकोन दिसून येतो.
२५० फूट लांबीच्या या प्रतिष्ठित प्रदर्शनात १०० दरवाज्यांची कूलर वॉल होती, ज्यामध्ये ३२,७३७ थंड बॉटल्‍स होत्या, जे या महाकुंभातील आकर्षणबिंदू ठरले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृतपणे मान्यता दिलेल्‍या या टप्‍प्‍यामधून कोका-कोला इंडिया आणि एसएलएमजी बेव्हरेजेसची सर्वोत्तमता, कार्यसंचालन व्‍याप्‍ती आणि या ऐतिहासिक मेळाव्यात लाखो अभ्यागतांसाठी अविस्मरणीय क्षण निर्माण करण्याची क्षमता याप्रती कटिबद्धता दिसून येते.
कोका-कोला इंडियाचे भारतातील कार्यसंचालनांचे उपाध्‍यक्ष सुंदीप बजोरिया म्‍हणाले, “आमच्‍या गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड-विजेत्‍या कूलर वॉलने नाविन्‍यता आणि अंमलबजावणीमध्‍ये नवीन जागतिक मापदंड स्‍थापित केला आहे. जगातील सर्वात मोठ्या महाकुंभमध्‍ये लाखो भक्‍त एकत्र आले असताना एसएलएमजी बेव्‍हरेजेससोबतच्‍या आमच्‍या सहयोगाने सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात हायड्रेशनची खात्री घेतली. हा सहयोग जागतिक दर्जाच्‍या महाकुंभमध्‍ये उत्तम सेवा देण्‍याप्रती उत्तरप्रदेश सरकारच्‍या प्रयत्‍नांशी संलग्‍न आहे, ज्‍यामधून जागतिक स्‍तरावर भारताचा वारसा दिसून आला आहे.”
एसएलएमजी बेव्‍हरेजेसचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कॉस्टिन मँड्रिया म्‍हणाले, “या नाविन्‍यतेमागे महाकुंभमध्‍ये आलेल्‍या लाखो भक्‍तांसाठी हायड्रेशनची खात्री घेण्‍याचा मनसुबा होता. कोका-कोला इंडियासोबत सहयोगाने स्‍थापित केलेल्‍या गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डमधून मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्‍याची, तसेच सर्वांसाठी थंडगार रिफ्रेश पेये उपलब्‍ध करून देण्‍याची एसएलएमजीची क्षमता दिसून येते. तसेच, या यशामधून नाविन्‍यता व दर्जात्‍मक हायड्रेशनप्रती आमची कटिबद्धता देखील निदर्शनास येते, ज्‍याला विकास व प्रभावासाठी समान दृष्टिकोनाद्वारे चालना मिळाली आहे.”
हा टप्‍पा जागतिक इव्‍हेण्‍ट्समध्‍ये मोठ्या प्रमाणात क्रियाकलाप राबवण्‍यासाठी प्रेरित करतो, ज्‍यामधून असे भव्‍य थंडगार पेय प्रदर्शन निर्माण करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली लॉजिस्टिकल अचूकता दिसून येते.

Related posts

टाटा मोटर्सकडून आपल्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या संपूर्ण श्रेणीसाठी डिजिटल मार्केटप्‍लेस ‘फ्लीट व्‍हर्स’ लाँच

Shivani Shetty

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी)ने महाराष्‍ट्रसह १०० शाळांमध्‍ये डिजिटल स्‍मार्टबोर्डस् स्‍थापित केले

Shivani Shetty

इकोफायची विद्युतसह हातमिळवणी

Shivani Shetty

Leave a Comment