मुंबई, ६ जानेवारी २०२५: देबाब्रता ऑरो फाउंडेशनने “द एस्थेटिक क्लिनिक्स” यांच्या सहकार्याने वरळी पोलीस स्टेशन येथे बुरशीजन्य संसर्ग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे उद्दिष्ट पोलीस अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेणे होते, जे त्यांच्या कठीण कामाच्या परिस्थितीमुळे बुरशीजन्य संसर्गाच्या जोखमीस सामोरे जातात. या शिबिरात त्वचारोग तज्ञांकडून सखोल तपासण्या, वैयक्तिक सल्ला व उपचार योजना पुरवल्या गेल्या. तसेच निदान झालेल्या प्रकरणांसाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. अधिकाऱ्यांना त्यांच्या भविष्यातील वैद्यकीय गरजांसाठी आरोग्य कूपन्स आणि व्हाऊचर्स देखील प्रदान करण्यात आले. याशिवाय, बुरशीजन्य संसर्ग आणि प्रतिबंधात्मक स्वच्छतेच्या महत्त्वावरही भर देण्यात आला.
या उपक्रमामुळे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवेसाठी सहज उपलब्धता सुनिश्चित झाली. मोफत सेवांमुळे आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि शिबिरादरम्यान घेतलेल्या शैक्षणिक सत्रांमुळे अधिकाऱ्यांना उत्तम आरोग्य राखण्यासाठी आवश्यक माहिती मिळाली.
देबाब्रता ऑरो फाउंडेशन आणि “द एस्थेटिक क्लिनिक्स” यांनी पुढाकार घेतला. पोलीस अधिकारी भेडसावणाऱ्या विशिष्ट आरोग्य समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या या प्रयत्नाने भविष्यात अशा सामुदायिक आरोग्य उपक्रमांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.