*मुंबई, २१ ऑक्टोबर २०२४:* फ्रीओ या भारताच्या आघाडीच्या डिजिटल फायनॅन्स अॅपने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) कडून कॉर्पोरेट एजंटचा परवाना मिळवला आहे. या महात्त्वाच्या घडामोडीमुळे आता फ्रीओ सर्वश्रेष्ठ विमा प्रदात्यांशी भागीदारी करून खास बनवलेली विमा उत्पादने आपल्या २५ मिलियन नोंदणीकृत यूझर्सना ऑफर करू शकेल.
या नवीन परवान्यासह फ्रीओ आता आपल्या युपीआय, कर्जे, बचत, इ. वर्तमान सेवांसोबत विमा उत्पादने सामील करून घेण्यासाठी विस्तार करत आहे. आपल्या नफाकारकतेच्या सिद्धीनंतर हे पाऊल वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून फ्रीओची स्थिती मजबूत करणारे आहे, ज्यात ग्राहकांना डिजिटल आर्थिक उत्पादनांचा एक संपूर्ण गुच्छ प्रदान करता येईल.
*फ्रीओचे सह-संस्थापक आणि सीईओ कुणाल वर्मा* यांनी सांगितले की “फ्रीओ येथे आम्हाला वाटते की, विमा हा सोपा, विश्वासार्ह आणि प्रत्येकाच्या आटोक्यातला असला पाहिजे. फ्रीओच्या ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्याच्या ध्येयाने एका संपूर्ण इंटीग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत एक सुलभ आणि सुरळीत अनुभव देण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत.”
फ्रीओ परवडण्याजोग्या आणि समजण्यास सोप्या विमा उत्पादनांची एक वैविध्यपूर्ण श्रेणी दाखल करत आहे. ही उत्पादने १२००+ शहरांमधील त्यांच्या २५ दशलक्षहून अधिक यूझर्ससाठी खास तयार करण्यात आली आहेत. यूझर्स आपल्या दैनंदिन जीवनात ज्या आर्थिक जोखमींना सामोरे जात असतात, त्या कमी करण्याच्या उद्देशाने ही उत्पादने बनवली आहेत.
ही विमा कव्हर्स विविध गरजा भागवण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहेत. या गरजा म्हणजे- महिलांच्या आरोग्यासाठी विशेष प्लान, आर्थिक बोजा कमी करण्यासाठी वर्तमान आरोग्य पॉलिसीवर टॉप-अपचे पर्याय आणि मलेरिया आणि डेंग्यूसारख्या सामान्य रोगांसाठीचे कव्हरेज. सायबर फसवणूक, नोकरी जाणे आणि अशा इतरही गोष्टींविरुद्ध संरक्षण देण्याची फ्रीओची योजना आहे आणि ते देखील खिशावरील भार फारसा न वाढवता व्यापक कव्हरेज ते देऊ इच्छितात.