maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फेडएक्सने वन स्टॉप शॉप लॉन्च केले

मुंबई, १६ डिसेंबर २०२४: फेडएक्स कॉर्पची साहाय्यक शाखा आणि जगातल्या सर्वात मोठ्या एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या फेडएक्सने फेडएक्स वन स्टॉप शॉप लॉन्च केले आहे. हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो शिपिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग सर्व्हिसेसपर्यंत पोहोच प्रदान करतो आणि अशाप्रकारे व्यवसायांसाठी जागतिक शिपिंग सुलभ करतो.

 

फेडएक्स वन स्टॉप शॉप हा प्लॅटफॉर्म ऑर्डर व्यवस्थापन, बुकिंग आणि ट्रॅक अँड ट्रेस या सर्व गोष्टी एकाच प्रणालीत घेऊन येतो आणि व्यवसायांना व्यापक दृष्टी आणि शिपमेंटवरील नियंत्रण प्रदान करतो. हा प्लॅटफॉर्म फेडएक्सवर संपर्काच्या एका बिंदूद्वारे सुव्यवस्थित ऑपरेशन्स सक्षम करतो, ज्यामुळे कित्येक माल फॉरवर्ड करणाऱ्यांच्या व्यवस्थापनाची जटिलता दूर होऊ शकते. शिवाय, तो व्यवसायांना आपल्या मागील शिपमेंटचा संग्रह करून ठेवण्याची मुभा देतो, ज्यामुळे लॉजिस्टिक्स प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होते.

 

फेडएक्स मिडल ईस्ट इंडिया सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिकाचे मार्केटिंग आणि एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “फेडएक्स वन स्टॉप शॉप हे डिजिटल-प्रेरित व्यवसायातील आमच्या रूपांतरातील एक लक्षणीय पाऊल आहे आणि आमच्या व्यापक ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कचे त्याला पाठबळ आहे. भारतात विकसित केलेले फेडएक्स वन स्टॉप शॉप हे शिपिंग आणि लॉजिस्टिक्स सेवांवर शिपमेंट बुक आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम बनवून अशा ग्राहकांसाठी क्षमता निर्माण करत आहे, ज्यांनी पायलटमध्ये भाग घेतला होता. हा प्लॅटफॉर्म इतर भागांमध्ये घेऊन जाताना आम्हाला आनंद होत आहे. तो व्यवसायांना त्यांची लॉजिस्टिक्स ऑपरेशन सोपी बनवून सुधारण्यास मदत करेल.”

 

निरंतर इनोव्हेशनमार्फत जागतिक वाणिज्य मागण्या पूर्ण करण्याबाबत फेडएक्स वचनबद्ध आहे. फेडएक्स डिलिव्हरी मॅनेजर आणि फेडएक्स इम्पोर्ट टूल यांसारखी डिजिटल सोल्यूशन्स कस्टमाइझ्ड डिलिव्हरी प्राथमिकता, केंद्रीकृत दस्तऐवजीकरण, ऑनलाइन पेमेंट पर्याय आणि इतर गोष्टी प्रदान करून शिपिंग प्रक्रिया सुलभ करतात आणि कार्यक्षमता आणि सुविधा वाढवतात. डिजिटल उत्कृष्टतेचा हा पाया फॉसचा मूल्य प्रस्ताव मजबूत करतो ज्यामुळे, व्यवसायांना आपले लॉजिस्टिक्स संचालन आणखी सुलभतेने आणि पारदर्शकतेने सुव्यवस्थित करण्यात मदत होते.

Related posts

ग्राहक डिजिटल सुरक्षिततेकरिता क्विक हीलकडून ‘व्‍हर्जन २४’ लाँच

Shivani Shetty

इंटरफेस व्हेंचर्सची एमईडीसीसह हातमिळवणी

Shivani Shetty

व्हिएतजेटकडून आकर्षक ट्रॅव्‍हल ऑफर्ससह इअर ऑफ द ड्रॅगनचे स्‍वागत!

Shivani Shetty

Leave a Comment