maharashtraprimenews
ठळक बातम्या
मुंबईव्यवसायसार्वजनिक स्वारस्य

पुनर्निर्मित सामग्री वापरुन लहान मुलांच्या खेळायच्या जागा बनविण्यासाठी FedEx आणि यूनायटेड वे, मुंबई एकत्र ६५०० मुलांना याचा फायदा मिळणार ‘प्लेस्केपस् प्रकल्पा’चे मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये पुनर्निर्मित सामग्रीचा वापर करून मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासास चालना देण्याचे लक्ष्य

भारत,११ नोव्हेंबर २०२२: FedEx Express, FedEx कॉर्पोरेशनची एक उपकंपनी (एन वायएसइ: एफडीएक्स) जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनीने युनायटेड वे, मुंबई या एन जी ओ सोबत एकत्र येऊन मुलांसाठी शाळांमध्ये ९ खेळायच्या जागा बांधण्याचे ठरविले आहे. त्यांची रचना टिकाऊपणा लक्षात घेऊन पुनर्निर्मित सामग्रीचा वापर करून करण्यात येणार आहे. या ‘प्लेस्केपस् प्रकल्पा’च्या माध्यमातून मुंबई, दिल्ली, एन सी आर भाग आणि बंगळूर मधील आर्थिक दृष्टीने गरीब भागांमधील जवळपास ६५०० शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सस्टेनेबल खेळाच्या जागा उपलब्ध होतील.
हा प्रकल्प मुलांनी सक्रिय, असंरचित आणि नियमबद्ध नसलेले मैदानी खेळ जास्त खेळण्याची सामाजिक गरज संबोधित करतो. या लहान मुलांसाठी योग्य, टिकाऊ आणि परस्पर संवादी खेळाच्या जागा ड्रम, सायकलींचे निघालेले टायर, खेळाच्या मैदानातील तुटलेल्या उपकरणांचे धातू अशा पुनर्निर्मित सामग्रीतून बनवल्या आहेत.
दिल्लीमधील वनपूल स्कूल,-मयूर विहार, एम सी डी प्रतिभा को एड स्कूल पुष्प विहार, फरीदाबादमधील पाली विलेज अँड गवर्नमेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूल-पाली, बंगळूर मधील जी एम पी एस-इम्मदी हळ्ळी, कर्नाटक पब्लिक स्कूल- जीवनभीमा नगर, गवर्नमेंट हायर प्रायमरी स्कूल- डोड्डाकान्नेळी, मुंबई मधील श्री. नारायणराव आचार्य विद्या निकेतन- चेंबूर, वंदे मातरम ग्राउंड मालवणी-मालाड आणि नवी मुंबई मधील ए पी भोईर स्कूल उळवे या शाळांमध्ये खेळाच्या जागा बनवल्या आहेत.
FedEx Express इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुवेन्दू चौधरी म्हणाले की, “FedEx मध्ये उपलब्धता म्हणजे केवळ व्यवसायांना जगातील संधींबरोबर जोडणे नाही तर येथे ते व्यवसायांसोबतच समाजाशी पण निगडीत आहे. आमचा हा प्रकल्प उपलब्धतेची ताकद दाखवून देत आहे ज्यामध्ये आम्ही आमची संसाधने आपल्या समाजाला अधिक राहण्या योग्य बनविण्यासाठी आणि गरजू मुलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी वापरली आहेत जेणेकरून त्यांना अधिक निरोगी आणि आनंदी बालपण मिळेल.”
यूनायटेड नेशन्सच्या अनुसार, प्रत्येक मुलाला आराम करण्याचा, निवांत राहण्याचा, खेळण्याचा आणि वयानुसार योग्य अशा मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आणि सांस्कृतिक जीवनात व कलांमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लहान मुलांच्या अधिकारात ‘खेळणे’ हा मूलभूत अधिकार मानला आहे.
युनायटेड वे मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज आयकारा म्हणाले की, “खेळणे हे बालपणातील एक महत्वाचा भाग आहे. आम्हाला वाटते की प्रत्येक मुलाला सुरक्षित, लहान मुलांसाठी योग्य अशा खेळाच्या जागा उपलब्ध व्हायला हव्या. FedEx चे आभार की आम्ही ज्या समुदायाला गरज आहे त्यांच्या मुलांसाठी अशा जागा उपलब्ध करून देऊ शकलो. या जागा मुलांच्या हसण्या खिदळण्याने भरून गेलेल्या पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत.”

Related posts

डीबीएस शस्त्रक्रियेनंतर येमेनच्या तरुणीला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागले*

Shivani Shetty

कोटक जनरल इन्शुरन्स आणत आहे Meter

Shivani Shetty

कारखान्याचा भूखंड आणि झटपट कर्ज मंजुरीमुळे रितेश-जिनिलिया देशमुख गोत्यात, कंपनीचं स्पष्टीकरण

cradmin

Leave a Comment