नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी २०२५: फॅण्टा हा कोका-कोला इंडियाचा स्वादिष्ट पेय ब्रँड नवीन कॅम्पेन ‘फॅण्टा मांगता’सह परतला आहे, ज्यामध्ये मोहक ब्रँड अॅम्बेसेडर कार्तिक आर्यन आहे. ही कॅम्पेन जनरेशन झेडच्या अद्वितीय आस्वादाप्रती प्रेमाला प्रशंसित करते, कारण यासारख्या स्वादिष्ट पेयाचा आस्वाद इतर कशामधूनही मिळणार नाही.
दशकांपासून फॅण्टा उत्साहवर्धक, स्वादिष्ट पेय राहिले आहे, तसेच कोणत्याही संकोचाशिवाय आनंद घेणाऱ्यांचे पसंतीचे पेय राहिले आहे. या कॅम्पेनसह ब्रँड स्वादामध्ये अधिक अद्वितीयतेची भर करत आहे, तसेच सर्वांना आतापर्यंतचे सर्वात स्वादिष्ट पेय फॅण्टाचा मनसोक्त आस्वाद घेण्यास प्रेरित करत आहे.
‘और कुछ नही मांगता, सिर्फ फॅण्टा मांगता’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणत या मोहिमेची जाहिरात एका क्षणाला सादर करते, ज्यामध्ये एकाच गोष्टीला प्राधान्य देण्यात आले आहे, ते म्हणजे फॅण्टाचा अद्वितीय स्वाद. आपली सिग्नेचर स्टाइल व मोहकतेसह कार्तिक आर्यनने प्रत्येक मूड, क्षण व आस्वादासाठी अल्टिमेट सोबती म्हणून फॅण्टाला प्राधान्य दिले आहे.
कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या सीनियर कॅटेगरी डायरेक्टर सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, ”तरूणांचे जीवन अत्यंत व्यस्त आहे, पण ते वेळात वेळ काढून त्यांच्या दैनंदिन स्वादांची पूर्तता करतात. फॅण्टाचा अद्वितीय स्वादिष्टपणा या स्वादांची पूर्तता करण्यासाठी परिपूर्ण आहे. नवीन कॅम्पेन ‘फॅण्टा मांगता’ धमाल व उत्साही ट्विस्ट आहे, जी किशोरवयीनांना वेळात वेळ काढून त्यांच्या स्वादांची पूर्तता करण्यास प्रेरित करते. कार्तिक आर्यनचा करिष्मा आणि १९८०च्या दशकातील संगीताला दिलेल्या नवीन रूपासह ही कॅम्पेन जुन्या आठवणींना ताजी करते, ज्यामध्ये जुना काळ आणि आधुनिक काळाचे उत्तम संयोजन आहे.”
स्टुडिओएक्स, आयएनएसडब्ल्यूएचे क्रिएटिव्ह हेड आणि व्हीएमएल इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर मुकुंद ओलेटी म्हणाले, ”तुम्हाला अद्वितीय स्वादाचा आनंद घ्यायचा असतो तेव्हा कितीही पैसा, सोने किंवा प्रसिद्धी त्याची पूर्तता करू शकत नाही. त्यासाठी गरज आहे फॅण्टाची. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही विलक्षण कथानक व संस्मरणीय गाथा सादर केली आहे, जे सर्वांना एकत्र आणते. मी याचे गुणगान करणे थांबवू शकत नाही.”
”फॅण्टा मांगता कॅम्पेनचा भाग असणे धमाल अनुभव आहे. फॅण्टा प्रत्येक क्षणाला आनंदी व उत्साहवर्धक करते. काहीही विचार न करता जीवनाचा आनंद घेणे आणि आपल्याला आवडणाऱ्या स्वादाची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे,” असे कॅम्पेनचा चेहरा कार्तिक आर्यन म्हणाले.
या सर्वांगीण कॅम्पेनचा टेलिव्हिजन व डिजिटल टचपॉइण्ट्सवर प्रचार करण्यात येईल, ज्यामधून रुची व उत्साही राहणीमानाबाबत नवीन अनुभव मिळेल.