मुंबई, ११ डिसेंबर २०२३: पेटीएम या ब्रॅण्डची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) नावाच्या भारतातील आघाडीच्या मोबाइल पेमेंट्स व वित्तीय सेवा वितरण कंपनीने आज आपल्या कर्ज वितरण व्यवसायाबद्दल ताजी माहिती व दृष्टीकोन सर्वांपुढे मांडला. अधिक रकमेची व्यक्तिगत व व्यापारी कर्जे देऊ करण्यासाठी आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. ही कर्जे, मोठ्या बँका व एनबीएफसींशी भागीदारी करून, कमी जोखमीच्या व उच्च पतअर्हता असलेल्या ग्राहकांना दिली जातील.
पोर्टफोलिओची दमदार कामगिरी आणि कर्जवितरणाला मिळत असलेली विस्तृत स्वीकृती यांमुळे कंपनीने गेल्या तिमाहीतच या दिशेने सुरुवात केली होती आणि सुरुवातीच्या कालखंडात प्रोत्साहक कल दिसत आहे.
अलीकडील व्यापक विकास व नियामक मार्गदर्शन यांच्या पार्श्वभूमीवर, कर्जदात्या सहयोगींच्या सल्ल्याने, पोर्टफोलिओ दमदार राखण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण उद्दिष्टाशी सुसंगती राखत कंपनीने ५०,००० रुपयांखालील कर्जांची पुनर्रचना केली आहे. ही प्रामुख्याने पोस्टपेड कर्ज उत्पादने आहेत आणि आता भविष्यकाळात कर्ज वितरण व्यवसायातील या कर्ज उत्पादनांचा वाटा कमी होणार आहे.
एमएसएमईंना व्यवसाय कर्जे म्हणून दिल्या जाणाऱ्या व्यापारी कर्जांवर पेटीएम यापुढेही भर देत राहणार आहे. ही कर्जे छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक कारणांसाठी दिली जात असल्याने, अलीकडील नियामक मार्गदर्शक तत्त्वांचा त्यावर परिणाम होत नाही.
पेटीएम प्रवक्ता म्हणाले, “कर्जवितरणाचा व्यवसाय प्रगल्भ होत असल्यामुळे उच्च मूल्याची व्यक्तिगत व व्यापारी कर्जे देऊ करण्याच्या नवीन संधी आम्हाला दिसत आहेत. आमच्या कर्जदात्या भागीदारांसाठी उच्च दर्जाचा पोर्टफोलिओ तयार करण्यावर आमचा भर सातत्याने असेल. त्याचबरोबर जोखीम व नियमांची पूर्तता याबाबत आम्ही शिस्तबद्धता राखू. आमच्या कर्ज वितरण व्यवसायाला मोठी व्याप्ती आणि स्वीकृती प्राप्त झाली आहे. त्यामुळे आमचा विस्तारही एक व्यवसाय म्हणून वाढ साध्य करण्यात आमच्यासाठी उपयुक्त ठरेल, असे आम्हाला वाटते.”