maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी यांची हॅबिट्समध्ये गुंतवणूक

मुंबई, ११ डिसेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉमचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी यांनी जिओ सिनेमावर प्रसारित होणारा शो ‘इंडियन एंजल्‍स’च्‍या माध्यमातून भारतातील दूरदर्शी ओरल केअर ब्रॅण्‍ड हॅबिट्समध्‍ये ६ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी म्‍हणाले, “ओरल केअर क्षेत्रात आधुनिक ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करणारी उत्‍पादने महत्त्वाची आहेत. बाजारपेठेत समकालीनपलीकडे जाणाऱ्या आणि विविध पसंतीची व आजच्‍या गतीशील जीवनशैलीची पूर्तता करणाऱ्या सोल्‍यूशन्‍सना अधिक मागणी आहे. तोंड आरोग्‍यदायी असणे हे सर्वांगीण आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहे आणि हॅबिट्समधील माझी गुंतवणूक उद्योगामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याप्रती धोरणात्‍मक पुढाकार आहे. हा निर्णय नाविन्‍यतेप्रती माझी कटिबद्धता आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या आरोग्‍याला प्राधान्‍य देणारी उत्‍पादने प्रदान करण्‍याप्रती समर्पिततेशी संलग्‍न आहे. माझा ओरल केअरला नव्‍या उंचीवर नेण्‍याच्‍या हॅबिट्सच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे, जे बाजारपेठेतील विकसित होत असलेल्‍या गरजांची पूर्तता करणाऱ्या नैतिक, शुद्ध व नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांचे अद्वितीय संयोजन देत आहेत.”

हॅबिट्स आपल्‍या नैतिक, शुद्ध व नाविन्‍यपूर्ण ओरल केअर उत्‍पादनांच्‍या माध्यमातून ओरल हेल्‍थ नित्‍यक्रमांचे आधुनिकीकरण व अपग्रेड करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. आजच्‍या व्‍यस्‍त जीवनशैलींमध्‍ये आधुनिक गरजांची पूर्तता करणाऱ्या उत्‍पादनांना अधिक मागणी असताना हॅबिट्स महत्त्वाची कंपनी म्‍हणून उदयास आली आहे, जी समकालीन ओरल केअर नियमांना दूर करत आहे.

हॅबिट्स व्‍यक्‍तींना तज्ञांचे पाठबळ असलेल्‍या नैतिक, शुद्ध व नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांसह त्‍यांच्‍या ओरल केअर नित्‍यक्रमांचे आधुनिकीकरण व अपग्रेड करण्‍यास मदत करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. ब्रॅण्‍डचा विश्‍वास आहे की, सुधारित ओरल हेल्‍थमधून अधिक प्रामाणिक आश्‍वासन, निःसंदिग्ध करुणा आणि प्रामाणिक संबंधाची खात्री मिळते. हॅबिट्सची उत्‍पादने शुद्ध, उच्‍च-कार्यक्षम घटकांसह तयार करण्‍यात आली आहेत आणि बारकाईने चाचणी करण्‍यात आली आहेत.

श्री. रिकांत पिट्टी यांच्‍या हॅबिट्समधील धोरणात्‍मक गुंतवणूकीमधून ग्राहकांच्या विकसित गरजांची पूर्तता करणाऱ्या उद्यमांना ओळखण्‍यासह पाठिंबा देण्‍यामधील त्‍यांची दूरदृष्‍टी दिसून येते. शोमधील इतर दिग्‍गजांसोबत सामील होत श्री. पिट्टी यांचा हॅबिट्सला ओरल केअर क्षेत्रात यश व नाविन्‍यतेच्‍या दिशेने घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे.

Related posts

ABB ने यंत्रीकरण के लिए डिजिटल संपत्ति प्रदर्शन प्रबंधन प्लेटफॉर्म लॉन्च किया

Shivani Shetty

SMFG इंडिया क्रेडिट तर्फे ६ व्या पशु विकास दिनानिमित्त १ लाखांहून अधिक गुरांवर उपचार; दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारताच्या पश्चिम भागात आपल्या ‘ग्रेट 4X4 एक्सपीडीशन ’च्या दुसऱ्या झोनल ड्राइव्हला फ्लॅग ऑफ केले

Shivani Shetty

Leave a Comment