maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील अव्‍वल ८ गृहनिर्माण बाजारपेठांमध्ये प्रबळ वाढ कायम

मुंबई, डिसेंबर २०२३: भारतातील आघाडीच्‍या आठ निवासी बाजारपेठांनी कॅलेंडर वर्षाच्‍या तिसऱ्या तिमाहीदरम्‍यान (जुलै ते सप्‍टेंबर २०२३) विक्रीमध्‍ये २२ टक्‍के आणि नवीन पुरवठ्यामध्‍ये १७ टक्‍क्यांची वाढ केल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. चेन्‍नई वगळता सर्व शहरांनी विक्रीत वाढीची नोंद केली, जेथे मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पुणे यांचे एकूण आकारमानामध्‍ये जवळपास निम्‍मे योगदान होते. 

आरईए इंडियाची मालकीहक्‍क असलेली आणि हाऊसिंग डॉटकॉम व मकान डॉटकॉमची मूळ कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉम या आघाडीच्‍या डिजिटल रिअल इस्‍टेट ब्रोकरेज कंपनीने आपला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३’ जारी केला. या अहवालामधून निदर्शनास येते की, निवासी सदनिकांची विक्री तिसऱ्या तिमाहीमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील ८३,२२० युनिट्सवरून १,०१,२२० युनिट्सपर्यंत वाढली आहे.

प्रॉपटायगर डॉटकॉमच्या त्रैमासिक अहवालात दिल्ली-एनसीआर, एमएमआर, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या आठ प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठांचा मागोवा घेण्‍यात आला आहे.

आरईए इंडियाचे सीएफओ आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्‍यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्‍हणाले, “अव्‍वल आठ शहरांमधील गृहनिर्माण बाजारपेठांनी विकासाची गती कायम ठेवली आहे. प्रबळ मागणीचे श्रेय सकारात्‍मक ग्राहक भावनेला जाते. श्री. वाधवान यांनी विक्रीमधील वाढीचे प्रमुख स्रोत म्‍हणून वाढती मागणी, वाढते डिस्‍पोजेबल उत्‍पन्‍न, स्थिर व्‍याजदर आणि नवीन गुंतवणूकदार मागणी यांसारख्‍या घटकांना निदर्शनास आणले.”

प्रॉपटायगर डॉटकॉम डेटामधून निदर्शनास येते की, अहमदाबादमधील वार्षिक गृहनिर्माण विक्रीत ३१ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ७,८८० युनिट्सवरून १०,३०० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील विक्रीत ६० टक्‍क्‍यांच्‍या अधिकतम वाढीसह ७,८९० युनिट्सवरून १२,५९० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. दिल्‍ली-एनसीआरने विक्रीमध्‍ये ५,४३० युनिट्सवरून ७,८०० युनिट्सपर्यंत ४४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. हैदराबादमधील विक्रीत १०,५७० युनिट्सवरून १४,९९० युनिट्सपर्यंत ३४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. कोलकातामधील विक्रीत ४३ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, ज्‍यामुळे सदनिकांच्‍या विक्रीत २,५३० युनिट्सवरून ३,६१० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विक्रीत २८,८०० युनिट्सवरून ३०,३०० युनिट्सपर्यंत फक्‍त ५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, ज्‍यासाठी उच्‍च मूल्‍य कारणीभूत आहे. पुण्‍यातील विक्रीत १५,७०० युनिट्सवरून १८,५६० युनिट्सपर्यंत १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. चेन्‍नई ही एकमेव बाजारपेठ आहे, जेथे विक्रीत १२ टक्‍क्‍यांची घट झाली आहे, ज्‍यामुळे सदनिकांच्‍या विक्रीत ४,४२० युनिट्सवरून ३,८७० युनिट्सपर्यंत घट झाली.

 

विक्री (२०२३ ची तिसरी तिमाही वि. २०२२ ची तिसरी तिमाही): 

त्रैमासिक विक्री 
शहर  २०२३ २०२२ तिमाही-ते-तिमाही वार्षिक
२०२३ ची तिसरी तिमाही २०२३ ची दुसरी तिमाही २०२२ ची तिसरी तिमाही
अहमदाबाद          १०,३००         ,४६०         ,८८० २२ टक्‍के ३१ टक्‍के
बेंगळुरू          १२,५९०         ,७८०         ,८९० ८६ टक्‍के ६० टक्‍के
चेन्‍नई            ,८७०         ,०५०         ,४२० २७ टक्‍के १२ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर            ,८००         ,२३०         ,४३० १४१ टक्‍के ४४ टक्‍के
हैदराबाद          १४,१९०         ,६९०      १०,५७० ८५ टक्‍के ३४ टक्‍के
कोलकाता            ,६१०         ,९४०         ,५३० ८६ टक्‍के ४३ टक्‍के
मुंबई          ३०,३००      ३०,२६०      २८,८०० ० टक्‍के ५ टक्‍के
पुणे          १८,५६०      १८,८४०      १५,७०० २ टक्‍के १८ टक्‍के
भारत  ,०१,२२०      ८०,२५०      ८३,२२० २६ टक्‍के २२ टक्‍के

स्रोत रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३, हाऊसिंग रिसर्च

श्री. वाधवान पुढे म्‍हणाले, “नामांकित विकासकांसंदर्भात मागणीसह बाजारपेठेत वाढ होत आहे, ज्‍यामुळे गृहखरेदीदारांमध्‍ये बांधकाम सुरू असलेल्‍या प्रकल्‍पांबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्‍हती. तिसऱ्या तिमाहीमध्‍ये विक्री करण्‍यात आलेले १४ टक्‍के युनिट्स रेडी टू मूव्ह इन होते आणि विक्री करण्‍यात आलेल्‍या ३१ टक्‍के युनिट्सची किंमत १ कोटी रूपयांहून अधिक होती.”

नवीन पुरवठ्यासंदर्भात अहमदाबाद १६,६७० युनिट्सपर्यंतच्‍या मोठ्या वाढीसह अग्रस्‍थानी आहे, तर इतर शहरांनी मिश्रित ट्रेण्‍ड्स दाखवले. पण, एकूण स्थिती सकारात्‍मक राहिली, जेथे आठ बाजारपेठांमधील लाँचेस् १७ टक्‍क्‍यांची वाढ होत १२३,०८० नवीन युनिट्सपर्यंत पोहोचले.

नवीन पुरवठ्यामध्‍ये अहमदाबाद अग्रस्‍थानी:

त्रैमासिक नवीन पुरवठा
शहर २०२३ २०२२ तिमाही-ते-तिमाही वार्षिक
२०२३ ची तिसरी तिमाही २०२३ ची दुसरी तिमाही २०२२ ची तिसरी तिमाही
अहमदाबाद          १६,६७०          २१,५००            ,१९० २२ टक्‍के १०४ टक्‍के
बेंगळुरू          १४,३६०            ,०००          १४,६१० ८० टक्‍के २ टक्‍के
चेन्‍नई            ,७००            ,६३०            ,९३० २० टक्‍के ६ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर            ,८१०            ,२४०            ,३४० ६१ टक्‍के ७ टक्‍के
हैदराबाद          २०,४८०          ११,९६०          २७,४३० ७१ टक्‍के २५ टक्‍के
कोलकाता            ,८५०            ,५००            ,४१० १० टक्‍के ६० टक्‍के
मुंबई          ३५,९२०          ३३,३३०          २८,८८० ८ टक्‍के २४ टक्‍के
पुणे          २१,१९०          २६,६१०         १३,०३० २० टक्‍के ६३ टक्‍के
भारत  ,२३,०८०  ,१३,७७०  ,०४,८२० ८ टक्‍के १७ टक्‍के

स्रोत रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३, हाऊसिंग रिसर्च

Related posts

वीगन कॉस्‍मेटिक्‍स उद्योग २०२८ पर्यंत २४ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा

Shivani Shetty

MobilTM प्रथमच साजरा करत आहे MotoGP™️ भारत पॉवरिंगद्वारे रेड बुल केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम

Shivani Shetty

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सहाव्या ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेसचे उदघाटन

Shivani Shetty

Leave a Comment