maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

महिला किसान दिवस साजरा करत कोका-कोलाची महिला शेतकऱ्यांना कलात्‍मक मानवंदना

नवी दिल्‍ली, ऑक्‍टोबर २०२४: महिला किसान दिवस साजरा करत कोका-कोला इंडियाने महिला शेतकऱ्यांचे उल्‍लेखनीय योगदान (tribute to the remarkable contributions of women farmers) आणि शाश्‍वत कृषीप्रती त्‍यांच्‍या प्रवासाला मानवंदना अर्पण करण्‍यासाठी प्रतिष्ठित चित्रकार पीएस राठोड यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. कलात्‍मक कॅन्‍व्‍हास भारतातील विविध राज्‍यांमधील पाच महिला शेतकरी – रेजिना, राणी, सुवर्णा, प्रीती आणि बसंती यांच्‍या जीवनाला लक्षवेधक चित्रांच्‍या माध्‍यमातून सादर करते.

या उपक्रमाची खासियत म्‍हणजे स्थिरता व परिवर्तनाच्‍या प्रेरणादायी गाथा. कोडागूमध्‍ये, राणी यांनी ओसाड जमिनीला संपन्‍न कॉफी मळ्यांमध्‍ये बदलले, त्‍यांच्‍या वैयक्तिक जीवनातील मोठ्या दु:खाला बाजूला ठेवत प्रगतीशील उद्योग सुरू केला आणि स्थिर उत्‍पन्‍न कमावले. त्‍यांची समर्पितता व नेतृत्‍वामुळे त्‍यांची मादिकेरी हायलँड्स फार्मर्स प्रॉड्युसर्स कंपनीसाठी बोर्ड संचालकपदी निवड करण्‍यात आली. दरम्‍यान, कोल्‍हापूरमध्‍ये सुवर्णा यांचा अल्‍पभूधारक शेतकरीपासून यशस्‍वी उद्योजिकापर्यंतच्‍या प्रवासामधून शाश्‍वत पद्धतींची क्षमता दिसून येते. त्‍यांनी गांडूळखाताचा नाविन्‍यपूर्ण पद्धतीने वापर करत जमिनीची सुपीकता वाढवली, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या ऊस व भाजीपाला उत्‍पन्‍नांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली.

या महिला शाश्‍वत कृषीमध्‍ये प्रमुख असण्‍यासोबत त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये परिवर्तनाच्‍या महत्त्वपूर्ण एजंट्स देखील आहेत. उत्तम कृषी पद्धतींचा (जीएपी) अवलंब करत त्‍या अन्‍न सुरक्षितता वाढवण्‍यासोबत त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या स्‍वास्‍थ्‍यामध्‍ये सुधारणा करत आहेत, रोजगार निर्माण करत आहेत आणि स्‍थानिक उद्योजकतेला चालना देत आहेत, ज्‍यामधून महिलांचा कृषीक्षेत्रातील प्रभाव दिसून येतो.

या प्रकल्‍पाबाबत मत व्‍यक्‍त करत चित्रकार पी. एस. राठोड म्‍हणाले, ”हे स्‍केचेस् (चित्रे) तयार करण्‍याचे आव्‍हान कलात्‍मक होते. चित्रांच्‍या माध्‍यमातून या महिलांमधील शौर्य व नाविन्‍येतेला कॅप्‍चर करण्‍याची संधी मिळाली. मी आशा करतो की, माझ्या कलाकृतीमधून त्‍यांच्‍यामधील क्षमता आणि भारतातील कृषीच्‍या शाश्‍वत भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये त्‍या बजावणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येतील.”

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशिया (आयएनएसडब्‍ल्‍यूए)च्‍या सीएसआर व सस्‍टेनेबिलिटीचे वरिष्‍ठ संचालक राजेश अयापिल्‍ला म्‍हणाले, ”महिला शेतकरी समुदायांमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आम्‍हाला कृषीप्रती त्‍यांच्‍या महत्त्वपूर्ण योगदानाला पाठिंबा देण्‍याचा अभिमान वाटतो. आनंदन, कोका-कोला इंडिया फाऊंडेशनसोबत गेल्‍या दशकभरात केलेल्‍या कामाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही प्रत्‍यक्ष पाहिले आहे की या महिलांना सक्षम केल्‍यास कृषी पद्धतींमध्‍ये नाविन्‍यता व स्थिरतेला चालना मिळेल. त्‍यांच्‍या समर्पिततेमुळे कुटुंबांना उदरनिर्वाह मिळण्‍यासोबत त्‍यांच्‍या इकोसिस्‍टममधील समुदायासाठी उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवणे सुकर झाले आहे.”

आनंदन, कोका-कोला इंडिया फाऊंडेशनसोबत सहयोगाने कोका-कोला इंडियाची #SheTheDifference मोहिम प्रोजेक्‍ट उन्‍नती सारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती आमच्‍या दीर्घकालीन कटिबद्धतेच्‍या गाथांना सादर करते. हा उपक्रम शेतकऱ्यांना साह्य करण्‍यासोबत आवश्‍यक असलेली संसाधने व प्रशिक्षण मिळण्‍यामध्‍ये मदत करतो.

Related posts

इझमायट्रिपने चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

Shivani Shetty

‘आम्‍ही पेटीएम सोडत नाही आहोत’ असे बिबा, हॉटस्‍पॉट रिटेल प्रा. लि. आणि अरविंद लिमिटेड यांसारखे कंपनीचे सर्वात मोठे मर्चंट्स म्‍हणाले; सर्वोत्तम पेमेंट्ससाठी कंपनीवरील विश्‍वास कायम

Shivani Shetty

कबड्डीची गरज परत येते: दबंग दिल्ली क.सी. ने ४ वर्षांनंतर राजधानीत उत्साह फुंकलंय

Shivani Shetty

Leave a Comment