maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोका-कोलाकडून ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपद्वारे धोरणात्‍मक गुंतवणूक केल्‍याची घोषणा

राष्‍ट्रीय, डिसेंबर ११, २०२४: कोका-कोला कंपनीने आज विविध क्षेत्रांमध्‍ये जागतिक उपस्थिती असलेला मल्‍टी-बिलियन समूह ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपसोबत करार केल्‍याची घोषणा केली आहे. या करारांतर्गत भारतातील सर्वात मोठी कोका-कोला बॉटलर हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् प्रा. लि.ची मूळ कंपनी हिंदुस्‍तान कोका-कोला होल्डिंग्‍ज प्रा. लि. मध्‍ये ४० टक्‍के हिस्‍सा संपादित करण्‍यात येईल.

कोका-कोला ग्राहकांना उच्‍च दर्जाची उत्‍पादने व अनुभव देण्‍याप्रती दीर्घकाळापासून कटिबद्ध आहे आणि भारतात उपलब्‍ध असलेल्‍या संधींमध्‍ये गुंतवणूक करत शाश्‍वत, दीर्घकालीन विकासाला गती देत आहे.

कोका-कोलाचे भारतातील स्‍थानिक मालकीहक्‍क असलेले फ्रँचायझी सहयोगी यशस्‍वी निष्‍पत्ती देण्‍यास सज्‍ज आहेत. ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपद्वारे गुंतवणूक कंपनीच्‍या विद्यमान यशामध्‍ये योगदान देईल आणि भारतीय बाजारपेठेतील कंपनीचे स्‍थान अधिक दृढ करण्‍यास मदत करेल.

कोका-कोला इंडियाचे अध्‍यक्ष संकेत राय म्‍हणाले, ”आम्‍ही भारतातील कोका-कोला सिस्‍टममध्‍ये ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपचे स्‍वागत करतो. विविध क्षेत्रांमधील वैविध्‍यपूर्ण अनुभवासह ज्‍युबिलण्‍टला दशकभराचा संपन्‍न अनुभव आहे, ज्‍यामुळे कोका-कोला सिस्‍टमला गती मिळण्‍यास मदत होईल, तसेच आम्‍ही बाजारपेठेत यश संपादित करण्‍यास आणि स्‍थानिक समुदाय व ग्राहकांना उत्तम मूल्‍य देण्‍यास सक्षम होऊ.”

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेसचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जुआन पाब्‍लो रॉड्रिग्‍ज म्‍हणाले, ”या धोरणात्‍मक गुंतवणूकीमधून आमच्‍या प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा निदर्शनास येतो. ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपचे कौशल्‍य आमच्‍या क्षमतांशी पूरक आहे, ज्‍यामधून खात्री मिळते की आम्‍ही भागधारकांना अपवादात्‍मक मूल्‍य देत आहोत, तसेच नाविन्‍यता आणि शाश्‍वत प्रगतीला गती देत आहोत.”

ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपचे संस्‍थापक व अध्‍यक्ष श्‍याम एस. भारतीय आणि संस्‍थापक व उपाध्‍यक्ष हरी एस. भारतीय म्‍हणाले, ”ही गुंतवणूक त्‍यांच्‍या व्‍यवसायामध्‍ये योग्‍य भर आहे. कोका-कोला कंपनी काही प्रतिष्ठित जागतिक ब्रँड्सचे आश्रयस्‍थान आहे आणि आम्‍हाला त्‍यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.” भारतीय पुढे म्‍हणाले, ”सहयोगाने, आम्‍ही संधींचा फायदा घेत व्‍यवसायाला नव्‍या उंचीवर घेऊन जाऊ आणि अधिकाधिक भारतीय ग्राहक कोका-कोला कंपनीच्‍या प्रतिष्ठित स्‍थानिक व आंतरराष्‍ट्रीय ब्रँड्सच्‍या उत्‍साहवर्धक पोर्टफोलिओचा आनंद घेऊ शकण्‍याची खात्री घेऊ.”

हे परिवर्तन आणि गुंतवणूक कोका-कोलासाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे कंपनी जगभरातील व्‍यक्‍तींना रिफ्रेश करण्‍यासह परिवर्तन घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

Related posts

इझमायट्रिपची तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी

Shivani Shetty

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कुर्ला विधानसभेत मेगा शिबिरांचे आयोजन.

Shivani Shetty

भारतातील स्‍पोर्टस् हायड्रेशनमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत लिम्‍काकडून लिम्‍का स्‍पोर्टझ आयन४ (ION4) लाँच

Shivani Shetty

Leave a Comment