कम्पेन जाहिरात: https://www.youtube.com/watch?v=_oI_B0OBgVw
गुरूग्राम, २७ सप्टेंबर २०२४ – कोका-कोला कंपनी आणि मार्वलने लिमिटेड-एडिशन पॅकेजिंग आणि सर्वोत्तम कथानक असलेली सिनेमॅटिक जाहिरात लाँच करत आपल्या धाडसी सहयोगाची घोषणा केली.
या अनोख्या सहयोगाअंतर्गत कोका-कोला आणि कोका-कोला झीरो शुगर बॉटल्स व कॅन्सवर मार्वल युनिव्हर्समधील अँट-मॅनपासून कॅप्टन अमेरिकापर्यंत ३० हून अधिक कॅरेक्टर्सचे सर्वोत्तम चित्रण पाहायला मिळेल, जे सफेद, लाल व काळा या रंगांच्या योग्य संतुलनासह सादर करण्यात आले आहेत. स्कॅन करता येणारे क्यूआर कोड्स प्रत्येक हिरो किंवा व्हिलनसाठी ऑगमेण्टेड रिअॅलिटी (एआय) अॅनिमेशन अनुभव अनलॉक करतात, जेथे ग्राहक सर्व ८ कॅरेक्टर्स गोळा करून विशेष मार्वल® पोस्टर डाऊनलोड करू शकतात.
या सहयोगाला जागतिक ब्रँड फिल्मद्वारे संचालित सर्वोत्तम, बहुआयामी मोहिमेचे पाठबळ आहे. या जाहिरातीमध्ये, एक महिला नकळतपणे संपूर्ण कॉमिक बुक विश्वाला धोक्यामध्ये टाकते, ज्यानंतर त्यांचे रक्षण करण्यासाठी कोका-कोलाची ‘रिअल मॅजिक आणि मार्वल युनिव्हर्स’ एकत्र येतात.
चाहत्यांना कॅरेक्टर असलेले कॅन्स गोळा करण्याची संधी आहे. पॅकेजिंग स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे, जेथे ते कोका-कोला आणि मार्वल कॅरेक्टर्ससोबत आनंदमय क्षणांचा अनुभव घेऊ शकतात.