मुंबई, फेब्रुवारी २४, २०२५: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपनीने एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हांटेज (HDFC Life Click 2 Achieve Par Advantage) हे आपले नवीनतम उत्पादन सर्वांसमोर आणले आहे. व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांशी निगडित उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून हे पार्टिसिपेटिंग उत्पादन तयार करण्यात आले आहेत. व्यक्ती त्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा/उद्दिष्टांसाठी सातत्याने बचत करत असतात आणि त्यांचे प्राधान्य सुरुवातीच्या टप्प्यापासून रोखता (लघुकालीन गरजांसाठी), लवचिकता आणि भविष्यकाळासाठी आर्थिक सुरक्षितता यांना असते, असे निरीक्षण आहे.
एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हांटेज पुढील सुविधांनी युक्त आहे:
● पॉलिसी कंटिन्युअन्स बेनिफिट (पीसीबी) – विमाकृत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या पर्यायाच्या माध्यमातून भविष्यकाळातील हप्ते माफ केले जातात. डेथ बेनिफिट तत्काळ एकरकमी दिला जातो आणि योजनेखालील भविष्यकालीन लाभही नामनिर्देशित व्यक्ती किंवा मागे राहिलेल्या व्यक्तीला मिळत राहतात.
● चॉइस ऑफ डेथ बेनिफिट मल्टिपल – या सुविधेमुळे डेथ बेनिफिट घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार ५ पट, ७ पट किंवा ११ पट अशा पर्यायांमध्ये निवडण्याची मुभा मिळते.
● पेड अप अॅडिशन – या पर्यायामुळे पेड-अप अॅडिशनमध्ये दिला जाणारा रोख बोनस अंशत: किंवा पूर्णत: रूपांतरित करणे शक्य होते. त्यामुळे पेड अप अॅडिशन्सचे पॉलिसीच्या मुदतीत कधीही रोख रकमेत रूपांतर होऊ शकते.
ग्राहक त्यांच्या भविष्यकाळातील गरजांनुसार हे पर्याय कोणत्याही संगतीमध्ये (कॉम्बिनेशन) निवडू शकतात.
कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक विमा संरक्षणासह ही योजना पुढील बाबीही देऊ करते:
अतिरिक्त आयुर्विमा संरक्षण– याद्वारे विमा काढणाऱ्या व्यक्तीला जोडीदारासाठी संरक्षण घेण्याची मुभा मिळते.
करविषयक लाभ – प्रचलित कर कायद्यांच्या आधारे व्यक्तींना हे लाभ लागू होतात.
आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला आयुर्विमा संरक्षण आवश्यक आहे. एचडीएफसी लाइफ ही कंपनी आयुर्विमा (life insurance) क्षेत्रात नवोन्मेष्कारी कस्टमाइझ करण्याजोगी उत्पादने देऊ करत आहे. भारतीय ग्राहकाच्या सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या गरजांची पूर्तता ही उत्पादने करतात. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार अनेक सेवापर्याय पुरवणारा ठोस डिजिटल प्लॅटफॉर्म कंपनी देऊ करते. दावे चुकते करण्याचे सातत्यपूर्ण व वाढते प्रमाण एचडीएफसी लाइफची ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी दाखवून देते. आर्थिक वर्ष २४ मध्ये हे प्रमाण ९९.५० टक्के होते.
एचडीएफसी लाइफच्या प्रोडक्ट्स अँड सेगमेंट्स विभागाचे प्रमुख अनीश खन्ना या उत्पादनाबद्दल म्हणाले, “आयुर्विमा उत्पादने ही प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित केलेली असावीत, असे एचडीएफसी लाइफला वाटते. या गरजा व्यक्तीचे वय, आयुष्यातील टप्पा, वर्तमान उत्पन्न व भविष्यकाळातील योजना यांवर अवलंबून असतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच घराची खरेदी, मुलांना प्रतिष्ठेच्या शिक्षणसंस्थांमध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेऊन देणे यांसारखी उद्दिष्टे साध्य करणे ही प्रत्येक व्यक्तीची स्वप्नं असतात. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एखाद्या साधनामार्फत दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असते. हे साधन लवचिकता, रोखता व आर्थिक सुरक्षितता देणारे असावे लागते. अधिक चांगला भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक सुरक्षा उपायांच्या मदतीने अनिश्चिततांपासून आयुष्याचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील व्यक्तींना एक साधन पुरवण्याच्या उद्देशाने एचडीएफसी लाइफ क्लिक टू अचीव्ह पार अॅडव्हाण्टेज हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे.”