२१ जानेवारी, २०२५: कोका-कोला, बॉटलिंग सहयोगी एसएलएमजी बेव्हरेजेसच्या साथीने, महाकुंभ २०२५चा अनुभव अधिक उंचीवर नेण्यास सज्ज आहे. जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक संमेलनांपैकी एक असलेल्या महाकुंभमेळ्यात सजलीकरण (हायड्रेशन), ग्राहकांची सोय व स्थानिक समुदायांसाठी आर्थिक संधी यांचे अखंडित एकत्रीकरण याद्वारे साध्य केले जात आहे. कोट्यवधी उपस्थितांसाठी सोहळा अधिक उत्कृष्ट करण्यासोबतच अर्थपूर्ण सामाजिक व पर्यावरणविषयक प्रभावाला चालना देण्याचेही लक्ष्य कंपनीपुढे आहे.
महाकुंभमेळ्याच्या मैदानांमध्ये रिटेल व वितरणाचे भक्कम जाळे तैनात करून, कोका-कोला इंडिया व एसएलएमजी बेव्हरेजेस, पेयांचे विविध पोर्टफोलिओ सहजगत्या उपलब्ध होतील याची काळजी घेत आहेत. स्थानिक व्हेण्डर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या पेयांच्या गाड्या (हायड्रेशन कार्टस्), मोक्याच्या ठिकाणी लावलेले कूलर्स तसेच स्थानिक विक्रेते, कचरावेचक, छोटे व्यवसाय व उपजीविकेची साधने यांना आधार देण्यासाठी फूड कोर्टस् व रिटेल दुकानांसोबत केलेल्या भागीदारी यांमुळे वाढीच्या व रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे, त्याचबरोबर एकंदर अनुभवही अधिक चांगला होत आहे.
एसएलएमजी बेव्हरेजेसच्या दक्षिण उत्तरप्रदेश विभागाचे विभागीय उपाध्यक्ष लबानयेंदू मिश्रा म्हणाले, “उत्तर प्रदेशातील या भव्य सांस्कृतिक उत्सवादरम्यान लक्षावधी लोकांना ताजेतवाने राहण्यात मदत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावता येणे एसएलएमजी बेव्हरेजेससाठी आनंदाची बाब आहे. आम्ही मेळ्याच्या संपूर्ण परिसरात अभ्यागतांसाठी टचपॉइंट्स निर्माण करून ग्राहकांना पेयांचे पर्याय पुरवत आहोत. मग ते हायड्रेशन कार्टसच्या माध्यमातून असो, अफलातून फूड कोर्टसमधील उपलब्धतेच्या माध्यमातून असो किंवा पहिल्यावहिल्या १०० डोअर कूलर वॉलच्या किंवा भव्य त्रिमितीय ओडीएच डिसप्लेज, सेल्फी झोन्स व कूलर वॉल्सच्या माध्यमातून असो. स्थानिक स्वादांशी जोडून घेऊन आम्ही आमचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ सादर करत आहोत. आम्ही रिटेल उत्पादनांच्या उपलब्धतेचा सुयोग्य वापर करत आहोत आणि पुरवठा साखळी कार्यक्षम राहील याची काळजी घेत आहोत, जेणेकरून ग्राहक ताजेतवाने राहावेत, त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहावी. त्याचप्रमाणे आम्ही स्थानिक व्यवसायांमध्येही योगदान देत आहोत आणि या भव्य उत्सवाच्या एकंदर यशातही योगदान देत आहोत.”
स्थानिक विक्रेत्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कचरा व्यवस्थापनाच्या उपक्रमांच्या माध्यमातून रोजंदारीवरील कामगारांना सहाय्य करणे आणि खाद्यपदार्थ व पेयांच्या रिटेल विक्रेत्यांसाठी व्यवसायवाढीला चालना देणे यांद्वारे कोका-कोला इंडिया प्रयागराजच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. त्याचप्रमाणे छोट्या व्यवसायांचे सक्षमीकरण व प्रादेशिक आर्थिक विकासाची जोपासनाही करत आहे.
महाकुंभ २०२५ मधील कोका-कोलाच्या सहभागाची ठळक वैशिष्ट्ये:
● रिफ्रेशमेंटच्या माध्यमातून समुदायांना जोडणे: कोका-कोला, थम्स अप, स्प्राइट, माझा, फॅण्टा, किनले, मायन्युट मेड व चार्ज्ड यांसह पेयांच्या अनेकविध पोर्टफोलिओंसह कोट्यवधी उपस्थितांना ताजेतवाने करणे आणि जोडून घेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हायड्रेशन कार्टस् व फूड कोर्ट अॅक्टिव्हेशन्सच्या माध्यमातून दर ४०० मीटर अंतरावर उत्पादने उपलब्ध असतील. त्यामुळे सहभागी झालेल्यांना संपूर्ण उत्सवादरम्यान ताजेतवाने राहणे शक्य होईल.
● महाकुंभ विशेष पॅकेजिंग: भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी आम्ही निवडक पेयांसाठी महाकुंभ या विषयावरील पॅकेजिंग आणले आहे. ही विशेष डिझाइन्स म्हणजे कोका-कोलाच्या जागतिक आकर्षणाशी परंपरेचा मेळ घालणारी विशेष स्मृतिचिन्हे ठरत आहेत.
● आकर्षक उपक्रम: हायड्रेशन कार्टस्, चैतन्यपूर्ण फूड कोर्ट अॅक्टिव्हेशन्स, भव्य त्रिमितीय ओओएच डिसप्ले, सेल्फी झोन्स व कूलर वॉल्स यांसारख्या अनन्यसाधारण अनुभवांचा आनंद उपस्थितांना लुटता येत आहे. या उपक्रमांमुळे वातावरणातील उत्साहात भर पडत आहे आणि कुंभमेळ्यातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची लज्जत कोका-कोलाच्या पेयांमुळे वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
● शाश्वतता केंद्रस्थानी: सध्या चाललेल्या कुंभमेळ्यादरम्यान, कोका-कोला इंडिया रिव्हर्स व्हेण्डिंग मशिन्समार्फत (आरव्हीएम) शाश्वततेप्रती बांधिलकी दाखवून देत आहे. मोक्याच्या ठिकाणी पीईटी कचरा पुनर्वापरासाठी आरव्हीएम्स बसवण्यात आली आहेत, स्वच्छता कर्मचारी व स्वयंसेवकांना रिसायकल्ड पीईटी जॅकेट्स देण्यात आली आहेत, स्त्रियांची कपडे बदलण्याची खोली पूर्णपणे रिसायकल्ड बहुस्तरीय प्लास्टिक कचऱ्यापासून तयार करण्यात आली आहे.