maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इकोफायचा टीव्‍हीएस मोटर कंपनीसोबत सहयोग

मुंबई, १० ऑक्टोबर २०२४: इकोफाय या एव्‍हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असण्‍यासोबत भारतीय रिटेल क्षेत्रातील क्‍लायमेट फायनान्‍स पोकळी दूर करण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या भारतातील ग्रीन-ओन्‍ली एनबीएफसीने दुचाकी व तीनचाकी विभागांमध्‍ये कार्यरत आघाडीची जागतिक ऑटोमेकर टीव्‍हीएस मोटर कंपनीसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्‍या इलेक्ट्रिक ३डब्‍ल्‍यू (तीनचाकी) क्षेत्रात या धोरणात्‍मक सहयोगाचा इलेक्ट्रिक तीन-चाकी अवलंबतेला गती देण्‍याचा आणि देशभरात शाश्‍वत गतीशीलतेला चालना देण्‍याचा मनसुबा आहे.

 

इकोफायच्‍या सह-संस्‍थापक, व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार म्‍हणाल्‍या, ”टीव्‍हीएस मोटर कंपनीसोबतचा हा सहयोग भविष्‍यात शुद्ध ऊर्जा संपादित करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे आणि आम्‍हाला पॅसेंजर व कार्गो इलेक्ट्रिक तीनचाकींसाठी सर्वसमावेशक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यास सक्षम करेल. टीव्‍हीएस मोटरचा व्‍यापक उद्योग अनुभव, प्रबळ वितरण नेटवर्क आणि स्‍थापित ब्रँड प्रतिष्‍ठेचा फायदा घेत इकोफाय ईव्‍ही फायनान्सिंग क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. आम्‍हाला आर्थिक वर्ष २०२५ मध्‍ये मोठ्या विकासाची अपेक्षा आहे, जो आमच्‍या विस्‍तारीकरण प्रवासामधील मोठा टप्‍पा आहे आणि आम्‍ही आमच्‍या फायनान्सिंग कार्यसंचालनांमध्‍ये वाढ करत आहोत.’

 

टीव्‍हीएस मोटर कंपनीच्‍या कमर्शियल मोबिलिटीचे व्‍यवसाय प्रमुख रजत गुप्ता म्‍हणाले, ”इकोफाय सोबतचा सहयोग आमचे उत्‍पादन कौशल्‍य व त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण आर्थिक सेवा एकत्र करण्‍याची संधी देतो. सहयोगाने, आमचा विकासाला गती देण्‍याचा, नाविन्‍यतेला चालना देण्‍याचा आणि इलेक्ट्रिक तीन-चाकी विभागात ग्राहकांना अद्वितीय मूल्‍य देण्‍याचा मनसुबा आहे. हा सहयोग शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेशी देखील संलग्‍न आहे.”

 

इकोफाय आणि टीव्‍हीएस मोटर कंपनी टीव्‍हीएस इलेक्ट्रिक वेईकल्‍स अधिक उपलब्‍ध होण्‍याजोगे व किफायतशीर करण्‍यासाठी सानुकूल फायनान्सिंग योजना लाँच करत आहे. या सर्वोत्तम ऑफरिंग्‍जचा ईव्‍ही अवलंबतेला गती देण्‍याचा आणि भारतातील ईव्‍ही फायनान्सिंगच्‍या भविष्‍याला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा उद्देश आहे.

Related posts

फेडएक्सचा एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायाकरिता उपक्रम

Shivani Shetty

कोटकने मेट्रो ३ अॅक्‍वा लाइनच्‍या बीकेसी स्‍टेशनला कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन असे ब्रँड नाव दिले

Shivani Shetty

चौथ्‍या तिमाहीत हायरिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा: टीमलीज स्‍टाफिंग

Shivani Shetty

Leave a Comment