पुणे, ऑक्टोबर २०, २०२३ – हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) या भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने विविध अपस्किलिंग उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५,५०० व्यक्तींना सक्षम करण्याच्या उद्देशाने बहुआयामी उपक्रमाला चालना देण्यासाठी वाय४डी फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. कंपनीने लोटे, वाडा, पिरंगुट येथील १४ गावांमध्ये विविध सामुदायिक विकास उपक्रम राबवण्याची देखील घोषणा केली. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने पुण्यामध्ये वाय४डी फाऊंडेशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोमेण्ट कॉन्क्लेव्ह येथे हा उपक्रम लाँच केला.
एचसीसीबी ५,५०० व्यक्तींपैकी ३,००० महिलांना महत्त्वाच्या आर्थिक व डिजिटल साक्षरता कौशल्यांसह सुसज्ज करेल. तसेच, कंपनी व्यापक विक्री व विपणन प्रमाणन उपक्रमाच्या माध्यमातून २,५०० तरूणांना प्रशिक्षण देईल. कंपनी लोटे, वाडा आणि पिरंगुट येथील १४ गावांमध्ये शुद्धपिण्याचे पाणी, शाश्वत कृषी पद्धती, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, नागरीक सेवा केंद्रे (एनएसके) आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा या क्षेत्रांतपरिवर्तनशील विकास प्रकल्प राबवणार आहे.
आर्थिक साक्षरता प्रशिक्षणामध्ये बँकिंग बेसिक्स, खाते उघडण्याची प्रक्रिया, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्रशिक्षण, गुंतवणूकमार्गदर्शन, नेट बँकिंग आणि बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या सम रिद्धी योजना नारी शक्ती यांसारख्या महिलांसाठीच्या विविध सरकारीयोजनांची माहिती या मुलभूत संकल्पनांचा समावेश असेल. दुसरीकडे, डिजिटल साक्षरता घटकामध्ये या महिलांना डिजिटल युगात यशस्वीहोण्यासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज करण्याकरिता मोबाइल बँकिंग, डिजिटल मार्केट लिंकेज आणि सायबर सुरक्षा व सुरक्षितता यांसारख्या विषयांचा समावेश असेल. हे प्रशिक्षण देशभरातील निवडक ठिकाणी क्लासरूम-आधारित स्वरूपात आयोजित केले जाईल. लाभार्थींना त्यांच्या आवडी, गरजा आणि सध्याच्या डिजिटल व आर्थिक साक्षरतेच्या पातळीवर आधारित गटांमध्ये विभागण्यात येईल आणित्यांना प्रशिक्षण दिले जाईल. अधिक एकाग्र आणि कार्यक्षम अध्ययन अनुभवाला चालना देणे या उपक्रमाचा उद्देश आहे.
तसेच, विक्री व विपणन प्रमाणन उपक्रमामध्ये नुकतेच पदवीधर झालेले आणि पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तसेच १८ वर्ष व त्यावरील वयोगटातील महाविद्यालयामधून बाहेर पडलेले विद्यार्थी अशा विविध सहभागींचा समावेश असेल. तीन महिन्यांच्या या उपक्रमामध्ये सर्वसमावेशक ३०-तासांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असेल आणि हा उपक्रम सहभागींना सर्वोत्तम अध्ययन अनुभव देईल, ज्यामध्ये ६ तासांचे समोरासमोर इंटरअॅक्शन्स आणि २४ तासांच्या सर्वसमावेशक ऑनलाइन सत्रांचा समावेश असेल.
या उपक्रमांबाबत आपले मत व्यक्त करत महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”माझा विश्वास आहे की, उद्योग व समुदाय विकास एकमेकांशी संलग्न असले पाहिजे आणि एचसीसीबीचे उपक्रम या विकासाला अधिक दृढ करतात. मी अशा महाराष्ट्राचा दृष्टिकोन आखला आहे, जेथे लिंग किंवा पार्श्वभूमीकडे न पाहता प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्यास साधने व संधी मिळतील. महिलांना आर्थिक व डिजिटल साक्षर करण्यासह तरूणांना विक्री व विपणनामध्ये अपस्किल करण्यावर भर देत हे उपक्रम व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षांना चालना देतील, तसेच आपल्या राज्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीप्रती योगदान देखील देतील.”
चीफ पब्लिक अफेअर्स, कम्युनिकेशन्स अॅण्ड सस्टेनेबिलिटी ऑफिसर श्री. हिमांशू प्रियदर्शी म्हणाले, ”आम्हाला उद्योगाने सामाजिक-आर्थिक क्षेत्राला चालना देण्यामध्ये बजावण्याची महत्त्वाची भूमिका माहित आहे. आमचे बहुआयामी अपस्किलिंग उपक्रम आर्थिक व डिजिटल क्षेत्रांमधील लैंगिक असमानतेला दूर करतील, तसेच आजच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या व्यवसाय क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरूणांना आवश्यक विक्री व विपणन साधने प्रदान करतील. लोटे, वाडा व पिरंगुटमधील सामुदायिक विकास उपक्रम सर्वांगीण विकासाप्रती आमच्या अविरत कटिबद्धतेला दृढ करतात. आज, आम्ही महाराष्ट्रात शाश्वत व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याचे वचन घेतो, तसेच व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षांशी संलग्न राहत आमचे उपक्रम प्रगत करण्याची खात्री घेत आहोत.”
About HCCB
HCCB was incorporated on February 14, 1997. Since then, HCCB has come a long way in being able to serve 25 lakh retailers, 3,500 distributors, and 6,000 employees. 250,000 farmers grow the agricultural produce that HCCB uses in making its products. The company is headquartered in Bangalore and its operations are spread in 22 states, 3 UTs, and 376 districts in South, West, and Eastern India. Through its 16 factories spread across India, it manufactures and sells 60 different products across 7 categories. Its products include some of India’s most loved beverages – Coca-Cola, Thums Up, Sprite, Minute Maid, Maaza, SmartWater, Kinley, Limca, Fanta, and a lot more.