मुंबई, फेब्रुवारी २५, २०२५ – कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) आज परिवर्तनात्मक नवीन ग्रुप ब्रँड तत्त्व ‘हौसला है तो हो जायेगा’ सादर केले, जी कोटकसाठी महत्त्वपूर्ण मोहिम आहे. हे प्रबळ नवीन ग्रुप ब्रँड तत्त्व बँक म्हणून विकसित होण्यासोबत महत्त्वाकांक्षी भारतीयांसाठी प्राधान्य आर्थिक सेवा संस्था म्हणून स्वत:ला स्थापित करण्याप्रती कोटकची कटिबद्धता अधिक दृढ करते. हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी कोटक टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट, आऊटडोअर व सोशल मीडियावर उच्च-प्रभावी मल्टी-चॅनेल मार्केटिंग मोहिम राबवत आहे. या मोहिमेचा भारतीयांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.
ही मोहिम लाँच करत कोटक महिंद्रा बँकेचे अफ्लूएण्ट, एनआरआय, बिझनेस बँकिंगचे अध्यक्ष – प्रमुख आणि प्रमुख विपणन अधिकारी रोहित भासिन म्हणाले, “हौसला है तो हो जायेगा’ ब्रँड तत्त्व असण्यासोबत कोटकमधील मोठ्या उपक्रमाच्या दिशेने पहिले पाऊल देखील आहे. या तत्त्वामधून आम्ही व्यवसायामध्ये आणत असलेली नवीन ऊर्जा आणि आमचा महत्त्वाकांक्षी विश्वास दिसून येतो, जेथे योग्य आर्थिक सहयोगीचा पाठिंबा मिळाल्यास असाधारण निष्पत्ती मिळू शकतात. कोटकमध्ये अनेक साहसी परिवर्तनांची ही फक्त सुरूवात आहे, जे आम्ही महत्त्वाकांक्षी भारतीयांना देणाऱ्या सेवेला नवीन आकार देतील.”
प्रगतीसाठी महत्त्वाकांक्षा महत्त्वाची असण्याच्या काळामध्ये कोटक युनिफाइड तत्त्वांतर्गत वैविध्यपूर्ण व्यवसायांना एकत्र आणत आहे, जे मोठे विचार करण्याचे, मोठे स्वप्न पाहण्याचे आणि आत्मविश्वासासह कृती करण्याचे धाडस दाखवणाऱ्यांशी सखोलपणे संलग्न आहे. स्थापना झाल्यापासून कोटकला या विविध तत्त्वांमधून मार्गदर्शन मिळाले आहे, कोटकाइट्सना मोठे स्वप्न पाहण्यास आणि आत्मविश्वासासह कृती करण्यास प्रेरित करत आहे. ‘हौसला है तो हो जायेगा’मध्ये हा विश्वास सामावलेला आहे, जो जीवनाच्या सर्व स्तरांमधील भारतीयांचा आशावाद, महत्त्वाकांक्षा आणि धैर्याला दर्शवतो. कोटकमध्ये आमचा विश्वास आहे की ही मोहिम अमाप क्षमतेला प्रशंसित करते, जी देशभरातील सर्व व्यक्तींना सक्षम करेल.
कोटक महिंद्रा बँकेचे मार्केटिंग विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष केदारस्वामी रावनगवे म्हणाले, “आमच्या परिवर्तनाची पहिली झलक म्हणजे ही डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोन असलेली उच्च-स्तरीय, सर्वांगीण मोहिम आहे, जी आजच्या महत्त्वाकांक्षी भारतीयांच्या जीवनशैलीमध्ये विनासायासपणे एकीकृत होण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. सोशल व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील साहसी कथानकापासून प्रिंट, आऊटडोअर व टेलिव्हिजनवरील लक्षवेधक उपस्थितीपर्यंत ‘हौसला है तो हो जायेगा’ व्यक्तींना आत्मविश्वासासह प्रेरित करण्याचा आणि आगामी परिवर्तनासाठी पाया रचण्याचा आमचा मार्ग आहे. आणि ही फक्त सुरूवात आहे.”
ही कोटकसाठी नवीन अध्यायाची सुरूवात आहे, जेथे परिवर्तन सतत होत आहे, महत्त्वाकांक्षा अमर्यादित आहेत आणि प्रत्येक पुढाकाराला विश्वासाचा पाठिंबा आहे, तो म्हणजे ‘हौसला है तो हो जायेगा’सह सर्वकाही शक्य आहे.
