maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ओबेन इलेक्ट्रिकद्वारे ‘फ्रीडम ऑफर’ ची घोषणा

मुंबई, २ ऑगस्ट २०२४: भारताच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, ओबेन इलेक्ट्रिक या परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या भारतीय ब्रँडने ‘फ्रीडम ऑफर’ ची घोषणा केली आहे. संपूर्णपणे भारतीय, संपूर्णपणे इलेक्ट्रिक ओबेन रोरवर तब्बल २५,००० रुपयांची विशेष सूट दिली जात आहे. ओबेन रोरची मूळ किंमत १,४९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे, आता ग्राहकांना ही फ्लॅगशिप बाईक फक्त १,२४,९९९ रुपये या विशेष एक्स-शोरूम किमतीला विकत घेता येणार आहे. मर्यादित काळासाठीची ही ऑफर १५ ऑगस्टपर्यंत देशभरातील सर्व ओबेन इलेक्ट्रिक शोरूम्समध्ये उपलब्ध राहील. अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आकर्षक किमतीमध्ये लाभ घेण्याची अतुलनीय संधी ग्राहकांना उपलब्ध करवून देण्यात आली आहे.

सामान्य बाईक्सपेक्षा वेगळी, अतिशय अनोखी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या ओबेन इलेक्ट्रिकने देशाचा स्वातंत्र्यदिन या विशेष ऑफरसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे. आपल्या ग्राहकांना प्रदूषण, इंधनाचा महागडा खर्च आणि देखभालीचा त्रास या सर्वांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रँडने अतिशय विचारपूर्वक ही ऑफर तयार केली आहे. भारतीय ब्रँड असल्याचा गर्व बाळगणाऱ्या ओबेन इलेक्ट्रिकने नावीन्य व आपल्या देशाचा भक्कम निर्धार यांचे प्रतीक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ओबेन रोर ही त्यांची फ्लॅगशिप बाईक, भारतात डिझाईन, विकसित करून, इथेच तयार केली गेली आहे. ‘मेक इन इंडिया’ चे प्रभावी प्रतीक असलेली ओबेन रोर देशाची प्रगती आणि अधिक स्वच्छ व अधिक हरित भविष्याप्रती देशाची बांधिलकी दर्शवते. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिली जात असलेली ही ऑफर ओबेन इलेक्ट्रिकची पर्यावरणस्नेही मोबिलिटीला चालना देण्याप्रती बांधिलकी दर्शवते, इतकेच नव्हे तर, ग्राहकांनी स्वदेशी तंत्रज्ञान उत्कृष्टतेला स्वीकारावे यासाठी प्रोत्साहन देखील देते.

अतुलनीय कामगिरी आणि पर्यावरणात्मक शाश्वतता प्रदान करण्यासाठी तयार कार्नाय्त करण्यात आलेली ओबेन रोर अवघ्या तीन सेकंदांमध्ये ० ते ४० किमी प्रति तास इतके ऍक्सिलरेट करू शकते, याची ८ किलोवॅट मोटर १०० किमी प्रति तास इतका कमाल वेग देऊ शकते. यातील अत्याधुनिक लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी तंत्रज्ञान (बाजारपेठेतील पहिले) याचा जीवनकाल दुपटीने वाढवते, ५०% जास्त हीट रेसिस्टन्स देते आणि पारंपरिक आयसीई मोटरसायकल व इतर ईव्हीच्या तुलनेत पर्यावरणावर खूपच कमी प्रभाव निर्माण करते.

ओबेन इलेक्ट्रिकचे एलएफपी तंत्रज्ञान रोरची कामगिरी वाढवते, इतकेच नव्हे तर, पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या कोबाल्ट आणि निकेल खाणींची गरज देखील संपवते. शाश्वततेप्रती कंपनीची बांधिलकी फक्त मोटरसायकलच्या ऑपरेशनल जीवनकाळापुरती मर्यादित नाही तर ही कंपनी डेडिकेटेड रिसायकलिंग प्रोग्राम, एनर्जी स्टोरेज सिस्टिमसाठी रिटायर्ड बॅटरीजचा वापर आणि कचरा कमी करून उपयुक्तता वाढवणे अशा उपाययोजना देखील कंपनी पुरवते.

याची सर्टिफाईड रेन्ज १८७ किमी (आयडीसी) आहे, त्यामुळे ओबेन रोरसोबत असताना रेन्जची चिंता करावी लागत नाही, रायडरला कोणत्याही मर्यादांविना आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याचे स्वातंत्र्य मिळते. दमदार कामगिरी आणि पर्यावरणस्नेही असा मिलाप असल्याने ओबेन रोर बाईक ही उच्च दर्जाची इलेक्ट्रिक बाईक हवी असणाऱ्यांसाठी उत्तम निवड आहे.

Related posts

”भारतातील तरूण दजद􏰂 ार झोपले ा पर्ाधान्य दण्े यास उत्सकु आहते ”: मग्ॅ नीफ्लक्क्े स स्लीप इंडक्े स

Shivani Shetty

गणेशोत्‍सव साजरीकरणादरम्‍यान यामाहाकडून आकर्षक ऑफर्स

Shivani Shetty

नवीन वर्ष, आरोग्‍यदायी वर्ष: २०२४ मध्‍ये मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी ५ संकल्‍प

Shivani Shetty

Leave a Comment