maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ओटीटीवरील जगातील पहिला एंजल इन्व्हेस्टमेंट शो ‘इंडियन एंजल्स’ लॉन्च

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३: ओटीटीवरील जगातील पहिला एंजल गुंतवणूक शो ‘इंडियन एंजल्‍स’चा बहुप्रतिक्षित प्रीमियर ३ नोव्‍हेंबर रोजी जिओसिनेमावर प्रसारित झाला. हा शो दर आठवड्याला दोन एपिसोड्स प्रसारित करेल, ज्‍यामधून प्रेक्षकांना सहभागी असलेल्‍या स्‍टार्टअप्‍सशी संलग्‍न होण्‍याची अद्वितीय संधी देण्‍यात येईल.

इंडियन एंजल्‍स त्‍याच्‍या नाविन्‍यपूर्ण गोष्‍टींसाठी ओळखला जातो, ज्‍यामध्‍ये कुशल व्‍यवसाय प्रमुखांचे पॅनेल आहे, ज्‍यांनी लहान शहरांमध्‍ये त्‍यांचा उद्योजकता प्रवास सुरू केला आहे, तसेच संपन्‍न स्‍टार्टअप्‍स निर्माण केले आहेत. प्रतिष्ठित पॅनेलमध्‍ये कायनेटिक ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अजिंक्‍य फिरोदिया, इन्‍शुरन्‍सदेखोचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अंकित अग्रवाल, शोबीतमच्‍या सह-संस्‍थापक व चीफ प्रॉडक्‍ट ऑफिसर अपर्णा त्‍यागराजन, व्‍हॅल्‍यू ३६० चे संस्‍थापक व संचालक कुणाल किशोर, इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी आणि टी.ए.सी. – द आयुर्वेद कं.च्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्रीधा सिंग या मान्‍यवरांचा समावेश आहे.

डिजिकोअर स्‍टुडिओजचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिषेक मोरे शोच्‍या लाँचबाबत उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, “आम्‍हाला उद्या दोन सुरूवातीच्‍या एपिसोड्सच्‍या रीलीजसह शो ‘इंडियन एंजल्‍स’ सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही काही दिवसांपूर्वी शोचे अनावरण केल्‍यापासून सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेत, स्‍टार्टअप विकासामधील त्‍यांची सखोल रूची जाणून घेत हा शो बारकाईने निर्माण केला आहे. तसेच आम्‍ही खात्री घेतली आहे की, शो मनोरंजनपूर्ण असण्‍यासह अॅक्‍सेसेबल असेल, ज्‍यामुळे प्रेक्षकांना त्‍यांच्‍या आवडत्‍या स्‍टार्टअप्‍सच्‍या विकासामध्‍ये सक्रियपणे सहभाग घेता येईल. आमचा विश्वास आहे की, यामधून सर्वांना अद्वितीय अनुभव मिळेल आणि आम्‍ही प्रेक्षकांच्‍या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहोत.”

शो ‘इंडियन एंजल्‍स’ उल्‍लेखनीय संकल्‍पना सादर करतो, जी पारंपारिक एंजल गुंतवणूक टेलिव्हिजन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणते. हा शो प्रेक्षकांना अनुभवी व्‍यवसाय एंजल्‍ससोबत गुंतवणूक करत सहभागी स्‍टार्टअप्‍सच्‍या यशामध्‍ये सक्रियपणे सहभाग घेण्‍याची संधी देतो. हा नाविन्‍यपूर्ण दृष्टीकोन प्रेक्षकांना सर्वसमावशेक मनोरंजन देण्‍यासह उद्योजकता प्रवासाचा भाग होण्‍यास सक्षम करतो. यामुळे मनोरंजन व गुंतवणूकीमधील पोकळी दूर होते, ज्‍यामुळे हा शो सर्वांना अद्वितीय व सर्वसमावेशक अनुभव देतो.

Related posts

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाचा आयआयटी कानपूरशी सामंजस्य करार: विद्यार्थी आणि शिक्षक सॅमसंगच्या साथीने व्हिज्युअल, आरोग्य, एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर संयुक्त संशोधन हाती घेणार

Shivani Shetty

व्हिएतजेट एव्हिशनच्‍या २०२३ फायनान्शियल्‍समधून दिसून येते वर्षभरात केलेली वाढ आणि विस्‍तारीकरण

Shivani Shetty

डिजिकोअरची अँकर गुंतवणूकदारांकडून निधी उभारणी

Shivani Shetty

Leave a Comment