maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओजने घडवला इतिहास

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३: पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओज या जागतिक दर्जाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) स्टुडिओने ऐतिहासिक घटनाक्रमाद्वारे अत्यंत महत्त्वपूर्ण पल्ला सर केला आहे. यशस्वीरित्या आयपीओ बाजारात आणल्यानंतर या  कंपनीने भारताच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे एसएमई आयपीओ सबस्क्रिप्शन प्राप्त केले आहे. कंपनी आता तिच्या विलक्षण प्रवासातील नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीचे समभाग १७१ रूपयांच्‍या इश्‍यू किमतीच्‍या तुलनेत एनएसई इमर्जवर २७० रूपयांवर सूचीबद्ध झाले आहे, ज्‍यामधून ५७.८ टक्‍के प्रिमियम वाढ दिसून येते.

डिजिकोअर स्टुडिओजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मोरे म्हणाले, “हा विलक्षण टप्पा पार केल्यामुळे आम्ही थरारून गेलो आहोत. आमच्या गुंतवणूकदारांचा प्रचंड विश्वास व पाठिंबा यातून दिसून येतो. भारतातील व्हीएफएक्स व अॅनिमेशन उद्योग विलक्षण अशा रूपांतरणाचा अनुभव घेत आहे. सिनेमा, टीव्ही व जाहिरात क्षेत्रामध्ये उच्च श्रेणीच्या दृश्य अनुभवाची मागणी वाढत असल्यामुळे या उद्योगाला चालना मिळत आहे. सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक महत्त्वाकांक्षी व कल्पक प्रकल्प हाती घेण्याची क्षमता आम्हाला प्राप्त झाली आहे.”

सप्टेंबर २०२३ मध्ये कंपनीने आयपीओ बाजारात आणल्यानंतर गुंतवणूक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अगदी पहिल्याच दिवशी कंपनीच्या आयपीओंचे १८.७८ पट ओव्हरसबस्क्रिप्शन झाले. रिटेल गुंतवणूकदारांनी लक्षणीय उत्साह दाखवत त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या भागाच्या तब्बल ३२.७३ पटींनी ओव्हरसबस्क्राइब केले. तर बिगरसंस्थात्मक खरेदीदारांनीही उत्सुकता दाखवत १५.०२ पट ओव्हरसबस्क्राइब केले. अर्हताप्राप्त संस्थात्मक खरेदीदारांनीही (क्यूआयबी) दृढ विश्वास दाखवत त्यांच्यासाठी राखीव भागाच्या ७.०९ पट सबस्क्राइब केले.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस डिजिकोअरचा आयपीओ तब्बल ६५.५९ पटींनी ओव्हरसबस्क्राइब झाला होता. व्हीएफएक्स उद्योगातील भावी आघाडीची कंपनी म्हणून कंपनीने आपले स्थान भक्कम केले होते. अखेरच्या दिवशी खरोखर कळस गाठला गेला. अविश्वसनीय वाटेल अशा २४३.११ पट ओव्हरसबस्क्रिप्शनसह अर्जांचे मूल्य ५,४११ कोटी रुपयांवर गेले. गुंतवणूकदारांनी तब्बल ३१,६४,२७,२०० इक्विटी समभागांसाठी बोली लावली. हा आकडा १३,०१,६०० एवढ्या एकूण प्रस्तावित समभागांच्या तुलनेत कितीतरी अधिक होता. डिजिकोअरचा आयपीओ अलीकडील काळातील सर्वांत लोकप्रिय आयपीओंपैकी एक असल्याचे या मागणीमुळे स्पष्ट झाले.

अभिषेक मोरे पुढे म्हणाले, “भारतीय व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन क्षेत्र उज्ज्वल भविष्यकाळासाठी सज्ज आहे. हे क्षेत्र २० टक्के ते २५ टक्के एवढा दमदार सीएजीआर साध्य करणार आहे आणि २०२५ सालापर्यंत या क्षेत्राचे बाजारपेठेतील मूल्य १९० अब्ज रुपयांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. डिजिकोअरमध्ये आम्ही केवळ या आश्वासक भवितव्याचे साक्षीदार न होता, त्याला सक्रियपणे आकार देत आहोत. आमच्या यशस्वी आयपीओतून मिळालेल्या संसाधनांच्या माध्यमातून व्हिज्युअल इफेक्ट्स व अॅनिमेशनच्या कक्षा विस्तारण्यासाठी, उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करण्यासाठी आणि भारतातील व्हीएफएक्स क्षेत्राला लक्षणीय योगदान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही पुढील काही वर्षांत व्हिज्युअल इफेक्ट्स व अॅनिमेशनच्या क्षेत्रात आणखी चाकोरीबाह्य काम करण्यास उत्सुक आहोत.”

Related posts

कॅनडातून भारतातील बिल पेमेंट करणे झाले सोपे

Shivani Shetty

टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट २०२४ के विजेता घोषित

Shivani Shetty

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

Leave a Comment