maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एचपीसीएल आणि टाटा मोटर्सकडून जेन्‍यूएन डीईएफ लाँच करण्‍यासाठी सहयोग केला

मुंबई, ५ मार्च २०२५: महारत्‍न ऑईल कंपनी हिंदुस्‍तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) आणि भारतातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी टाटा मोटर्स यांनी त्‍यांचे को-ब्रॅण्‍डेड जेन्‍यूएन डिझेल एक्‍झॉस्‍ट फ्लूईड (डीईएफ) लाँच करण्‍यासाठी सहयोग केला आहे. हे उच्‍च दर्जाचे डीईएफ सोल्‍यूशन सानुकूल वेईकल कार्यक्षमता वाढवेल, ड्राइव्‍हट्रेन कार्यक्षमतेला चालना देईल आणि वेईकलचा टिकाऊपणा वाढवेल. उच्‍च दर्जाच्‍या उद्योग मानकांची पूर्तता करणाऱ्या बीआयएस-मान्‍यताकृत केंद्रांमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आलेले हे को-ब्रॅण्‍डेड जेन्‍यूएन डीईएफ देशभरातील एचपीसीएलच्‍या २३,००० फ्यूईल स्‍टेशन्‍सच्‍या व्‍यापक रिटेल नेटवर्कच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करून दिले जात आहे, ज्‍यामधून ग्राहकांना त्‍वरित उपलब्‍धता आणि सुलभ अॅक्‍सेसची खात्री मिळते.

आधुनिक बीएस६-प्रमाणित डिझेल वेईकल्‍ससाठी आवश्‍यक कम्‍पोनण्‍ट डीईएफ संभाव्‍य घातक नायट्रोजन ऑक्‍साईड्सना सुरक्षित व शुद्ध नायट्रोजन आणि पाण्‍यामध्‍ये रूपांतरित करत घातक उत्‍सर्जन कमी करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. या को-ब्रॅण्‍डेड जेन्‍यूएन डीईएफचा वापर करत टाटा मोटर्सचे ग्राहक सोईस्‍करपणे वेईकलची कार्यक्षमता वाढवू शकतात, तसेच उत्‍सर्जन आणि पर्यावरणीय नियमांचे पालन होण्‍याची खात्री मिळू शकते.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत हिंदुस्‍तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्‍या मार्केटिंग विभागाचे संचालक श्री. अमित गर्ग म्‍हणाले, ”एचपीसीएलमध्‍ये आम्‍ही गतीशीलता क्षेत्रात नाविन्‍यता आणि शाश्‍वततेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. को-ब्रॅण्‍डेड डिझेल एक्‍झॉस्‍ट फ्लूईड (डीईएफ)साठी टाटा मोटर्ससोबतचा आमचा सहयोग उत्‍सर्जन कमी करण्‍यासोबत शुद्ध परिवहन सोल्‍यूशन्‍सना पाठिंबा देण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमचे २३,००० हून अधिक रिटेल आऊटलेट्सचे व्‍याप‍क वितरण नेटवर्क आणि टाटा मोटर्सच्‍या तंत्रज्ञान कौशल्‍याचा फायदा घेत आमचा ग्राहकांना उच्‍च दर्जाचे, उपलब्‍ध होण्‍याजोगे आणि पर्यावरणपूरक सोल्‍यूशन देण्‍याचा मनसुबा आहे, जे हरित भविष्‍याप्रती योगदान देते.”

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, ”एचपीसीएलसोबतचा हा सहयोग व्‍यावसायिक वाहन उद्योगासाठी नाविन्‍यपूर्ण व शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील आणखी एक पाऊल आहे. लाँच करण्‍यात आलेले आमचे को-ब्रॅण्‍डेड जेन्‍यूएन डिझेल एक्‍झॉस्‍ट फ्लूईड खात्री देते की, टाटा मोटर्सच्‍या ग्राहकांना आता देशभरात हे सोल्‍यूशन सहजपणे उपलब्‍ध होऊ शकते आणि सर्वोच्‍च पर्यावरणीय मानकांचे पालन करत सानुकूल कार्यक्षमता संपादित करू शकतात. आम्‍हाला हे उत्‍पादन लाँच करण्‍यासाठी एचपीसीएलसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, जे वेईकलची कार्यक्षमता वाढवण्‍यासोबत पर्यावरणाला शुद्ध करण्‍याप्रती आणि हरित भविष्‍य घडवण्‍याप्रती योगदान देखील देते.”

नाविन्‍यता, शाश्‍वतता आणि ग्राहक-केंद्रित सेवांप्रती कटिबद्ध एचपीसीएलने शुद्ध इंधन, नवीकरणीय ऊर्जेमधील उपक्रम आणि इंधनाच्‍या विक्रीमधील डिजिटल सुधारणांच्‍या माध्‍यमातून भारतातील ऊर्जा परिवर्तनाला गती देणे सुरूच ठेवले आहे. कंपनीची प्रबळ पुरवठा साखळी आणि रिफायनरीज व टर्मिनल्‍ससह अत्‍याधुनिक पायाभूत सुविधा शहरी आणि ग्रामीण

बाजारपेठांमध्‍ये उत्‍पादन विनासायासपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री देतात. शाश्‍वत गतीशीलता आणि उत्‍सर्जन कमी करण्‍यावर अधिक लक्ष केंद्रित करत एचपीसीएल भारतातील परिवहन क्षेत्रासाठी हरित, अधिक कार्यक्षम भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते.

सर्वांगीण गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता म्‍हणून टाटा मोटर्सच्‍या व्‍यावसायिक वाहनांना संपूर्ण सेवा २.० उपक्रमाचे पाठबळ आहे, ज्‍यामधून सर्वसमावेशक वाहन जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासह ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍स, गॅरण्‍टीड टर्नअराऊंड टाइम्‍स, वार्षिक देखभाल करार (एएमसी) आणि जेन्‍यूएन स्‍पेअर पार्टसची सहज उपलब्‍धता यांचा समावेश आहे. तसेच, टाटा मोटर्स ताफा व्‍यवस्‍थापन सानुकूल करण्‍यासाठी आणि वेईकल अपटाइम वाढवण्‍यासाठी स्‍वत:चा कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजचा फायदा घेते. देशभरात टाटा मोटर्सचे २५०० हून अधिक सेल्‍स व सर्विस टचपॉइण्‍ट्स आहेत, जे त्‍यांच्‍या वेईकल्‍ससाठी सर्वोच्‍च अपटाइम देतात.

Related posts

मुंबईत ‘टेक्सफ्युचर परिषदेचे’ आयोजन

Shivani Shetty

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) ने ‘आभार’ कार्यक्रमासह उत्कृष्टतेची 18 वर्षे पूर्ण; महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

Shivani Shetty

एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड

Shivani Shetty

Leave a Comment