maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

नंदकुमार सरवडे यांची वनकॉस्मोसच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती

मुंबई, २० डिसेंबर २०२२: ओळख प्रमाणपत्र व पासवर्डशिवाय सर्टिफिकेशनयांना एकीकृत करणारी कंपनी वनकॉस्मोसने रिझर्व्ह बँक माहिती तंत्रज्ञानप्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सीईओ श्री. नंदकुमार सरवडे यांची नियुक्तीआपल्या सल्लागार मंडळात केली आहे. फसवणूक प्रतिबंध, कायदा प्रवर्तन, बँकिंग आणि विनियमन क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ सुरक्षासंदर्भात कामकेल्याचा अनुभव श्री. नंदकुमार यांच्याकडे आहे.    

वनकॉस्मोसचे संस्थापक आणि सीईओ श्री हेमेन विमदलाल यांनी सांगितले, “आर्थिक सेवा, फसवणुकीस प्रतिबंध आणि अनुपालन क्षेत्रात श्री. नंदकुमारयांच्या विशेष नैपुण्यांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाते.”

सायबर हल्ल्यांनी त्रस्त जगभरातील १११ देशांच्या यादीत भारताचा क्रमांकतिसरा आहे. एशिया–पॅसिफिक क्षेत्रात तर भारत पहिल्या स्थानावर आहे. सायबर हल्ल्यांमध्ये सायबर गुन्हेगारांचे एक सिंडिकेट गुंतलेले असून ते एकासंघटित पद्धतीने पासवर्ड चोरतात. सिंगापूरमधील सायबर सुरक्षा संशोधनकंपनी ग्रुप–आयबीने केलेल्या एका संशोधनात ही बाब निदर्शनास आलीआहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संशोधनात आढळून आले आहे की सायबर गुन्हे समूह टेलिग्रामने भारतात२०२१च्या शेवटच्या दहा महिन्यांमध्ये १९,२४९ उपकरणे संक्रमित केली, २०२२च्या पहिल्या सात महिन्यांमध्ये ही संख्या ५३,९८८ पर्यंत वाढली. यामध्ये ४,६५७ बँक कार्ड आणि क्रिप्टो वॉलेट माहितीच्या ४,४२८ केसेसचादेखील समावेश आहे.

Related posts

यकृत दाता सचिन गोसावी – हेड कॉन्स्टेबल, नवी मुंबई पोलिस यांच्या तर्फे ध्वजारोहण

Shivani Shetty

मुंबईत ‘रॅम्प माय सिटी’चा नवा उपक्रम; सार्वजनिक ठिकाणं आता दिव्यांगांसाठी सोयीस्कर पोलीस स्टेशन ते उपाहारगृहे येथे उभारले जाणार नवे रॅम्प

Shivani Shetty

‘बॉर्न टू शाइन’ ने केली आपल्या ३० विजेत्यां मुलींची घोषणा!

Shivani Shetty

Leave a Comment