maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

नंदकुमार सरवडे यांची वनकॉस्मोसच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती

मुंबई, २० डिसेंबर २०२२: ओळख प्रमाणपत्र पासवर्डशिवाय सर्टिफिकेशनयांना एकीकृत करणारी कंपनी वनकॉस्मोसने रिझर्व्ह बँक माहिती तंत्रज्ञानप्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सीईओ श्री. नंदकुमार सरवडे यांची नियुक्तीआपल्या सल्लागार मंडळात केली आहे. फसवणूक प्रतिबंध, कायदा प्रवर्तन, बँकिंग आणि विनियमन क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ सुरक्षासंदर्भात कामकेल्याचा अनुभव श्री. नंदकुमार यांच्याकडे आहे.    

वनकॉस्मोसचे संस्थापक आणि सीईओ श्री हेमेन विमदलाल यांनी सांगितले, “आर्थिक सेवा, फसवणुकीस प्रतिबंध आणि अनुपालन क्षेत्रात श्री. नंदकुमारयांच्या विशेष नैपुण्यांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाते.”

सायबर हल्ल्यांनी त्रस्त जगभरातील १११ देशांच्या यादीत भारताचा क्रमांकतिसरा आहे. एशियापॅसिफिक क्षेत्रात तर भारत पहिल्या स्थानावर आहे. सायबर हल्ल्यांमध्ये सायबर गुन्हेगारांचे एक सिंडिकेट गुंतलेले असून ते एकासंघटित पद्धतीने पासवर्ड चोरतात. सिंगापूरमधील सायबर सुरक्षा संशोधनकंपनी ग्रुपआयबीने केलेल्या एका संशोधनात ही बाब निदर्शनास आलीआहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संशोधनात आढळून आले आहे की सायबर गुन्हे समूह टेलिग्रामने भारतात२०२१च्या शेवटच्या दहा महिन्यांमध्ये १९,२४९ उपकरणे संक्रमित केली, २०२२च्या पहिल्या सात महिन्यांमध्ये ही संख्या ५३,९८८ पर्यंत वाढली. यामध्ये ,६५७ बँक कार्ड आणि क्रिप्टो वॉलेट माहितीच्या ,४२८ केसेसचादेखील समावेश आहे.

Related posts

‘जागतिक आपत्काल दिवस’ नवी मुंबई करांसाठी अपोलो हॉस्पिटल सादर करत आहे मोफत 5G ॲम्ब्युलंस सेवा

Shivani Shetty

आचार्य प्रशांत ‘मोस्ट इन्फ्लूएन्शियल वेगन’ पुरस्काराने सन्मानित

Shivani Shetty

पुणेकरांना अनुभवता येणार प्रख्यात संगीत उस्तादांच्या संगीतमय आवाजाचा नजराणा

Shivani Shetty

Leave a Comment