maharashtraprimenews
ठळक बातम्या
पुरस्कारमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

SWA पुरस्कार 2022 ने केला हिंदी मनोरंजन उद्योगातील समर्थ पटकथा लेखकांचा सन्मान! ~ पटकथाकारांतर्फे स्थापित पटकथाकारांसाठी देण्यात येणार्‍या या प्रसिद्ध पुरस्कारांच्या तिसर्‍या आवृत्तीची यशस्वी सांगता झाली ~

मुंबई, 9 नोव्हेंबर, 2022: स्क्रीनराईटर्स असोसिएशन ऑफ इंडियाद्वारा दर वर्षी योजण्यात येणार्‍या SWA पुरस्कारांच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन 9 नोव्हेंबर 2022 रोजी सेंट अॅन्ड्रूज ऑडिटोरियम, मुंबई येथे करण्यात आले. SWA पुरस्कारांचा हा पहिलाच प्रत्यक्ष सोहळा होता, कारण या आधीचे दोन समारंभ महामारीमुळे व्हर्चुअल माध्यमातून झाले होते. या समारंभाला शबाना आझमी, आशुतोष गोवारीकर, प्रकाश झा आणि महेश भट्ट यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

हे पुरस्कार देशात पटकथा लेखनाच्या क्षेत्रातील श्रेष्ठ कामगिरीबद्दल दर वर्षी देण्यात येतात. हिंदी फीचर फिल्म्स, हिंदी मालिका आणि हिंदी वेब सिरीजसाठी पटकथा आणि गीत लेखन करणार्‍या लेखकांना संपूर्णपणे वाहिलेला हा भारतातील एकमेव सोहळा आहे. यात प्रख्यात पटकथाकरांची ज्यूरी परीक्षणाचे काम करते. जगभरातील पटकथाकारांसाठी इंटरनॅशनल राइटर्स गिल्ड्स द्वारा स्थापित पुरस्कारांच्या तोडीचे भारतातील पटकथालेखकांसाठीचे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार बनण्याचे SWA पुरस्कारांचे लक्ष्य आहे. SWA पुरस्कार 2022 विविध 17 श्रेणींमध्ये देण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात जिवंत गीत-नाट्याचे एक आगळेवेगळे थिएटर सादरीकरण देशी नौटंकीच्या शैलीत करण्यात आले, ज्यामध्ये आपल्या व्यावसायिक जीवनात पटकथा लेखकांना सामोर्‍या येणार्‍या समस्यांचे मिश्किल, मजेशीर आणि औपरोधिक चित्रण होते.

त्यानंतर, उपरनिर्दिष्ट नाट्याच्या संकल्पनेचे जनक आणि SWA पुरस्कारांचे संयोजक सत्यम त्रिपाठी या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी बोलताना म्हणाले,पुरस्कार सोहळ्याचा फॉरमॅट काही तरी वेगळा असावा असे आम्हाला वाटत होते. शिवाय पटकथा लेखकांबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल सांगण्यासारखे आमच्याकडे बरेच काही होते. उपदेशात्मक किंवा काही खळबळजनक तर एरवी असतेच. त्यामुळे, या गीत-नाट्य अॅक्टची कल्पना आम्हाला सुचली. या अॅक्टमध्ये आओ हाथ उठाएँ हम भीहे एक अॅन्थम आहे. त्याशिवाय, संकट अदृश्य बनके हे एक उपरोधिक पण मजेशीर गाणेही आहे, ज्यात या महामारीदरम्यान पटकथा लेखकांनी भोगलेले दुःख मांडले आहे. आम्ही हक झिंदाबाद विषयी उच्च आवाजात गायलो तसेच PR करो कुछ यार करो या गाण्यात आपण सोशल मीडिया फ्रेंडली असल्याबाबत स्वतःवर हसलो देखील! मला वाटते की, खरं म्हणजे आमच्या कलेचा आनंद आम्हाला घ्यायचा होता, इतकंच!

हा थिएटर अॅक्ट अमित आर्यन आणि शेली यांनी लिहिला होता तर त्यातील गीते शेली आणि सत्यम यांची होती आणि संगीत उद्भव ओझा यांचे होते. अॅक्टचे दिग्दर्शन केले होते धर्मेश मेहता यांनी.

SWA पुरस्कारांचे अध्यक्ष धनंजय कुमार म्हणाले,SWA पुरस्कार सोहळा म्हणजे पटकथाकारांनी पटकथाकारांसाठी आणि पटकथाकारांच्या माध्यमातून साजरा केलेला उत्सव होता.”

SWA विषयी:

1960 मध्ये स्थापित झालेले स्क्रीनराईटर्स असोसिएशन (SWA) ही लेखकांची, लेखकांसाठी आणि लेखकांद्वारे राबवण्यात येणारी संस्था आहे.के. अब्बास, रामानंद सागर, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी,शैलेन्द्र, कृष्ण चंद्र, कमाल अमरोही, राजेंद्र कृष्ण, अली रझा वगैरे सुविख्यात लेखक या असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये सामील होते, ज्या संस्थेचे त्यावेळेसचे नाव होते फिल्म राईटर्स असोसिएशन. टेलिव्हिजन, वेब सिरीज आणि चित्रपटांसाठी लिखाण करण्याची इच्छा असणारा कुणीही SWA चा सदस्य होऊ शकतो.

Related posts

महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा*

Shivani Shetty

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा*

Shivani Shetty

सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष्मान खुरानाचे बिहार पोलिसांनी केले कौतुक!*

Shivani Shetty

Leave a Comment