maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

युवा’च्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’मुळे भारतभरातील ८०+ शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित

मुंबई, ३ सप्टेंबर २०२५ : गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी नवनीत एज्युकेशनलिमिटेडच्या ‘युवा’ या स्टेशनरी विभागाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियअसलेल्या ‘माय बाप्पा वर्कशॉप‘चे देशभरातील ८०हून अधिक शाळांमध्येआयोजन केले. या विधायक उपक्रमात ‘युवा‘ने खास तयार केलेल्याकिट्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनोख्या कलाकृती साकारत परंपराआणि संस्कृतीला सर्जनशीलतेची जोड देत गणेशभक्तीचा उत्सव साजराकेला.

‘युवा‘तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘माय बाप्पा वर्कशॉप’या वार्षिककार्यशाळेच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह सर्जनशीलता आणिशिक्षणाच्या माध्यमातून जिवंत होतो. गणेशोत्सव हा ‘युवा’साठी केवळ सणनसून कल्पनाशक्ती, ज्ञान आणि एकत्रित आनंदाचा उत्सव आहे आणि मुलेया आनंदसोहळ्याचा केंद्रबिंदू असतात.

या वर्षी ‘युवा‘चा हा उपक्रम महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह विविधराज्यांतील ८० हून अधिक शाळांपर्यंत पोहोचला आणि उत्सवाचा आनंदसर्वत्र द्विगुणित करण्यात आला. मुंबई मध्ये ‘युवा‘ने काळाचौकी येथीलअहिल्या विद्यामंदिर, महात्मा एज्युकेशन अकॅडमी सीबीएसई, उल्हासनगरयेथील नेताजी इंग्लिश स्कूल, नेरळमधील विद्या विकास मंदिर, वडाळ्यातीलआंध्रा स्कूल, पनवेल येथील डीएव्ही पब्लिक स्कूल, बोरीवली (पश्चिम) येथील सेंट रॉक हायस्कूल आणि कांदिवली (पश्चिम) येथील इंडियनएज्युकेशन सोसायटी स्कूल यांसह अनेक शाळांना भेट दिली. देशभरातील२४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला आणिसुंदर कलाकृतींमधून गणरायाला सर्जनशील अभिवादन केले.

‘युवा स्टेशनरी’चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर (सीएसओ) श्री. अभिजीतसान्याल म्हणाले : “सण ही आनंद, एकत्र येणे आणि शिकण्याची संधीअसते, अशी ‘युवा‘मध्ये आमची धारणा आहे. ‘माय बाप्पा सेलिब्रेशन‘च्याउपक्रमातून आम्ही मुलांना सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी साधने आणिप्रेरणा देतो. तसेच सांस्कृतिक मूल्यांशी त्यांना जोडतो. आमचे प्रयत्न कामहत्त्वाचे आहेत, हे त्यांच्या उत्साहातून आणि कलाकौशल्यातून आम्हालानेहमीच उमगते.”

‘माय बाप्पा वर्कशॉप’ हा उपक्रम म्हणजे लहानग्यांच्या मनात सामूहिकसमारंभाची भावना, सांस्कृतिक नाते आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकदजोपासण्याची बांधिलकी आहे. प्रत्येक सण हा मुलांसाठी शिकण्याचा आणिप्रगती साधण्याचा अर्थपूर्ण क्षण ठरावा, याची काळजी ‘युवा‘तर्फे’कायमघेण्यात येते.

Related posts

टाटा न्यू ऐप पर जीवन बीमा उत्पाद किए लॉन्च

Shivani Shetty

लेनदेनक्‍लबची ‘लेण्डिंग स्‍टोरी’ – जेथे प्रेम व कर्ज एकत्र येते! लेनदेनक्‍लबची नवीन मोहिम सामान्‍य क्षणांमध्‍ये मजेदार ट्विस्‍टची भर करते, तसेच दाखवून देते की दैनंदिन कमाई जीवनातील साधारण दिवसांना अत्‍यंत खास बनवू शकते

Shivani Shetty

गुजरात व्हिक्टरी फोर्जिंग्स लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Shivani Shetty

Leave a Comment