maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जागतिक कीर्तीच्या फाईन ज्वेलरी ब्रँडने मुंबई मध्ये आपले दुसरे स्टोर लॉन्च केले

मुंबई, १५ एप्रिल २०२५: झेन डायमंड या जगभरातील ४०० पेक्षा जास्त स्टोर्समध्ये असलेल्या, जागतिक कीर्तीच्या फाईन ज्वेलरी ब्रँडने मुंबईमध्ये आपले दुसरे स्टोर लॉन्च करून भारतात आपले स्थान अजून मजबूत केले आहे. बांद्रया मध्ये फ्लॅगशिप स्टोरची सुरुवात यशस्वी ठरल्यानंतर झेन डायमंडने आता स्काय सिटी मॉल मध्ये एक नवीन स्टोर सुरु करून आपली सर्वोत्तम कारीगरी बोरिवली मध्ये देखील उपलब्ध करवून दिली आहे. १७०० चौरस फुटांच्या या स्टोरमध्ये दागिने प्रेमींना खरेदीचा एक शानदार आणि मनमोहक अनुभव प्रदान केला जात आहे. बोरिवली स्टोरमध्ये रिफाईंड ग्रे पॅलेट आणि फ्ल्युटेड पॅनल व प्लास्टर टेक्श्चर यासारख्या प्रीमियम सामग्रीचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे दागिन्यांची चमक ठळकपणे दिसून येते. कन्सिल्ड स्टोरेज, व्हीआयपी एरिया आणि चार सिमेट्रिकल डिस्प्ले झोन यांच्यासह हे स्टोर झेन डिझाईनची उत्कृष्टता आणि सर्वोत्तम खरेदी यांचा पुरेपूर अनुभव प्रदान करेल.

झेन ब्रँड उच्च दर्जाच्या नैसर्गक हिऱ्यांचे दागिने करण्याच्या नैपुण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. त्यांच्या दागिन्यांमध्ये कालातीत शान आणि आधुनिक डिझाईनचा सहज मिलाप दिसून येतो. सर्वोत्कृष्ट कारीगरी आणि नावीन्य घडवत राहण्याचा समृद्ध वारसा पुढे नेत हा ब्रँड चोखंदळ, पारखी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. एक्सक्लुसिव्ह, सर्वोत्कृष्ट, सोफिस्टिकेशन ही सर्व गुणवैशिष्ट्ये असणारे दागिने ज्यांना हवे असतात अशा ग्राहकांना इथे पुरेपूर समाधान लाभते.

नील सोनावाला, मॅनेजिंग डायरेक्टर, झेन डायमंड यांनी सांगितले,”भारत ही नेहमीच आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. वांद्र्यामध्ये आमच्या पहिल्या स्टोरला मिळत असलेल्या यशाने आमचा उत्साह वाढवला आहे. बोरिवलीमध्ये आम्ही नवीन स्टोर सुरु करून मुंबईतील अजून अनेक ग्राहकांना झेन डायमंडची सर्वोत्कृष्ट कारीगरी प्रस्तुत करून आम्ही खूप खुश आहोत. आमच्या कलेक्शनमध्ये परंपरा आणि आधुनिक डिझाईन यांचा सुंदर मिलाप आहे, आधुनिक दागिने पारखी ग्राहकांसाठी ही कलेक्शन्स उत्तम आहेत.”

समीप पाठक, सीईओ, स्काय सिटी मॉल म्हणाले,”आमच्या रिटेल परिवारामध्ये झेन डायमंडचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. स्काय सिटी मॉलमध्ये खरेदीचा सर्वोत्तम आनंद प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. झेन डायमंडसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचे स्टोर आल्याने आमच्याकडील ब्रँड मिक्स अधिक समृद्ध झाले आहे. आम्ही ग्राहकांना त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट दागिने खरेदी करताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत.”

उत्तमोत्तम दागिन्यांव्यतिरिक्त हा ब्रँड परफ्युम, टाय, घड्याळे, पेन, सोन्याची नाणी यांच्यासहित लक्झरी ऍक्सेसरीजची क्यूरेटेड श्रेणी देखील प्रस्तुत करतो. उंची आणि दर्जेदार गिफ्टिंग असो किंवा स्वतःसाठी खास खरेदी करायची असो, हे स्टोर वन-स्टॉप-डेस्टिनेशन आहे.

Related posts

फिल्म फॉर थॉट: मानसिक आरोग्याच्या सकारात्मक चित्रणाची शक्ती

Shivani Shetty

एचडीएफसी लाइफ सुंदरम फायनान्सच्या ग्राहकांना देऊ करणार क्रेडिट लाइफ सोल्यूशन्स

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतात ४के अपस्‍केलिंग, एअरस्लिम डिझाइन आणि नॉक्‍स सिक्‍युरिटी असलेला २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही लाँच

Shivani Shetty

Leave a Comment