maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

वीस्कूलतर्फे भारतातील पहिल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन टेंपल मॅनेजमेंट च्या दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश जाहीर

मुंबई | 11 सप्टेंबर 2025 : प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (वीस्कूल), मुंबई यांनी भारतातील पहिल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन टेंपल मॅनेजमेंट (PGPTM) च्या दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश सुरू झाल्याची घोषणा केली आहे. ही बॅच सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. पहिल्या बॅचच्या यशस्वी पूर्णतेनंतर करण्यात आलेली ही घोषणा भारतात मंदिर व्यवस्थापनाला एक व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्र म्हणून मान्यता देण्यासाठी वीस्कूलने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

हा कार्यक्रम टेम्पल कनेक्टच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून, हा देशातील पहिला उपक्रम आहे. यामागचा मुख्य उद्देश मंदिर व पूजास्थळांच्या व्यवस्थापनाला व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून अधिक सक्षम करणे हा आहे. अभ्यासक्रमामध्ये समुदाय व्यवस्थापन, आध्यात्मिक अर्थव्यवस्था, वारसा संवर्धन आणि धार्मिक संस्थांमध्ये व्यवस्थापन कौशल्य अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचीही संधी मिळणार आहे. यात मंदिर भेटी, तज्ज्ञांशी संवाद आणि विविध व्यवस्थापन पद्धतींचे थेट निरीक्षण यांचा समावेश असेल. पहिल्या बॅचमध्ये ISKCON चौपाटी, ऋषिकेश, जीवदानी देवी मंदिर तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला होता. यंदा प्रवेशसंख्या तीनपट वाढून 60 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

वीस्कूलचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी सांगितले की, “PGPTM च्या पहिल्या बॅचचे पदवीधर होणे हे आमच्या सामाजिक जबाबदारीशी निगडीत शिक्षणाच्या दृष्टीकोनाचे उदाहरण आहे. या कार्यक्रमाद्वारे आम्ही आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि भारताचा आध्यात्मिक वारसा यांना जोडत आहोत. आमचे ध्येय असे व्यावसायिक तयार करणे आहे जे मंदिर व्यवस्थापनासह समाजाच्या इतर क्षेत्रातही सकारात्मक बदल घडवतील.” सप्टेंबर २०२५ च्या दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश सुरु झाले आहेत. आज मंदिर केवळ उपासनेसाठीची स्थळे न राहता, ते आध्यात्म, संस्कृती आणि सामुदायिक बंध जोडणारे केंद्र बनले आहेत. या पार्श्वभूमीवर PGPTM हा एक पायोनियर उपक्रम ठरत आहे, जो प्रशिक्षित व्यवस्थापन व्यावसायिकांची नवी पिढी घडवणार आहे.

Related posts

केरल आपदा के लिए 5 करोड़ रुपए देगा कल्याण ज्वेलर्स

Shivani Shetty

टाटा पंच एसयूव्‍हींमध्‍ये सर्वात जलदपणे ४ लाख विक्रीचा टप्‍पा गाठणारी वेईकल ठरली

Shivani Shetty

सणासुदीचा काळ साजरा करा, सॅमसंगकडून बीस्‍पोक एआय डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर विशेष फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment