maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील पहिल्या क्रिकेट स्टेडियम हॉटेलची ‘मिराज ग्रुप’द्वारे निर्मिती

मुंबई, २ डिसेंबर २०२४: भारतातील पहिले आलिशान क्रिकेट स्टेडियम हॉटेल (एमपीएमएससी) ‘मिराज ग्रुपने बांधले आहे. राजस्थानमधील नाथद्वारा या पवित्र शहरात २०२५मध्ये सुरू होणारे हे हॉटेल रॅडिसन हॉटेल ग्रुपद्वारे चालवले जाईल.

 

क्रिकेटच्या स्पर्धा प्रत्यक्ष पाहणे आणि आलिशानपणे राहणे यांचा संयोग साधणारे हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हॉटेल आहे. यामध्ये २३४ आलिशान खोल्या असतील. त्यांतील ७५ टक्के खोल्यांमधून क्रिकेटच्या मैदानाचे अनोखे दृष्य दिसेल. येथे राहणारे अतिथी आपापल्या खोलीत बसून आरामात क्रिकेटचा आनंद घेऊ शकतील.

 

हे हॉटेल लक्झरी आणि डिझाइन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. आदरातिथ्य आणि क्रिकेटची आवड या दोन्ही संदर्भात ते एक नवीन मापदंड स्थापित करते. मदन पालीवाल यांचे द्रष्टेपण आणि ‘रॅडिसन’चे उत्कृष्ट आदरातिथ्य यांचा अनुभव घेत क्रीडाक्षेत्रातील या नावीन्यपूर्ण वास्तुत राहण्यासाठी आता सर्व क्रिकेटप्रेमी सज्ज असतील यात शंका नाही.

Related posts

इकोफायची विद्युतसह हातमिळवणी

Shivani Shetty

शार्क टँक: फ्लेक्‍झीफायमीने १ कोटी रूपयांची गुंतवणूक संपादित केली

Shivani Shetty

महा कुंभ २०२५ मेळ्यांमध्ये कोका-कोला इंडिया सज्ज आहे दर ४०० मीटर्सच्या अंतरावर उत्पादने उपलब्ध

Shivani Shetty

Leave a Comment