maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्या

राज्यमंत्र्यांच्या निवेदनातून भारतीय मसाला उद्योगाला दिलासा

  • भारत, 21 ऑगस्ट 2024: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या ताज्या स्पष्टीकरणानुसार भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेबद्दलच्या अंदाजांना वाजवी निष्कर्ष मिळतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माननीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी स्पष्ट केले की सिंगापूर आणि हाँगकाँगमधील संस्थांनी एखाद्या सामान्य प्रक्रियेप्रमाणे “होल्ड-अँड-टेस्ट” व्यवस्थेवर काम सोपवले होते. अशा प्रकारच्या कारवाईत कोणत्याही भारतीय मसाला उत्पादन किंवा ब्रँडवर बंदी नसल्यावर त्यांनी जोर दिला.
    या स्पष्टीकरणाला उत्तर देताना एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष संजीव शाह म्हणाले, “मंत्रालयातून जारी करण्यात आलेले निवेदन भारतीय मसाला उद्योगाला मोठी चालना देणारे आहे. सिंगापूर, हाँगकाँग किंवा इतर कोणत्याही देशात एव्हरेस्टच्या उत्पादनांवर कधीही बंदी घालण्यात आली नव्हती, यावर आम्ही भर देऊ इच्छितो. गेल्या काही महिन्यांत विविध व्यासपीठांवर झालेल्या अंदाज-आधारित व्यक्तव्यांमुळे अनावश्यक गोंधळ निर्माण झाला. एव्हरेस्ट फूड्स या ब्रँडला सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल आमचे निष्ठावान ग्राहक, वितरक आणि भागधारकांचे आभार मानण्यासाठी या संधीचा लाभ आम्ही घेत आहोत”.
    मसाले आणि औषधी वनस्पतींसाठी (हर्ब्स) प्रसिद्ध असलेला एव्हरेस्ट फूड्स हा प्रतिष्ठित ब्रँड बऱ्याच काळापासून लाखो कुटुंबांच्या पसंतीस उतरला आहे. राज्यमंत्री (MoS) यांचे विधान केवळ एव्हरेस्टलाच नव्हे तर भारतीय उत्पादनांची जागतिक प्रतिष्ठा मजबूत करण्यासाठी इतर ब्रँडनाही बळ देईल. या ताज्या निवेदनामुळे भारतीय मसाल्यांच्या शुद्धतेबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांना आता पूर्णविराम लागला आहे

Related posts

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिवसेना जिल्हाप्रमुखाचे झेडपी सदस्यत्व रद्द

cradmin

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह 2023: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आगमुक्त राज्य करण्यासाठीचा पुढाकार

Shivani Shetty

नेक्सब्रँड इंक (NexBrands Inc) ने आयोजित केलेल्या ७ व्या वार्षिक ब्रँड व्हिजन समिटमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातल्या उत्कृष्ट उद्योग समुहांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला*

Shivani Shetty

Leave a Comment