maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

*सॅमसंग इंडियाने एआय-पॉवर्ड रिमोर्ट डायग्‍नोस्टिक व ट्रबलशूटिंग टूलच्‍या माध्‍यमातून ग्राहक सेवा वाढवली

गुरूग्राम, भारत, एप्रिल, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आपले होम अप्‍लायन्‍सेस रिमोट मॅनेजमेंट (एचआरएम) टूल लाँच केले आहे. हे नेक्‍स्‍ट-जनरेशन रिमोट डायग्‍नोसिस व ट्रबलशूटिंग सोल्यूशन सर्विससाठी लागणारा प्रतिक्षाकाळ मोठ्या प्रमाणात कमी करते आणि ग्राहकांना उत्‍साहपूर्ण अनुभव देते.
एआय-पॉवर्ड रिमोट डायग्‍नोस्टिक्‍स व ट्रबलशूटिंगच्‍या क्षमतेचा फायदा घेत सॅमसंग टेक्निशियन्‍स आता त्‍वरित समस्‍यांचे निराकरण करू शकतात, ज्‍यामुळे इन-होम व्हिजिट्ससाठी गरज कमी होते. हे नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान त्‍वरित निराकरण व कमी डाऊनटाइमसह ग्राहकांना उत्‍साहपूर्ण अनुभव देण्‍यासोबत उद्योगासाठी नवीन मापदंड देखील स्‍थापित करते, ज्‍यामुळे कस्‍टमर केअरचे भविष्‍य नव्‍या उंचीवर पोहोचेल आणि ग्राहक व त्‍यांच्‍या स्‍मार्ट होम अप्‍लायन्‍सेसमधील संबंधाला नवीन रूप मिळेल.
“सॅमसंग सर्विस होम अप्‍लायन्‍सेस डायग्‍नोस्टिक्‍सच्‍या अग्रस्‍थानी आहे, जेथे अचूकतेसह समस्‍या ओळखण्‍यासाठी प्रगत टूल्‍सचा फायदा घेतला जातो. कंपनीच्‍या स्‍मार्ट डायग्‍नोस्टिक्‍स सर्विसच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना टूबलशूटिंगद्वारे आणि दुरूनच समस्‍यांचे निराकरण करत सक्रिय सोल्‍यूशन्‍स मिळू शकतात, ज्‍यामुळे टेक्निशियनने भेट देण्‍याची गरज दूर होते. हे तंत्रज्ञान प्रतिक्षाकाळ मोठ्या प्रमाणात कमी करते, त्‍वरित निराकरणाची खात्री देते आणि उत्‍पादन मेन्‍टेनन्‍सबाबत वेळेवर अपडेट्स देते, परिणामत: ग्राहकांना उत्‍साहपूर्ण अनुभव मिळतो,” असे सॅमसंग इंडियाच्‍या कस्‍टमर सॅटिस्‍फॅक्‍शनचे उपाध्‍यक्ष सुनिल कुटिन्‍हा म्‍हणाले.

एचआरएम स्‍मार्टथिंग्‍ज अॅपवर नोंदणी केलेल्‍या सॅमसंग स्‍मार्ट अप्‍लायन्‍सेससाठी रिमोट काऊन्सलिंग, मॉनिटरिंग व कंट्रोल वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून रिअल-टाइममध्‍ये समस्‍येचे निराकरण सक्षम करते. स्‍मार्टथिंग्‍ज कस्‍टमर-फेसिंग अॅप आहे, जे अप्‍लायन्‍स ऑपरेटिंग टूल म्‍हणून काम करते आणि वापराच्‍या पद्धतींना कॅप्‍चर करते. या इनोव्‍हेशनसह सॅमसंग स्‍मार्ट डिवाईस व्‍यवस्‍थापनामधील पद्धतीचे नेतृत्‍व करत आहे, ज्‍यामुळे जगभरातील ग्राहकांसाठी होम अप्‍लायन्‍सेस मेन्‍टेनन्‍स अधिक कार्यक्षम व विनासायास होतो. ग्राहकांनी त्‍यांच्‍या होम अप्‍लायन्‍सेसच्‍या समस्‍येसंदर्भात सॅमसंगच्‍या सपोर्ट टीमशी संपर्क साधल्‍यानंतर एचआरएम सिस्‍टम सॅमसंगच्‍या सीआरएम (कस्‍टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट सिस्‍टम)च्‍या माध्‍यमातून आपोआपपणे नोंदणीकृत डिवाईसचे मॉडेल आणि सीरियल नंबर ओळखते. कार्यान्वित केल्‍यानंतर संपर्क केंद्रामधील सल्‍लागार ग्राहकांनी संमती दिल्‍यानंतर दुरूनच विशिष्‍ट अप्‍लायन्‍स फंक्‍शन्‍सचे निदान, देखरेख करण्‍यासोबत त्‍यावर नियंत्रण ठेवू शकतात, तसेच त्‍वरित ट्रबलशूटिंगसंदर्भात मार्गदर्शन करू शकतात.

एचआरएम एसी कूलिंगसंदर्भातील समस्‍येचे कशाप्रकारे निराकरण करते?
उन्‍हाळा चेन्‍नईमध्‍ये लवकर येण्‍यासह तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढत असताना रोहन लुहराचा एअर कंडिशनर कमी कार्यक्षमपणे कूलिंग करत होता. सुदैवाने, रोहनने त्‍याच्‍या स्‍मार्टफोनवर स्‍मार्टथिंग्‍ज अॅप इन्‍स्‍टॉल केलेले होते आणि एसी अॅपवर नोंदणीकृत होता, ज्‍यामुळे त्‍याला समस्‍येसंदर्भात नोटिफिकेशन मिळाले. रोहनने त्‍वरित स्‍मार्टथिंग्‍जमधील होम केअर सर्विसच्‍या माध्‍यमातून सपोर्टसाठी विनंती केली आणि संपर्क केंद्रामधील सल्‍लागाराशी कनेक्‍ट झाला. समुपदेशानादरम्‍यान सल्‍लागाराने एचआरएमच्‍या रिमोर्ट डायग्‍नोस्टिक्‍सच्‍या माध्‍यमातून समस्‍येला ओळखले आणि ग्राहकाला सांगितले की, एसीच्‍या मायक्रोफिल्‍टरची साफसफाई करणे आवश्‍यक आहे, तसेच फोन कॉलवरून रोहनला स्‍टेप-बाय-स्‍टेप मार्गदर्शन केले, ज्‍यामुळे ऑन-साइट भेट देण्‍याची गरज न भासता काही मिनिटांमध्‍ये एसीची कूलिंग कार्यक्षमता पूर्ववत झाली.
या रिअल-वर्ल्‍ड उदाहरणामधून निदर्शनास येते की सॅमसंगचे एचआरएम टूल कस्‍टमर सपोर्टमध्‍ये बदल घडवून आणत आहे, स्‍मार्ट अप्‍लायन्‍स मेन्‍टेनन्‍स अधिक कार्यक्षम, सक्रिय व त्रासमुक्‍त करत आहे.

Related posts

मुंबई, पुण्याला बसला सायबरधोक्‍यांचा सर्वाधिक फटका: क्विक हील

Shivani Shetty

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

Shivani Shetty

नवीन घरांच्‍या विक्रीत २०२३ मध्ये ३३ टक्‍क्‍यांची वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम

Shivani Shetty

Leave a Comment