मुंबई, ११ एप्रिल २०२५:* सहीबंधु या भारताच्या सर्वात विश्वसनीय सुवर्ण कर्ज सक्षम करणाऱ्या प्लॅटफॉर्मने आज आपले नाव बदलून मणिपाल फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड केल्याचे जाहीर केले. या धोरणात्मक बदलातून कंपनीची गतिमान वाढ, त्यांचे बिझनेसचे बदलते व्हिजन आणि भविष्यात टेक्नॉलॉजी-सक्षम फायनॅनष्यल सोल्यूशन्स प्रदान करण्याचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. मणिपाल समूहाच्या मूल्यांमध्ये रुजलेली ही कंपनी एका दमदार वारशासह आणि इनोव्हेशन, चपळता आणि स्केलेबल वाढीवरील नवीन फोकससह या नवीन अध्यायाची सुरुवात करत आहे.
गेल्या काही वर्षांपासून, सहीबंधुने गोल्ड लोन सेगमेन्टमध्ये एक मजबूत आणि विश्वसनीय इकोसिस्टम उभारून देशभरातील आघाडीच्या बँकांसोबत भागीदारी करत सुलभ कर्ज प्रक्रिया शक्य केली आहे. कर्ज सहजप्राप्य बनवून या मंचाने निरंतर प्रभावी कामगिरी केली आहे आणि आपले नाव बदलून मणिपाल फिनटेक करण्यातून त्यांनी अधिक सुलभ, अधिक समावेशक आणि टेक्नॉलॉजी-प्रेरित फायनॅनष्यल सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
या रिब्रॅंडिंगची घोषणा करताना मणिपाल फिनटेकच्या सीईओ पूजा सिंह म्हणाल्या, “मणिपाल फिनटेकमध्ये रूपांतर हे केवळ रीब्रॅंडिंग नाही. एक कंपनी म्हणून आमच्यात झालेल्या बदलाचे आणि आम्ही जे भविष्य घडवू इच्छित आहोत त्याचे ते प्रतिबिंब आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ प्रक्रियेने गोल्ड लोन सेवा प्रदान करून ग्राहकांचा तसेच बँकिंग भागीदारांचा विश्वास संपादन केला आहे. या परिवर्तनाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भारतीयासाठी गोल्ड लोन अधिक सहजप्राप्य, निर्बाध आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न वाढवत आहोत. मणिपाल समूहाच्या विश्वासाच्या वारशाचे पाठबळ घेऊन ग्राहकांना आणि भागीदारांना दीर्घकालीन मूल्य प्रदान करून आम्ही फायनॅनष्यल इनोव्हेशनच्या आगामी टप्प्याचे नेतृत्व करण्यास सज्ज आहोत.”
या रीब्रॅंडिंगमधून कंपनीच्या धोरणात्मक रोडमॅपवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यात संबंधित आर्थिक सेवांच्या श्रेणीत प्रवेश करणे, आजवर न गाठलेल्या प्रदेशात आपला प्रसार करणे, नेक्स्ट-जनरेशन फिनटेक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करणे आणि या आर्थिक इकोसिस्टममध्ये आपल्या भागीदारी मजबूत करणे सामील आहे. आपल्या नवीन ओळखीसह मणिपाल फिनटेक पारंपरिक बँकिंग आणि आधुनिक अर्थविषयक अपेक्षा यांच्यातील दरी भरून काढण्याबाबत तसेच पाहिल्यापेक्षा जास्त जलद, स्मार्ट आणि अधिक लोकांना प्राप्य सोल्यूशन्स प्रदान करण्याबाबत वचनबद्ध आहे.

