maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार ‘रेनल डिनरव्हेशन’ उपचार पद्धती

नवी मुंबई, ५ सप्टेंबर २०२४: जेव्हा ४२ वर्षीय रुग्णामध्ये धोकादायक पद्धतीने वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात नियमित उपचार अयशस्वी ठरली, तेव्हा डॉ. ब्रजेश कुमार कुंवर रेनल डिनर व्हेशन या एका अभिनव उपचाराकडे वळले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुंवर यांनी नवी मुंबईतील अशा प्रकारची पहिलीच तीव्रता कमीत कमी असलेली शस्त्रक्रिया केली. हे उपचार म्हणजे हायपरटेन्शन (HT) व्यवस्थापनामध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतात. रायगड, उरण येथे राहणारे श्री.चेतन वाझेकर हे मनमुराद भटकंती करणारे आणि साहसी उत्साही पर्यटक. विविध प्रकारची अँटीहाइपरटेन्सिव्ह औषधे घेत असूनही अनियंत्रित राहत असलेल्या उच्च रक्तदाबाच्या विकाराचे म्हणजेच रेझिस्टंट हायपरटेन्शन (HT) विरुद्ध ते झुंज देत होते. सक्रिय, कार्यमग्न जीवनशैली असूनही त्यांचा रक्तदाब धोकादायकरित्या उच्चच राहिला होता. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढत होता. या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकत होता.

श्री.चेतन वाझेकर, पेशंट, उच्च रक्तदाब विकारग्रस्त म्हणाले,“या उपचारांपूर्वी माझ्या उच्च रक्तदाबामुळे दैनंदिन कामे करणे देखील मला कठीण झाले होते. माझ्या तब्येतीची मला सदैव काळजी वाटत होती. डॉ. कुंवर आणि अपोलो हॉस्पिटलमधील टीमचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे मला नवजीवन मिळाल्यासारखेच वाटत आहे. माझा रक्तदाब नियंत्रणात आहे आणि आता सतत मला कधी काय होईल याची चिंता करत बसण्याऐवजी मला छान, स्वास्थ्यपूर्ण वाटत आहे. आता परत एकदा आयुष्याची घोडदौड सुरू करायला आणि स्वतःच्या तब्बेतीची काळजी करत न बसता नवनवीन शिखरांवर विजय मिळवण्यास मी खूप उत्सुक आहे.”

रेनल डीनर्व्हेशन ही एक नवीन तीव्रता कमी असलेली उपचार प्रक्रिया असून रेझिस्टंट (प्रतिरोधक) एचटी व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाते. रेझिस्टंट एचटी म्हणजे सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद न देणारा उच्च रक्तदाब. रिनल म्हणजे मूत्रपिंड साठीच्या धमन्यांच्या सभोवतालच्या मज्जातंतूला रेडिओ फ्रिक्वेंसी पृथक्करण वितरीत करण्यासाठी कॅथेटर वापरल्याने, उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नसा विस्कळीत होतात. मज्जासंस्थेच्या क्रियांमधील ही घट रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि बहुविध औषधांची आवश्यकता कमी करू शकते.

डॉ. ब्रजेश कुमार कुंवर, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,“उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये रेझिस्टंट एचटीचे प्रमाण 10% ते 20% पर्यंत असते. अवघे ४२ वर्षांच्या तरुण वयात अनियंत्रित एचटीचे निदान झालेल्या रुग्णावर या स्थितीचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा रुग्ण सक्रिय जीवनशैली असलेला आणि खूप उत्साही आहे. अशा व्यक्तीला आपण जर वेळेवर वैद्यकीय उपचार मदत करू शकलो नाही तर ते फारच दुःखद ठरू शकते. रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि दीर्घकाळ औषधावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रेनल डीनर्व्हेशन ही एक आश्वासक उपचार पद्धती ठरली.”

श्री.अरुणेश पुणेथा, मुख्य कार्यकारी अधिकारी- प्रादेशिक पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल म्हणाले,“डॉ. ब्रजेश कंवर यांनी केलेली रेनल डीनर्व्हेशन प्रक्रिया ही आमच्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्याची आणि क्षमतेची पावती आहे. अपोलो हॉस्पिटल मधील कार्डिओलॉजिस्ट (हृदयरोग तज्ञ) संपूर्ण स्तरावर कार्डियाक केअर म्हणजेच हृदयाची काळजी घेतात. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैयक्तिकृत प्रोहेल्थ हृदय तपासणी पासून ते जटिल, गुंतागुंतीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या, स्ट्रक्चरल अशा हृदय शस्त्रक्रिया, अररीदमिय डिसऑर्डर आणि हॉर्ट फेल पर्यंत विकार व्यवस्थापित करण्यासाठी प्रगत उपचारपद्धती समाविष्ट असतात. ही नवीन इंटरव्हेंशनल प्रक्रिया आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असून आमच्या रूग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य पुरवण्याच्या आमच्या बांधिलकीवर प्रकाश टाकते.”

Related posts

सॅमसंगने भारतात गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर विशेष किमतींसह उत्‍सवी आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर केली

Shivani Shetty

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

नवी मुंबईतील ९३ वर्षीय आजोबांनी स्ट्रोकवर केली मात

Shivani Shetty

Leave a Comment