maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रे-wबॅन मेटा जेन १ ग्‍लासेस लवकरच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व रिलायन्‍स डिजिटलवर उपलब्‍ध असतील

राष्‍ट्रीय, ७ नोव्‍हेंबर: रे-बॅन मेटा जेन १ ग्‍लासेस २१ नोव्‍हेंबर रोजी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Reliancedigital.in वर लाँच होण्‍यास सज्‍ज आहेत, ज्‍यासह भारतभरातील अधिकाधिक ग्राहकांना मेटाचे नाविन्‍यपूर्ण वीअरेबल तंत्रज्ञान उपलब्‍ध होईल.

६ नोव्‍हेंबरपासून व्‍यक्‍ती या रिटेलर्सकडून ऑनलाइन रे-बॅन मेटा जेन १ श्रेणी खरेदी करणाऱ्यांपैकी एक होण्‍यासाठी ‘नोटिफाय मी’ अलर्ट्सकरिता साइन अप करू शकतात, जेथे दैनंदिन अभिव्‍यक्‍ती व कनेक्‍शनसाठी प्रतिष्ठित रे-बॅन स्‍टाइल आणि मेटाचे प्रगत हँड्स-फ्री तंत्रज्ञान एकत्र करण्‍यात आले आहे.

मेटाच्‍या भारत व आग्‍नेय आशियामधील उपाध्‍यक्ष संध्‍या देवनाथन म्‍हणाल्‍या, ”मेटामध्‍ये आमचा विश्वास आहे की, कम्‍प्‍युटिंगचे भविष्‍य अत्‍यंत वैयक्तिक, विनासायासपणे एकीकृत आणि दृढपणे सक्षम करणारे असेल. आम्‍ही दैनंदिन जीवनामध्‍ये प्रभावीपणे सामावून जाणाऱ्या डिवाईसेसच्या माध्‍यमातून प्रत्‍येकासाठी वैयक्तिक सुपरइंटेलिजन्‍स आणण्‍याच्‍या मिशनवर आहोत. एआय ग्‍लासेस आकर्षक दिसण्‍यासोबत शक्तिशाली एआय टूल्‍स देखील देतात, जे तुम्‍हाला वर्तमान घडामोडींशी संलग्‍न राहण्‍यास, उत्तमपणे संवाद साधण्‍यास आणि तुमच्‍या संवेदना वाढवण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. रे-बॅन मेटा ग्‍लासेसमधून वीअरेबल तंत्रज्ञानाच्‍या नवीन अध्‍यायाचे नेतृत्‍व करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जेथे भारत त्‍या प्रवासाचा प्रमुख भाग आहे आणि स्‍मार्टफोनपलीकडे कम्‍प्‍युटिंग प्‍लॅटफार्म्‍समधील पुढील वाटचालीला सादर करते.”

रे-बॅन मेटा जेन १: आयकॉनिक डिझाइन आणि स्‍मार्ट नाविन्‍यतेचे संयोजन
रे-बॅन मेटा जेन १ कलेक्‍शन विविध फ्रेम आणि लेन्‍स व्‍हेरिएण्‍ट्ससह उपलब्‍ध असेल. मेटा एआय बिल्ट इन असल्यामुळे तुम्ही प्रश्‍न विचारण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी किंवा हँड्सफ्री तुमचे ग्‍लासेस (चष्‍मा) नियंत्रित करण्यासाठी फक्‍त ‘हे मेटा’ म्हणू शकता. या कलेक्शनमध्ये क्लासिक रे-बॅन फ्रेम्स आहेत, ज्यामध्ये प्रिस्क्रिप्शन, सन, पोलराइज्ड आणि ट्रान्झिशन्स लेन्सचा समावेश आहे, ज्‍या खिशामध्‍ये सहजपणे मावणाऱ्या चार्जिंग केससह येतात. दृश्यमान कॅप्चर एलईडी इंडिकेटर कॅमेरा सक्रिय असताना प्रकाशित होऊन पारदर्शकतेची खात्री देते, जेथे पुढील बाजूस व मध्‍यभागी गोपनीयता आणि स्‍टाइलला सादर करते.

नुकतेच, रे-बॅन मेटा ग्‍लासेससाठी नवीन अनुभवांची घोषणा करण्‍यात आली, ज्‍यामुळे ते भारतातील वापरकर्त्‍यांसाठी अधिक स्‍मार्ट, अधिक वैयक्तिक आणि अधिक धमाल झाले आहेत. तुम्‍ही आता मेटा एआयसोबत हिंदीमध्‍ये संवाद साधू शकता. आम्‍ही दीपिका पदुकोनचा सेलिब्रिटी एआय वॉइस देखील सादर केला आहे, ज्‍यासह तुमच्‍या परस्‍परसंवादांमध्‍ये प्रचलित आणि सर्वसमावेशक व्‍यक्तिमत्त्वाची भर करण्‍यात आली आहे. नुकतेच सणासुदीच्‍या काळात लाँच करण्‍यात आलेले नवीन ‘रिस्‍टाइल’ वैशिष्‍ट्य तुम्‍हाला ‘हे मेटा, रिस्‍टाइल धीस’ म्‍हणत फोटोजना लाइट्स, कलर्स व सेलिब्रेटरी थीम्‍ससह बदलण्‍याची सुविधा देते. लवकरच, मेटा यूपीआय लाइट पेमेंट्सची चाचणी सुरू करणार आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही क्‍यूआर कोडकडे पाहत आणि ‘हे मेटा, स्‍कॅन अँड पे’ म्‍हणत १,००० रूपयांपेक्षा कमी रकमेचे पेमेंट्स त्‍वरित करू शकता. हे सर्व व्‍यवहार तुमच्‍या ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून विनासायासपणे व सुरक्षितपणे करता येऊ शकतात.

Related posts

तृप्ति डिमरी इस सप्ताह IMDb की लोकप्रिय भारतीय हस्तियों की सूची में लगातार चौथी बार शीर्ष पर हैं

Shivani Shetty

कोळसा मंत्रालयाने मुंबईत कोळसा वायवीकरण – पृष्ठभागीय आणि भूमिगत तंत्रज्ञानावरील रोडशोचे आयोजन केले

Shivani Shetty

इटफिट (EatFit) आणि एचआरएक्‍स बाय ऋतिक रोशन (HRX by Hrithik Roshan) यांनी एचआरएक्‍स कॅफे सुरू करण्‍यासाठी केला सहयोग; आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयीमध्‍ये बदल घडवून आणणार

Shivani Shetty

Leave a Comment