maharashtraprimenews
ठळक बातम्या
LaunchMusicठळक बातम्या

राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन*

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या सुमधुर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली माडे आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. नुकतीच त्यांनी वैशाली माडे म्युझिक ॲकडमी सुरु केली असून या ॲकडमीचे उद्घाटन माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. या भव्य उद्घाटन सोहळ्याला संसद सदस्य रवींद्र वायकर, बॉलिवूड पार्श्वगायिका साधना सरगम, मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख कुणाल इंगळे उपस्थित होते.

या सोहळ्याबद्दल माननीय राज ठाकरे म्हणतात, ”वैशाली माडे एक मोठी गायिका आहे. संगीत अकादमी सुरू करून आज तिने तिच्या कलेचा वारसा इतरांना देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. तिच्या अकादमीच्या माध्यमातून आज भावी गायक घडतील आणि मोठे होतील. आपले मराठी संगीत हे आपणच पुढे नेले पाहिजे.’’

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल वैशाली माडे म्हणतात, ” एखादी संगीत ॲकडमी सुरु करावी, अशी माझी कित्येक वर्षांपासून इच्छा होती आणि आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. माननीय राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. ते नेहमीच कलेला प्राधान्य देत आले आहेत. अशा कलाप्रेमीने माझ्या या संगीत ॲकडमीचे उद्घाटन केले, हे सुखावह आहे. या ॲकडमीच्या माध्यमातून आम्ही नवीन गायक घडवणार आहोत. येथे विद्यार्थ्यांना व्होकल, इंस्ट्रूमेंटल, कराओके, गझल या सगळ्यांचा अभ्यास करता येणार आहे. खूप आनंद होतोय की, या ॲकडमीच्या माध्यमातून मी कलाप्रेमींपर्यंत पोहोचू शकणार आहे. आमची ही संगीत ॲकडमी महत्त्वाकांक्षी संगीतकारांसाठी दीपस्तंभ म्हणून कायमच उभी राहील. आमची संपूर्ण टीम संगीताच्या परिवर्तनशील शक्तीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांमधून एक अद्वितीय आवाज शोधण्यासाठी आम्ही कायमच वचनबद्ध असू. या आवाजाला उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा कायमच प्रयत्न राहील. इथे तुम्ही तुमच्या पॅशनला शिक्षणाच्या रूपात बदलू शकता आणि या प्रवासात आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू.’’

Related posts

हम आपके है कौन, हम साथ साथ है, कभी खुशी कभी गम यांसारखे चित्रपट माझ्या मनात कोरले गेले आहेत!’ : विकी कौशल ला आज कौटुंबिक चित्रपट बनत नसल्याची खंत आहे.*

Shivani Shetty

पेमेटला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी आरबीआयकडून तत्वतः मंजूरी

Shivani Shetty

PURE EV ने 201 KM रेंजसह ePluto 7G MAX लाँन्च

Shivani Shetty

Leave a Comment