maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रॅकोल्‍डकडून नेक्स्‍ट-जनरेशन वॉटर हिटर्स लाँच

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३: रॅकोल्‍ड या भारतातील आघाडीच्‍या होम अप्‍लायन्‍स ब्रॅण्‍डने वॉटर हिटर्सच्‍या प्रिमिअम श्रेणीच्‍या लाँचसह वॉटर हिटिंग क्षेत्राला नव्‍या उंचीवर नेले आहे. ब्रॅण्‍डने वॉटर हिटर्सच्‍या नवीन ओम्‍नीस व अॅल्‍ट्रो श्रेणींच्या बहुप्रतिक्षित २०२३ एडिशन्‍सना लाँच केले आहे. वॉटर हिटर्सची नवीन श्रेणी इटलीमध्‍ये प्रतिष्ठित इटालियन डिझाइन उंबेर्तो पालेर्मो यांनी डिझाइन केली आहे. या आकर्षक डिझाइन्‍स शहरी बाथ स्‍पेसेसच्‍या इंटीरिअर्सना साजेशा असून सुशोभित करतात. या अत्‍याधुनिक ऑफरिंग्‍जमधून नाविन्‍यपूर्ण, आधुनिक व ऊर्जा-कार्यक्षम वॉटर हिटिंग सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती रॅकोल्‍डची अविरत कटिबद्धता दिसून येते.

नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या वॉटर हिटर्सचा नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये व सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांच्‍या विविध गरजा व सर्वसमावेशक पसंतींची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. हे वॉटर हिटर्स सोयीसुविधा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि बाथिंगचा आनंद देण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहेत.

एरिस्‍टन ग्रुप इंडिया प्रा. लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व कंट्री मॅनेजर (भारत) श्री. मोहित नरूला म्‍हणाले, “रॅकोल्‍ड ६० वर्षांपासून दर्जा व नाविन्‍यतेसाठी प्रसिद्ध आहे. आम्‍ही ग्राहकांच्‍या गरजा, तसेच त्‍यांच्‍या सर्वसमावेशक खरेदी व वापर करण्‍याच्‍या पद्धती समजून घेण्‍याकडे अधिक लक्ष देतो. अशा संधोशनांमधून आम्‍हाला योग्‍य उत्‍पादन विकसित करण्‍यास मदत झाली आहे. वॉटर हिटर्सची नवीन श्रेणी आधुनिक ग्राहकांच्‍या प्रमुख समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आमचे वॉटर हिटर्स सर्वोत्तम ऊर्जा कार्यक्षमता आणि सुधारित सोयीसुविधा देण्‍यासह सर्वोत्तम नियंत्रण देखील देतात. अवंत-गार्डे वैशिष्‍ट्यांमध्‍ये वॉईस कंट्रोल, आयओटी-सक्षम स्‍मार्ट अॅप-आधारित कंट्रोल, डिजिटल डिस्‍प्‍ले आणि प्रगत मायक्रोप्रोसेसर-आधारित वैशिष्‍ट्ये जसे ऑटो डायग्‍नोसिक्‍स अशा इतर अनेक वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. नवीन ओम्‍नीस श्रेणी आपल्‍या विद्यमान पोर्टफोलिओसह ५-स्‍टार बीईई रेटिंग देते, जी वापरकर्त्‍यांसाठी वीजेची बचत करेल आणि यामधून शाश्‍वत व सर्वसमावेशक विकासासाठी सर्वात ऊर्जा-कार्यक्षम उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

Related posts

ऊषाची रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी, प्रीमिअम किचन अप्लायन्सेसची नवी आयशेफ रेंज सादर भारतभरातील निवडक रिलायन्स डिजिटल आऊटलेट्समध्ये पाच सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध

Shivani Shetty

ग्राहक डिजिटल सुरक्षिततेकरिता क्विक हीलकडून ‘व्‍हर्जन २४’ लाँच

Shivani Shetty

हिरो मोटोकॉर्पने ‘ग्रॅण्‍ड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्‍ट’च्‍या दुसऱ्या पर्वासह सणासुदीच्‍या काळात केली अधिक उत्‍साहाची भर

Shivani Shetty

Leave a Comment