मुंबई, ०२ डिसेंबर २०२४: भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने ग्राहकांसोबतच्या आपल्या नात्याच्या सन्मानार्थ ‘प्राईड ऑफ तनिष्क: मेड बाय यू, मेड फॉर यू’ चे आयोजन केले होते. तनिष्कच्या वारशाचा अविभाज्य भाग बनलेल्या मुंबईकर ग्राहकांची संख्या ८ लाखांवर जाऊन पोहोचल्याचा आनंदाप्रीत्यर्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. काही दशकांपूर्वी मुंबईमध्ये पदार्पण केल्यापासून तनिष्कला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, जीवनातील आनंददायी सोहळ्यांमार्फत शाश्वत नाते तनिष्क आणि ग्राहकांमध्ये निर्माण झाले आहे. कायम संस्मरणात राहतील असे अनुभव निर्माण करण्यावर भर देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये प्रदीर्घ काळापासून तनिष्कची साथ देणारे ग्राहक, सेलिब्रेटीज आणि इन्फ्ल्यूएंसर्स या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. नावीन्य, कारीगरी आणि शान यांचा सुंदर मिलाप यावेळी पाहायला मिळाला.
तनिष्क आणि डी बीयर्सच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या डायमंड झोन किंवा ‘माईन टू मार्व्हल’ स्टोरी ऑफ नॅचरल डायमंड्सचे उदघाटन हा या कार्यक्रमाचा शिरोमणी होता. पृथ्वीच्या गर्भातून बाहेर येण्यापासून ते कलेचा अद्भुत नमुना बनण्यापर्यंतचा हिऱ्याचा चित्ताकर्षक प्रवास याठिकाणी पाहायला मिळतो. हिऱ्याच्या अतुलनीय गुणवत्तेबद्दल, जबाबदारीचे भान राखून केले जाणारे सोर्सिंग, नैतिकदृष्ट्या योग्य कारीगरी आणि अचूक कलात्मकता यांची माहिती ग्राहकांना करून देण्याप्रती ब्रँडची बांधिलकी यावेळी ठळकपणे दिसून आली.
तनिष्क ब्रँडसोबत एकनिष्ठ असलेल्या ग्राहकांच्या सन्मानार्थ, तनिष्कसोबतच्या त्यांच्या सोनेरी आठवणींचा आनंद साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक मॉडेल्ससोबत रनवेवर देखील सहभागी झाले, उत्कृष्ट कला आणि शान दर्शवणारे तनिष्कचे दागिने त्यांनी परिधान केलेले होते. रिवाह X तरुण ताहिलियानी या एथनो-कंटेम्पररी कलेक्शनच्या द्वितीय आवृत्तीचे लॉन्च देखील यावेळी पार पडले. लग्नसराईसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये परंपरा आणि आधुनिक सौंदर्यशास्त्र यांचा सहजसुलभ मिलाप आढळून येतो, आधुनिक भारतीय नवरी किंवा सूत्रधार – अर्थात स्वतःची कहाणी स्वतः लिहिण्याचा आत्मविश्वास जिच्यामध्ये आहे तिच्या आनंदासाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. सौंदर्य आणि समृद्धी यांचे प्रतीक असलेली फूलचादर आणि स्त्रीत्व व सांस्कृतिक समृद्धी दर्शवणारी ड्रेप स्टोरी या कलेक्शनचे खास वैशिष्ट्य आहे. कळीपासून पूर्ण फुललेल्या फुलापर्यंतचा प्रवास दर्शवणारे फ्लोरल मोटिफ, तरुण ताहिलियानी यांच्या पॅटर्न्सनी प्रेरित होऊन तयार केलेले ड्रेप्स या कलेक्शनमधील कलात्मकता जिवंत साकार करतात, प्रत्येक लग्नसमारंभाला कालातीत शान प्रदान करतात.
श्री अजॉय चावला, सीईओ-ज्वेलरी डिव्हिजन, टायटन कंपनी लिमिटेड यांनी सांगितले,”लग्नसराई धुमधडाक्यात सुरु आहे, या निमित्ताने मुंबईमध्ये ८ लाखांहून जास्त कुटुंबांसोबत गेल्या तीन दशकांच्या नात्याचा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या ग्राहकांनी आमची डिझाइन्स, कारीगरी आणि अस्सलपणा यावर विश्वास ठेवला आणि तनिष्कला मुंबईचा, भारताचा सर्वात पसंतीचा ब्रँड बनवण्यात मोलाचे योगदान दिले. आज या विशेष प्रसंगी रिवाह बाय तनिष्क आणि तरुण ताहिलियानी यांच्या अजून एका उत्कृष्ट कलेक्शनच्या लॉन्चची घोषणा करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. आधुनिक शान आणि स्टाईल यांची सांगड घालून फॅशनिस्टा नवरीला आनंद देण्यासाठी हे कलेक्शन तयार केले आहे. हे खास तयार करण्यात आलेले रिवाह तनिष्क कोलॅबोरेशन आमच्या डी बीयर्ससोबत नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या भागीदारीला अनुरूप आहे. सर्वोत्तम तनिष्क नॅचरल डायमंड्ससाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी, भारताच्या आर्थिक राजधानीसाठी सर्व कॅटेगरीजमधील सर्वोत्तम सादर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे पालन आम्ही यामध्ये करत आहोत.”
श्री अमित प्रतिहारी, एमडी, डी बीयर्स इंडिया म्हणाले,”तनिष्कच्या निष्ठावान ग्राहकांसोबत गेल्या तीन दशकांचा स्नेह आणि विश्वास यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आणलेल्या या शानदार समारंभामध्ये सहभागी होताना डी बीयर्सला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. आजचे ग्राहक हिऱ्यांच्या अस्सलतेविषयी खूप जागरूक असतात आणि त्यांना याबद्दल सुस्पष्ट माहिती हवी असते. आम्ही एकत्र येऊन “माईन टू मार्व्हल” हा नॅचरल डायमंड इमर्सिव्ह एक्स्पेरिएन्शियल झोन तयार केला आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, ग्राहकांना केंद्रस्थानी मानून तयार करण्यात आलेले असे उपक्रम सर्वसमावेशक मूल्य वाढवतील आणि गुणवत्ता, विश्वास व पारदर्शकता यांचा वारसा समृद्ध करतील. तरुण ताहिलियानी यांच्या सर्जनशील सहयोगामुळे नॅचरल डायमंड्सची दुर्मिळ, अनोखी आणि कालातीत जादू ज्वेलरी आणि फॅशन या दोन्हींमध्ये अनुभवायला मिळत आहे.”