maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पेटीएमचा मुलभूत पेमेंट्स व्‍यवसाय वाढवण्याचा मनसुबा

मुंबई, १६ सप्टेंबर २०२४: पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्‍या २४व्‍या अॅन्‍युअल जनरल मीटिंग (एजीएम)मध्‍ये अनुपालन-केंद्रित दृष्टिकोनासह लाभक्षमतेप्रती कटिबद्धतेची पुष्‍टी दिली, जेथे कंपनीने आपल्‍या मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. “मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायाप्रती कटिबद्धतेसह आमचा लवकरच पीएटी लाभक्षमता वि‍तरित करण्‍याचा मनसुबा आहे,” असे शर्मा म्‍हणाले.

एजीएममध्‍ये पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर शर्मा यांनी क्‍यूआर कोड व साऊंडबॉक्‍स यांसारख्‍या कंपनीच्‍या अग्रगण्‍य नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीमध्‍ये पेटीएमच्‍या मोठ्या भूमिकेला दाखवले. ते म्‍हणाले, “आम्‍ही भारतातील व्‍यवसाय आणि लघु व्‍यापाऱ्यांसाठी नेहमी जागतिक दर्जाचे उत्‍पादन निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, ज्‍यासाठी जागतिक बेंचमार्क स्‍थापित करत आहोत. आज, आमचा आमचा व्‍यवसाय जागतिक स्‍तरावर अनुकरणीय टेम्प्लेट बनला आहे.”

फिनटेकमध्‍ये लीडर आणि भारतासाठी निर्माणाप्रती कटिबद्ध असलेले शर्मा म्‍हणाले की, टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्‍समध्‍ये तेच यश संपादित करण्‍यास सज्‍ज आहे. आमची टीम तंत्रज्ञान, उत्‍पादन, व्‍यवसाय आणि कार्यसंचालन या सर्व क्षेत्रांमध्‍ये एआयचा वापर करत आहे.

पेटीएमने आपला व्‍यापारीवर्ग विस्‍तारित करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि सध्‍या जवळपास ४० दशलक्ष व्‍यापाऱ्यांना सेवा देत आहे, तसेच देशभरातील १०० दशलक्ष व्‍यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे ध्‍येय आहे. अध्‍यक्ष व ग्रुप सीएफओ मधुर देवरा यांनी अर्ध-बिलियन भारतीयांना मुख्‍यप्रवाहातील अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये आणण्‍याच्‍या पेटीएमच्‍या मिशनला सादर केले. त्‍यांनी ८,५०० कोटी रूपयांच्‍या रोख शिल्‍लकीसह प्रबळ ताळेबंदाचा उल्‍लेख करत कंपनीच्‍या प्रबळ आर्थिक स्थितीला निदर्शनास आणले.

Related posts

झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्जकोव्हा बनली मिस वर्ल्ड

Shivani Shetty

इझमायट्रिपचा ओएनडीसी नेटवर्कसोबत सहयोग

Shivani Shetty

लिंक्‍डइनकडून मराठी, बंगाली, पंजाबी आणि तेलुगूसह १० नवीन भाषा पर्यायांची भर

Shivani Shetty

Leave a Comment