maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

मेटाने डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकतेला गती देण्‍यासाठी सुरू केली अॅण्‍टी-स्‍कॅम

राष्‍ट्रीय । जुलै २९, २०२५: मेटाने वापरकर्त्‍यांच्‍या सुरक्षिततेप्रती कटिबद्धतेला अधिक दृढ करत अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिमेची दुसरी आवृत्ती ‘स्‍कॅम से बचो २.०’ लाँच केली आहे. ही मोहिम डिजिटल सुरक्षिततेबाबत सूचना देण्‍यासह मार्गदर्शन करते. या वर्षी ही मोहिम रस्‍त्‍यांवर राबवण्‍यात येणार आहे, जेथे जगभरात संवादांना चालना देण्‍याकरिता धाडसी, विनोदी प्‍लेकार्डचा (फलकांचा) वापर करण्‍यासाठी प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर साइनबोर्ड_वालासोबत (Signboard_wala) सर्जनशील सहयोग करण्‍यात आला आहे.

गेल्‍या वर्षीच्‍या मोहिमेला मिळालेल्‍या यशाला अधिक पुढे नेत स्‍कॅम से बचो २.० मुंबईतील काही प्रख्‍यात रस्‍त्‍यांवर सार्वजनिक ठिकाणी घोटाळ्यांबाबत जागरूकता निर्माण करते, जेथे सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संबंधित व व्हिज्‍युअली प्रभावी कथानकाच्‍या वापर करत लोकांना बनावट कर्ज घोटाळे, तोतयागिरी आणि ओटीपी फसवणूक यांसारख्या सामान्य ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल माहिती देते.

या मोहिमेत साइनबोर्ड_वाला (Signboard_wala) द्वारे ‘एक्‍स हो या स्‍कॅमर, दोन को ब्‍लॉक अँड रिपोर्ट करो’ आणि ‘किप युअर फ्रेंड्स क्‍लोज अँड युअर ओटीपी क्‍लोजर’ असे संदेश देणारे वेगवेगळे फलक लावण्‍यात आले आहेत. ही मोहिम डिजिटल सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देते, तसेच मेटाची सुरक्षितता वैशिष्‍ट्ये जसे टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन (२एफए), ब्‍लॉक अँड रिपोर्ट यांना प्रकाशझोतात आणते आणि लोकांना त्‍यांच्‍या ऑनलाइन सुरक्षिततेबाबत सक्रिय राहण्‍यास प्रेरित करते.

लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन केलेले हे सर्वोत्तम, विनोदी संदेश निश्चितच हास्य निर्माण करतात, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकांना थांबून ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल पुनर्विचार करायला लावतात. ही अद्वितीय जागरूकता आहे, ज्‍यामध्ये कोणताही उपदेश नाही, कोणतेही नाटक नाही, फक्‍त लोकांचे लक्ष वेधून घेणारे प्रामाणिक, हलकेफुलके क्षण आहेत.

गेल्‍या वर्षी मेटाने बॉलिवुड स्टार अभिनेते आयुष्‍मान खुराणा यांच्‍यासोबत सहयोगाने सुरक्षितता मोहिम ‘स्‍कॅम्‍स से बचो’ लाँच केली, जेथे लोकांना ऑनलाइन घोटाळ्यांबाबत सुरक्षित राहण्‍याच्‍या पद्धतींबाबत जागरूक करण्‍यात आले आणि सुरक्षित डिजिटल पद्धतींचा प्रचार करण्‍यात आला. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय), भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय४सी) आणि माहिती व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमधून लोकांचे ऑनलाइन व्‍यवहारादरम्‍यान संरक्षण करण्‍याप्रती मेटाची कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे देशातील घोटाळे आणि सायबर फसवणूकीच्या वाढत्या घटनांना तोंड देण्याच्या सरकारच्या ध्येयाला पाठिंबा मिळाला आहे.

Related posts

ओबेन इलेक्ट्रिकची ‘रॉर ईझी’ ७ नोव्हेंबरला लाँच होणार

Shivani Shetty

या आठवड्यात IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत देवराचे कलाकार ट्रेंडिंग

Shivani Shetty

गणेशोत्‍सव साजरीकरणादरम्‍यान यामाहाकडून आकर्षक ऑफर्स

Shivani Shetty

Leave a Comment