maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

खाता येण्याजोग्या फोर्क्सच्या पहिल्यावहिल्या प्रयोगातून मॅगीने दिली बदलाची प्रेरणा

छोट्या-छोट्या कृतींमधून लक्षणीय प्रभाव निर्माण करणे हे मॅगीच्या ‘देश के लिये २ मिनिट’ या २०२० साली सुरू झालेल्या उपक्रमाचे लक्ष्य आहे. एकदाच वापरून टाकून द्यायच्या प्लास्टिकला शाश्वत पर्याय देणे हे या उपक्रमांच्या उद्दीष्टांपैकी एक उद्दीष्ट आहे. या उद्दीष्ट्याशी मेळ साधत मॅगीने नेस्ले इंडिया आरअॅन्‍डडी (नेस्ले एस.ए.ची उपकंपनी आणि नेस्लच्या ग्लोबल आरअॅन्‍डडी नेटवर्कचा भाग असलेला विभाग) व भारतीय स्टार्ट-अप त्रिशुलाच्या सहयोगाने एक एडिबल अर्थात खाण्यायोग्य फोर्क आणला आहे. गव्हाच्या पिठापासून बनविलेला हा फोर्क मॅगी कप्पा नूडल्सचा आस्वाद घेण्याच्या आनंददायी अनुभवात अधिकच भर टाकतो व हे सूपसारखे नूडल्स भुर्रके घेत खाण्याची मसालेदार मौज अधिकच वाढवतो.
याआधी २०२३ साली मॅग ने भारतात फोल्‍डेबल आणि विघटनशील फोर्क्स आणले होते, जे नेस्लेज इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग सायन्सेसने व्हिवे, स्वित्झर्लंड, कनेका इंडिया प्रा. लि. आणि नेस्ले इंडिया आरअॅन्‍डडीच्या सहयोगाने संयुक्तपणे विकसित केले होते. घडीच्या आणि विघटनशील फोर्क्समुळे प्लास्टिकच्या वापरात वर्षाकाठी सुमारे ३५ एमटीची घट होऊ शकली.
एडिबल फोर्क्स प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आणण्याविषयी नेस्ले इंडियाच्या फूड्स विभागाचे डायरेक्टर श्री. रजत जैन म्हणाले, “नेस्लेमध्ये आमच्या ग्राहकांसाठी आणि पृथ्वीसाठी अधिक चांगले भविष्य घडविण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. कप्पा नूडल्सबरोबर मिळणारा एडिबल फोर्क म्हणजे पर्यावरणीय जबाबदारीप्रती आमची बांधिलकी जपण्याच्या प्रयत्नांतील एक लक्षणीय टप्पा आहे व यातून प्रवर्तनशील ग्राहक-केंद्री उपक्रमांचीही सुरुवात झाली आहे. ही नवसंकल्पना म्हणजे आमच्या जागतिक आरअॅन्‍डडी क्षमतांचे मूर्तीमंत उदाहरण आहे, ज्या अशाप्रकारचे पहिलेच टू-पीस फोर्क डिझाइन विकसित करण्यासाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून दिसून येते. हा उपक्रम सुरू झाल्यावर अधिक हरित उपाययोजनांसाठी एक प्रभावी उदाहरण घालून दिले जाईल, याची आम्हाला खात्री आहे.”
नेस्ले आरअॅन्‍डडी सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Societe des Produits, Nestlé SA च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी)चे हेड श्री. जगदीप माराहर म्हणाले, “आमचे पॅकेजिंगच्या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे कौशल्य व त्याला स्थानिक पॅकेजिंग तज्ज्ञांच्या विचारांची मिळालेली जोड यामुळे आम्ही प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती शोधू शकतो व त्यांची चाचणी घेऊ शकतो. आमच्या टीम्स नवनव्या पॅकेजिंग साहित्याचा व संपूर्ण मूल्य साखळीमध्ये प्लास्टिकचा इष्टतम वापर करण्यासाठीच्या अद्ययावत तंत्रज्ञानांचा सतत शोध घेत असतो व स्थानिक ग्राहकांकडून स्वीकारले जातील असे शाश्वत पर्याय निर्माण करत असतो.”
एडिबल फोर्क्स पुरविण्याची योजना सध्या मर्यादित काळासाठी राबवली जाणार आहे. मॅगी मसाला कप्पा नूडल्स विथ एडिबल फोर्क हे मे’२४ पासून प्रमुख महानगरांमध्ये उपलब्ध असणार आहेत व त्यांची किंमत ७९.५ ग्रॅमच्या पॅकसाठी रु. ५० इतकी असणार आहे.

Related posts

टाटा मोटर्सने प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍यासाठी लाँच केला अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम – ‘ट्रक उत्‍सव’

Shivani Shetty

एसएलसीएमने शेतकरी आणि महिला कर्जदारांना सक्षम बनवले

Shivani Shetty

बीएलएस ई-सर्विसेसने आर्थिक निकालांची घोषणा केली

Shivani Shetty

Leave a Comment