मुंबई, १७ जानेवारी २०२५: टीमलीज डिजिटल या आघाडीच्या कर्मचारी उपाययोजना पुरवठादार कंपनीने अलीकडेच “महाराष्ट्रात तंत्रज्ञान आणि जीसीसी उत्क्रांती” या संकल्पनेवर एका सीएक्सओ थिंकटॅंकचे आयोजन केले होते. टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीती शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कार्यक्रमात उद्योगातील उत्पादन, टेलिकॉम, इंजिनीअरिंग, बीएफएसआय, आयटी सेवा आणि एजटेक अशा विविध क्षेत्रांमधील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणले गेले आणि तंत्रज्ञानातील बदल व टॅलेंट तसेच भारताच्या वाढीच्या प्रवासात त्यांचा प्रभाव या विषयांवर चर्चा झाली.
सीएक्सओ थिंकटँकमध्ये तंत्रज्ञान आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) क्षेत्राला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पनांवर विचार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने जीसीसीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या प्रकल्पांच्या वाढत्या गुंतागूंतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. चर्चांदरम्यान अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगीकार, सुस्पष्ट तंत्रज्ञान दिशादर्शकाचे महत्त्व तसेच पारंपरिक पाच वर्षीय तंत्रज्ञान रिफ्रेश चक्रांपासून ते सातत्यपूर्ण नावीन्यपूर्णता आणि आमूलाग्र सुधारणा असे विषय समोर आले. या दृष्टीकोनातून टिकाऊ सुधारणा होतात, कायमस्वरूपी आयटी मॉडेल्स व सुयोग्य क्लाऊड पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाते. सहभागींनी तंत्रज्ञान, ऑपरेशन्स आणि बिझनेस विकास अशा विविध कौशल्यांच्या वाढत्या मागणीला अधोरेखित केले.
“सीएक्सओ थिंकटँक उद्योगातील महत्त्वाचे ट्रेंड्स तसेच टॅलंट आणि व्यवसाय वाढीबद्दल संवाद साधण्याप्रती आमची वचनबद्धता द्विगुणित करते,” असे मत टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीत आघाडीवर आहे आणि येथून आलेली माहिती आमूलाग्र बदल, कौशल्य विकास आणि कर्मचारी सहभागाच्या गुंतागूंतींमधून मार्ग काढण्यासाठी एक दिशादर्शक ठरेल.”
टीमलीज डिजिटलच्या धोरण आणि विकास विभागाच्या उपाध्यक्ष मुनीरा लोलीवाला म्हणाल्या की, “उद्योगात बदल होतात तसे पारंपरिक नेमणूक पद्धतींचा पुनर्विचार करणे, टॅलेंटमधील वैविध्यपूर्णता स्वीकारणे आणि संघटनात्मक कौशल्यांना वैयक्तिक प्रेरणांशी जोडणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सीएक्सओ थिंकटँकमध्ये झालेल्या चर्चांमधून या बदलत्या लँडस्केपमध्ये शाश्वत वाढीला चालना देताना अंगीकारण्याची शक्ती आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व स्पष्ट झाले.”
यावेळी आणखी एका महत्त्वाच्या संकल्पनेवर चर्चा झाली. ती म्हणजे मुलभूत कौशल्ये, जसे समस्या सोडवणे आणि अंगीकार करणे. हे तांत्रिक ज्ञानासाठी पूरक ठरते. या वेळी उपस्थित प्रतिनिधी आणि कंपन्यांनी वाढीचा दृष्टीकोन असलेल्या व्यक्तींच्या नेमणूकीची महत्त्वाची भूमिका सांगितली. कारण त्यांना प्रामुख्याने जीसीसीमध्ये शिकून अंगीकार करण्यासाठी उत्सुकता असते. उद्योगातून कर्मचारी सहभागाला चालना देण्यासाठी व योगदानाचा गौरव करून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणा व हेतू या भावना निर्माण करण्यासाठी उत्तम कार्यक्रमांवर भर दिला गेला.